प्रथम परिच्छेद - ऋतु
निर्णयसिंधु ग्रंथामध्ये कोणत्या कर्माचा कोणता काल, याचा मुख्यत्वेकरून निर्णय केलेला आहे.
ऋतुर्मासद्वयात्मा मलमासेतुमासद्वयात्मकएकोमासस्तेनमासद्वयात्मकत्वमविरुद्धम् सद्वेधा चांद्रःसौरश्च चैत्रारंभोवसंतादिश्चांद्रः मीनारंभोमेषारंभोवासौरः मीनमेषयोर्मेषवृषयोर्वावसंत इतिबौधायनोक्तेः अनयोर्विनियोगमाहत्रिकांडमंडनः श्रौतस्मार्तक्रियाः सर्वाः कुर्याच्चांद्रमसर्तुषु तदभावेतुसौरर्तुष्वितिज्योतिर्विदांमतम् सद्विविधोपिषोढा वसंतोग्रीष्मोवर्षाः शरद्धेमंतः शिशिरः इत्यृतुः ।
आतां ऋतु सांगतो- दोन मास म्हणजे एक ऋतु होतो. मलमास असतां शुद्ध व मलमास मिळून एक मास होतो, म्हणून दोन मास म्हणजे एक ऋतु असें जें सांगितलें तें विरुद्ध नाहीं. तो ऋतु दोन प्रकारचा - चांद्र आणि सौर चैत्रापासून आरंभ करुन दोन दोन महिन्यांचा एकेक ऋतु असा मासपरत्वें जो वसंतादिक ऋतु तो चांद्र ऋतु. मीन संक्रांतीपासून किंवा मेषसंक्रांतीपासून दोन दोन राशींस सूर्य असतां एकेक ऋतु होतो, असा जो संक्रांतिपरत्वें ऋतु तो सौर ऋतु. कारण, " मीन व मेष मिळून वसंत ऋतु; किंवा मेष व वृषभ मिळून वसंत ऋतु होतो " अशी बौधायनाची उक्ति आहे. ह्या सौर व चांद्र ऋतूंचा विनियोग त्रिकांडमंडन सांगतो - " श्रौत, स्मार्त इत्यादिक सर्व कर्मांचेठायीं संकल्पांत उच्चार करणें तों चांद्र ऋतूचा करावा, हें प्रशस्त. चांद्र ऋतूच्या अभावीं सौर ऋतूचा उच्चार करावा असें ज्योतिःशास्त्रज्ञांचें मत आहे. " तो दोन्ही प्रकारचा ऋतु प्रत्येक सहा प्रकारचा आहे, ते प्रकार असे - वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद्, हेमंत आणि शिशिर. याप्रमाणें ऋतुनिर्णय जाणावा.
N/A
References : N/A
Last Updated : May 09, 2013
TOP