|
पु ( काव्य ) मरण ; अंत . शोकार्णवीं नाना पडून , नित्य रडरडून पावले मृत्य । - ऐपो ४१९ . यम ; अंतक . [ सं . मृत्यु ; मृ = मरणें ] ( वाप्र . ) ०पावणें मरणें . मृत्यूचा फांसा पडणें मरणोन्मुख फांसे । - मोआदि ४ . ८२ . सामाशब्द - ०कळा स्त्री. मरणाच्या वेळीं तोंडावर दिसणारी कळा ; मरणकळा ; प्रेतकळा ; मरणाच्या वेळचा तोंडावरील फिक्कटपणा ; निस्तेजपणा . ०गंडांत न. जीवावरचें संकट ; मृत्युप्राय संकट ; जीवावरचा प्रसंग ; गंडांत शब्द पहा . ०गोदान न. ( प्र . ) मृतगोदान ; मेलेल्या गाईचें दान . एका चिक्कू गृहस्थानें मेलेल्या गाईला नेऊन टाकण्याचा खर्च वांचावा म्हणून तिचें मरणप्राय स्थितींत एका ब्राह्मणाला दान केलें यावरुन वरील संप्रदाय प्रचारांत आला . ( ल . ) मरतुकडा प्राणी ; अत्यंत कृश व अशक्त असलेला मनुष्य किंवा पशु . ( ल ) निर्वीर्य मनुष्य ; पुचाट मनुष्य ; पुळचट इसम , मेमलतोंड्या . ०चिन्ह न. मरणाचें चिन्ह ; मृत्युकाल समीप आल्याची खूण ; मरणकाळचें लक्षण ; महत्संकटाची सूचना . ( क्रि० उमटणें ; दिसणें ; होणें ). ०पंचक न. ( ज्योतिष ) एक अशुभ योग ; या योगावर जन्म झाल्यास मरणाची भीति असते . पंचक पहा . अगे हा रुक्मिया दुर्बुद्धि । न पाहेचि लग्नसिद्धी । मृत्युपंचकाचे संधी । लग्नसिद्धी मांडिली । - एरुस्व १२ . ८ . ०पत्र न. आपल्या मरणानंतर जिंदगीची व्यवस्था कशी व्हावी यासंबंधीं लिहिलेला लेख , दस्तऐवज . ०पत्र - पु . मृत्युपत्राप्रमाणें जिंदगीची सर्व विल्हेवाट लावणारा . चालविणारा - पु . मृत्युपत्राप्रमाणें जिंदगीची सर्व विल्हेवाट लावणारा . ०पंथ मार्ग - पु . मरणाची वाट ; मानवी जीवित ; मर्त्यलोक . मनुष्याचा जन्म हा मृत्युपंचक आहे आणि हें भूमंडल हें मृत्युपंथ नव्हे तर काय ? ०मुखीं क्रिवि . ( मूळ शब्द मृत्युमुख ) मृत्यूच्या तोंडांत ; काळाच्या जबड्यांत . ०योग पु. ( ज्योतिष ) एक कुयोग . रविवारीं अनुराधा , सोमवारी उत्तराषाढा , मंगळवारीं शततारका , बुधवारी अश्विनी , गुरुवारीं मृगशीर्ष , शुक्रवारी आश्लेषा , व शनिवारीं हस्त याप्रमाणें त्या त्या वरीं तीं तीं नक्षत्रें आलीं असतां त्या दिवशीं मृत्युयोग असतो . ०लोक पु. पृथ्वी ; भूलोक . ०वेळ वेळा - स्त्री . दिवसांतील एक अशुभ काळ ; काळवेळ . वेळ शब्द पहा . [ सं . वेला ] ०षडाष्टक न. ( ज्योतिष ) मेष - कन्या , तूळ - मीन , मिथुन - वृश्चिक , सिंह - मकर , कर्क - कुंभ , वृषभ - धन ; या दोन दोन राशींतील अंतर सहा व आठ आहे . म्हणून यास षडाष्टक म्हणतात . या दोन राशींपैकीं एक वधूची व एक वराची असल्यास विवाहकार्यास हें वर्ज्य मानलें जातें . मृत्युंजय पु . शंकर ; शिव . तात तुझा तेजस्वी मृत्युंजयसचिव होय अजित रणीं । - मोभीष्म ३ . २९ . ( वैद्यक ) एक मात्रा ; औषध . बचनाग , गंधक , मिरीं , टांकणखार , पिंपळी हीं औषधें एकेक भाग व हिंगूळ दोन भाग घेऊन आल्याच्या रसांत खलून त्याच्या गोळ्या करतात . हें औषध सर्व ज्वरांचा नाश करितें . [ सं . मृत्यु + जि = जिंकणें ]
|