सोमेत्वाहापस्तंबः अमावास्यायांदीक्षायजनीयेवामावास्यायांयजनीयेवासुत्यमहः पौर्णमास्यांदीक्षायजनीयेवापौर्णमास्यांयजनीयेवासुत्यमहरिति लाट्यायनसूत्रेपि पूर्वपक्षस्यप्रथमेहनिदीक्षेतदृष्ट्वावानक्षत्रयोगेचेति पूर्वपक्षः शुक्लपक्षः नक्षत्रयोगेचेत्ययमर्थः चैत्र्यादिपूर्णिमायाश्चिन्नानक्षत्रयोगेदीक्षेतेति ।
सोमाविषयीं सांगतो.
आपस्तंब - “ सोमयागाची दीक्षा अमावास्येस किंवा यजनीयदिवशीं ( प्रतिपदेस ) घ्यावी. अमावास्येस किंवा यजनीयदिवशीं सुत्य दिवस ( सोमरस तयार करण्याचा दिवस ) समजावा. पौर्णिमेस किंवा यजनीयदिवशीं दीक्षा घ्यावी. पौर्णिमेस किंवा यजनीयदिवशीं सुत्य दिवस समजावा. ” लाट्यायनसूत्रांतही - “ शुक्लपक्षीं प्रतिपदेस दीक्षा घ्यावी, किंवा चैत्री इत्यादि पौर्णिमेस चित्रादि नक्षत्राचा योग असतां दीक्षा घ्यावी. ”
आधानंतुपर्वणिनक्षत्रेषुचोक्तम् तत्रपर्वनक्तंगार्हपत्यमादधीतेत्यादिकर्मकालव्यापिग्राह्यम् दिनद्वयेतत्वेंपरंग्राह्यं संकल्पस्यपर्वणिलाभात् पूर्वंनक्षत्रयोगेतदेवग्राह्यम् यत्रत्रीणिसन्निपतितान्यृतुर्नक्षत्रंचपर्वतत्समृद्धंविप्रतिषेधेऋतुर्नक्षत्रंचबलीय इति हिरण्यकेशिसूत्रात् ऋतुर्वसंतेब्राह्मणोग्नीनादधीतेत्यादिः रेणुकारिकायांतु माघादिपंचमासेषुश्रावणेवाश्विनेतथा मार्गशीर्षेशुक्लपक्षेआधानमथकारयेदित्युक्तं अत्रमूलंमृग्यम् आधाननक्षत्राणितुआपस्तंबसूत्रेकृत्तिकारोहिणीमृगशीर्षपुनर्वसुपुष्यपूर्वोत्तरापूर्वाषाढोत्तराषाढाहस्तचित्राविशाखाऽनुराधाश्रवणोत्तराभाद्रपदाइति ।
आधान - आधान करणें तें पर्वदिवशीं आणि नक्षत्राचे ठायीं सांगितलें आहे. आधानासाठीं पर्व घेणें तें, “ रात्रीं गार्हपत्याधान करावें ” इत्यादि वाक्यानें प्रतिपादित जो कर्मकाल त्याला व्यापून असेल तें घ्यावें. दोन दिवशीं पर्व कर्मकाल व्यापी असेल तर दुसर्या दिवसाचें घ्यावें. कारण, तसें घेतलें असतां पर्वांत संकल्प होतो. पूर्वदिवशीं नक्षत्रयोग असेल तर पूर्वदिवसाचेंच घ्यावें. कारण, “ ऋतु ( वसंतऋतु ), पर्व, आणि उक्त नक्षत्र या तिहींचा एककालीं योग असेल तर तो अति उत्तम. पर्व एक दिवशीं आणि ऋतुनक्षत्र एक दिवशीं असेल तर पर्वापेक्षां ऋतु व नक्षत्र श्रेष्ठ ” असें हिरण्यकेशिसूत्र आहे. ऋतु म्हणजे “ ब्राह्मणानें वसंतऋतूंत आधान करावें. ” इत्यादिवाक्यप्रतिपादित वसंत ऋतु जाणावा. रेणुकारिकेंततर - “ माघादि पांच मास, श्रावण, आश्विन, मार्गशीर्ष, या मासांत शुक्लपक्षीं आधान करावें ” असें सांगितलें आहे. याविषयीं मूळवचन शोधावें. आधाननक्षत्रें सांगतो - आपस्तंबसूत्रांत - “ कृत्तिका, रोहिणी, मृगशीर्ष, पुनर्वसु, पुष्य, पूर्वा, उत्तरा, पूर्वाषाढा, उत्तराषाढा, हस्त, चित्रा, विशाखा, अनुराधा, श्रवण, आणि उत्तराभाद्रपदा. ”
सोमपूर्वाधानेविशेषमाह आपस्तंबः सोमेनयक्ष्यमाण आदधानोनर्तून्सूर्क्षेन्ननक्षत्रमिति अत्रप्रकरणादाधानकालबाधः तेनसोमस्यवसंतकालतानबाध्यत इतिरुद्रदत्तवृत्तौनारायणवृत्तौचोक्तम् । तंत्ररत्नेवार्तिकेच तेवाएतेउभयेअपहतपाप्मानोऋतवः एषवाउद्यन्नादित्यएषांपाप्मनोपहंता यदैवैनंकदाचनयज्ञमुपनमेदथादधीतेत्यत्रोत्तरायणरुपंदैवंदक्षिणायनरुपंचपित्र्यमित्युभयमृतुत्रयंसोमाधानेशतपथेविशिष्यविहितम्
तदेकवाक्यतयाशाखांतरेनर्तून्सूर्क्षेदित्यत्रसोमकालबाधएव आधानकालबाधस्ययदैवैनंश्रद्धोपनमेत्तदादधीतेत्यस्यांशाखायांवाक्यांतरेणसिद्धत्वात्सोमकालबाधार्थमेवेदमित्युक्तं ।
सोमपूर्वाधानाविषयीं विशेष सांगतो - आपस्तंब - “ सोमयाग करण्याकरितां आधान करणारा यानें ऋतु, नक्षत्र यांचा विचार करुं नये. ” ह्या स्थलीं, प्रकरणवशेंकरुन पूर्वोक्त आधानकालाचा बाध होतो, म्हणून सोमयागाविषयीं जो वसंतकाल सांगितला तो बाधित होत नाही, असें रुद्रदत्तवृत्तींत व नारायणवृत्तींत सांगितलें आहे. तंत्ररत्नांत - वार्तिकांत “ दक्षिणायनांतील तीन व उत्तरायणांतील तीन असे हे सहा ऋतु निष्पाप होत, उदय पावणारा हा सूर्य या ऋतूंचीं पापें दूर करितो; ज्या कोणत्याही कालीं ( ऋतूंत ) यज्ञ करावयाचा असेल तत्कालीं आधान करावें ” ह्या वाक्यांत उत्तरायणरुप तीन ऋतु देवकर्माचे आणि दक्षिणायनरुप तीन ऋतु पित्र्यकर्माचे, ते हे सहा ऋतु, सोमाच्या आधानाविषयी शतपथब्राह्मणांत विशेषेंकरुन सांगितले आहेत, त्यांची एकवाक्यता केली असतां, अन्य शाखेचे ठायीं “ ऋतु, नक्षत्रें यांचा विचार करुं नये ” असें जें सांगितलें, तेथें सोमकालाचा ( वसंताचा ) च बाध होतो. आधानकालाचा बाध “ ज्या कालीं श्रद्धा उत्पन्न होईल त्या कालीं आधान करावें ” ह्या शाखेच्या या दुसर्या वाक्यानें सिद्ध होतो, म्हणून सोमकालाचा बाध होण्यासाठींच हें वरील ( आपस्तंबाचें ) वाक्य होय, असें सांगितलें आहे.
धूर्तस्वामीतुसोमस्यापियऋतुस्तस्यापिनसूर्क्षेदितिलिखनादुभयकालबाधंमन्यते श्रीरामांडारस्तु कालांतरविधानंवासर्वकालानादरोवेतिपक्षद्वयमुक्तवान् तत्राद्येकृत्तिकादिकालांतरस्ययथाधानेवसंताद्यबाधेनविधानम् तथासोमेप्युदगयनपूर्वपक्षपुण्याहसन्निपातेयज्ञकालोनादेशइतिछंदोगसूत्रोक्तोदगयनाबाधेनसोमाभिसंधिरुपकालांतरविधानादुदगयनंत्वपेक्षतइत्युक्तम् द्वितीयपक्षेतुयदैवैनंयज्ञउपनमेदितिसर्वकालानादरउक्तइतिभरद्वाजसूत्रात्सर्वशब्दस्यचविश्वजित्सर्वपृष्ठइतिवद्दूयोरप्रयोगात्सर्वकालबाधइति तेनदक्षिणायनेपिभवतीत्युक्तम् षड्गुरुभाष्येदेवत्रातभाष्येतंत्ररत्नेचषट्स्वपिऋतुषुभवतीत्युक्तमितिदिक् ।
धूर्तस्वामी ( म्हणजे आपस्तंबसूत्रावरील भाष्यकार ) तर “ सोमयागाचाही जो ऋतु त्याचाही विचार करुं नये ” असें सूत्र आहे म्हणून तो सोमकाल व आधानकाल या दोनही कालांचा बाध मानितो. श्रीरामांडार ( आपस्तंबसूत्रावरील भाष्याची व्याख्या करणारा ) तर ( आपस्तंबवचनानें ) इतरकालाचें विधान किंवा सर्व कालाचा अनादर केला आहे, असे दोन पक्ष सांगता झाला. त्यांमध्यें, प्रथमपक्षीं जसें आधानाविषयीं वसंतादिकालाचा बाध न करितां कृत्तिकादि इतरकालाचें विधान केलें, तसेंच सोमयागाविषयींही “ जेथें काल सांगितला नाहीं तेथें उत्तरायण, शुक्लपक्ष, पुण्यदिवस हीं तीन प्राप्त असतां तो यज्ञकाल होतो ” ह्या छंदोगसूत्रांत उक्त उत्तरायणाचा बाध न करितां सोमाभिसंधि ( सोमेच्छा ) रुप दुसर्या कालाचें विधान केल्यावरुन उत्तरायण तर पाहिजे, असें सांगितलें. दुसर्या ( सर्वकालानादर ) पक्षीं तर, “ ज्या कालीं ह्याला यज्ञ करण्याची इच्छा होईल, या वाक्यानें सर्व कालाचा अनादर उक्त आहे ” ह्या
भरद्वाजसूत्रावरुन “ विश्वजित्सर्वपृष्ठः ” या वाक्याचे ठायीं जसा दोहोंविषयीं सर्वशब्दाचा प्रयोग संभवत नाहीं, तद्वत् येथेंही दोघांचा ( शुक्लपक्ष व पुण्यदिवस म्हणजे नक्षत्र यांचा ) बाध करण्यासाठीं सर्वशब्द नव्हे आहे, तर सर्वं उक्त कालाचा बाध होण्याकरितां आहे. म्हणून दक्षिणायनांतही सोमाधान होतें असें सांगितलें. षड्गुरुभाष्य, देवत्रातभाष्य, व तंत्ररत्न या ग्रंथांतही सहाही ऋतूंचे ठायीं सोमाधान होतें असें सांगितलें आहे. याप्रमाणें हें दिक्प्रदर्शन केलें आहे.