मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|निर्णयसिंधु|प्रथम परिच्छेद|
मंगलकार्यांचेठायीं विशेष

प्रथम परिच्छेद - मंगलकार्यांचेठायीं विशेष

निर्णयसिंधु ग्रंथामध्ये कोणत्या कर्माचा कोणता काल , याचा मुख्यत्वेकरून निर्णय केलेला आहे .


मंगलकृत्येषुविशेषमाहज्योतिर्निबंधेनारदः त्याज्याः सूर्यस्यसंक्रांतेः पूर्वतः परतस्तथा विवाहादिषु कार्येषुनाड्यः षोडशषोडशेति एतत्पुण्यकालोपलक्षणं भानोःसंक्रांतिभोगश्चकुलिकश्चार्धयामक इति ज्योतिःप्रकाशेवर्ज्येषुपरिगणनात् ।

विवाहादि मंगलकार्यांचेठायीं विशेष सांगतो-ज्योतिर्निबंधांत नारद म्हणतो- " विवाहादि मंगलकार्यांचेठायीं, सूर्यसंक्रांतीच्या पूर्व व पर अशा साधारणपक्षीं सोळा सोळा घटिका टाकाव्या. " हें सांगणें पुण्यकालाचें उपलक्षण आहे; ( म्हणजे ज्या संक्रांतीचा जितका पुण्यकाल आहे तितक्या घटिका टाकाव्या असा अर्थ होतो ) कारण, सूर्याचा संक्रांतिभोग, व कुलिक अर्धयाम ( चार घटिका ) हा टाकावा " असें ज्योतिःप्रकाश ग्रंथांत वर्ज्य प्रकरणीं परिगणन केलें आहे. यावरुन पुण्यकालाच्या सर्व घटिका टाकाव्या.

अयनव्यतिरिक्तासुदशसुसंक्रांतिषुरात्रौस्नानश्राद्धादिनकार्यं अह्निसंक्रमणेकृत्स्नमहःपुण्यंप्रकीर्तितं रात्रौसंक्रमणेभानोर्दिनार्धंस्नानदानयोः अर्धरात्रादधस्तस्मिन्मध्याह्नस्योपरिक्रिया ऊर्ध्वंसंक्रमणेचोर्ध्वमुदयात्प्रहरद्वयं पूर्णेचेदर्धरात्रेतुयदासंक्रमतेरविः प्राहुर्दिनद्वयंपुण्यंमुक्त्वामकरकर्कटाविति वृद्धवसिष्ठा दिवचनैरहः पुण्यत्वोत्तया रात्रौसंक्रमणेभानोर्दिवाकुर्यात्तुतत्क्रियां पूर्वस्मात् परतोवापिप्रत्यासन्नस्यतत्फलमितिवसिष्ठवचनाच्चार्थाद्रात्रौस्नानादिनिषेधप्रतीतेः यानितु विवाहव्रतसंक्रांतिप्रतिष्ठाऋतुजन्मसु तथोपरागपातादौस्नानेदानेनिशाशुभेति राहुदर्शनसंक्रांतिविवाहात्ययवृद्धिषु स्नानदानादिकंकुर्युर्निशिकाम्यव्रतेषुचेत्यादीनि विष्णुगोभिलादिवचनानितानिमकरकर्कसंक्रांतिविषयाणि मुक्त्वामकरकर्कटावितितयोर्दिवानुष्ठानस्यपर्युदस्तत्वादितिहेमाद्रिमाधवादयः ।

अयन ( मकर व कर्क ) व्यतिरिक्त ज्या दहा संक्रांति त्यांविषयीं रात्रीं स्नान, दान, श्राद्धादिक करुं नये; कारण, " दिवसा संक्रांत झाली असतां संपूर्ण दिवस पुण्यकाळ; रात्रीं संक्रांत झाली असतां स्नानदानाविषयीं अर्धा दिवस पुण्यकाळ; मध्यरात्रीच्यापूर्वी संक्रांत झाली असेल तर पूर्व दिवसाचें उत्तरार्ध पुण्यकाळ; मध्यरात्रीच्या पुढें संक्रांत झाली असतां उत्तर दिवसाचें पूर्वार्ध पुण्यकाळ; पूर्ण मध्यरात्रीं संक्रांत झाली असतां दोन दिवस पुण्यकाळ म्हणजे पूर्वदिवसाचें उत्तरार्ध आणि उत्तर दिवसाचें पूर्वार्ध पुण्यकाळ, परंतु मकर व कर्क वर्ज्य करुन हा निर्णय जाणावा " ह्या वृद्धवसिष्ठादिकांच्या वचनेंकरुन दिवसा पुण्यकाल सांगितला असल्याकारणानें आणि " सूर्यसंक्रांत रात्रीं झाली असतां तत्संक्रांतिसंबंधी जें स्नानदान करणें तें दिवसा करावें; तो दिवस पूर्वीचा किंवा पुढचा जो सन्निध असेल तो घ्यावा " ह्या वसिष्ठवचनावरुनही, अर्थात्‍ रात्रीं स्नानदानादिक करुं नये, असा निषेध प्रतीयमान होतो. आतां जीं वचनें - " विवाह, व्रत, संक्रांति, प्रतिष्ठा, ऋतु, जन्म, ग्रहण, पात, इत्यादिनिमित्तक स्नान दान करण्याविषयीं रात्री शुभ आहे. " हें आणि " ग्रहण, संक्रांति, विवाह, अत्यय, ( मरण ), वृद्धी ( पुत्रजन्म ) आणि काम्यव्रतें, एतन्निमित्तक स्नानदानादिक रात्रीं करावें. " इत्यादिक विष्णुगोभिल इत्यादिकांचीं वचनें तीं मकर व कर्कसंक्रांतिविषयक जाणावीं; कारण, वरील वृद्धवसिष्ठवचनांत ( मुक्त्वा मकरकर्कटौ ) ‘ मकर व कर्क वर्ज्य करुन ’ असें म्हटलें आहे, यास्तव रात्रीं झालेल्या मकर कर्कनिमित्तक स्नानदान दिवसा करण्याविषयीं पर्युदास ( निषेध ) आहे, असें हेमाद्रि, माधव इत्यादिक म्हणतात.

वस्तुतस्तु प्रागुक्तवचनेनतयोर्दिनद्वयपुण्यत्वादेरेवपर्युदासान्मकरकर्कटयोरपि स्नानंदानंपरेहनीत्यादिभिरहः पुण्यत्वोक्तेः अहः पुण्यत्वानुपपत्त्याकल्प्यरात्रिनिषेधस्यचप्रत्यक्षरात्रिविधिनाबाधात्सर्वसंक्रांतिषुरात्रावनुष्ठानविकल्पः सचदेशाचाराद्यवतिष्ठत इतियुक्तःपंथाः अयनयोस्तुवक्तव्योविशेषः श्रावणेमाघेचवक्ष्यते ज्योतिर्निबंधेगर्गः यस्यजन्मर्क्षमासाद्यरविसंक्रमणंभवेत् तन्मासाभ्यंतरेतस्यवैरक्लेशधनक्षयाः तगरसरोरुहपत्रैरजनीसिद्धार्थलोध्रसंयुक्तैः स्नानंजन्मर्क्षगतेरविसंक्रमणेनृणांशुभदं हेमाद्रौ अह्निचेद्रात्रियुग्मंस्याद्रात्रौचेद्वासरद्वयं संक्रांतिः पक्षिणीज्ञेयादानाध्ययनकर्मसु यत्तुगौडाः संक्रांत्यांपक्षयोरंतेद्वादश्यांश्राद्धवासरे सायंसंध्यानकुर्वीतकुर्वंश्चपितृहाभवेदितिकर्मोपदेशिन्यांव्यासोक्तेः सायंपुण्यकालेसंध्यानिषेधमाहुः तन्निर्मूलं अन्यच्चबहुवक्तव्यंविस्तरभीतेर्नोच्यते इतिसंक्रांतिनिर्णयः ।

वास्तविक म्हटलें तर पूर्वीच्या वृद्धवसिष्ठाच्या वचनानें, मकर व कर्क ह्या संक्रांतींला इतर संक्रांतींप्रमाणें दोन दिवस पुण्यकाळ प्राप्त झाला, तो दोन दिवस पुण्यकाळ यांना नाहीं, इतकाच निषेध असल्यामुळें; मकर व कर्क यांना देखील स्नान, दान दुसर्‍या दिवशीं करावें इत्यादि वचनांनीं दिवसा पुण्यकाळ सांगितला असल्यामुळें; दिवसा पुण्यकाळ सांगितल्यावरुन, अर्थात्‍ रात्रीं स्नानदानादिकांचा निषेध कल्पित होतो, त्या कल्पित केलेल्या निषेधाचा ‘ विवाहव्रतसंक्रांति० ’ ‘ राहुदर्शनसंक्रांति० ’ इत्यादि वचनांनीं प्रत्यक्ष सांगितलेल्या रात्रिविधीनें बाध होत असल्यामुळें, सर्व संक्रांतींचे ठिकाणीं रात्रौ स्नानदानादिकांचा विकल्प होतो, ( म्हणजे रात्रीं संक्रांत झाली असतां रात्रीं स्नानादिक करावें, अथवा न करावें, असें सूचित होतें ) ह्या विकल्पाची, ज्या देशांत जसा आचार असेल तदनुरुप व्यवस्था जाणावी, हाच योग्य मार्ग होय. कर्क व मकर ह्या दोन संक्रांतींविषयीं कांहीं विशेष सांगावयाचा आहे तो, श्रावण व माघ यांच्या निर्णयप्रसंगीं पुढें सांगूं. ज्याच्या जन्मराशीस सूर्यसंक्रमण होतें त्याला त्या महिन्यांत वैर, क्लेश, द्रव्यनाश इत्यादि पीडा होतात. त्याचा परिहारतगर व कमल ह्यांचीं पत्रें, हळद, सर्षप, लोध्र ह्यांच्या उदकानें स्नान करावें, तेणेंकरुन जन्मस्थ सूर्यसंक्रमणसंबंधी पीडा दूर होऊन कल्याण होतें. संक्रांतीचा अनध्याय-हेमाद्रींत सांगितला आहे कीं- दिवसा संक्रांत झाली असतां पूर्व रात्र, पुढची रात्र आणि संक्रांतिदिवस ह्यांचेठायीं दान व अध्ययन करुं नये. रात्रीं झाली असतां पूर्व दिवस, पुढचा दिवस आणि ती रात्र यांचे ठायीं दान व अध्ययनादि करुं नये. " आतां जें गौड सांगतात - " संक्रांत, अमावास्या, पौर्णिमा, द्वादशी, श्राद्धदिवस यांचे ठायीं सायंसंध्या करुं नये, केली असतां पितृहा होतो असें कर्मोपदेशिनी ग्रंथांत व्यासवचन आहे, म्हणून ‘ सायंकाळीं संक्रांतिपुण्यकाळीं संध्या करुं नये ’ असें जें गौड सांगतात, तें निर्मूल होय. आणखी दुसरे निर्णय संक्रांतिविषयक बहुत सांगावयाचे आहेत परंतु ग्रंथविस्तार फार होईल याकरितां ते येथें सांगत नाहीं. याप्रमाणें संक्रांतीचा निर्णय समाप्त झाला.

N/A

References : N/A
Last Updated : May 09, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP