प्रथम परिच्छेद - संक्रांतिनिर्णय
निर्णयसिंधु ग्रंथामध्ये कोणत्या कर्माचा कोणता काल, याचा मुख्यत्वेकरून निर्णय केलेला आहे.
सौरमासप्रसंगात्संक्रांतिनिर्णयउच्यते तत्र पूर्वतोपिपरतोपिसंक्रमात्पुण्यकालघटिकास्तुषोडशेतिसामान्यतःपुण्यकालःसर्वैरुक्तः विशेषस्तूच्यते अत्रमामकाःसंग्रहश्लोकाः प्रागूर्ध्वादशपूर्वतःषडवनिस्तद्वत्पराःपूर्वतस्त्रिंशत्षोडशपूर्वतोथपरतःपूर्वाःपराःस्युर्दश पूर्वाः षोडशचोत्तराऋतुभुवःपश्चात्खवेदाःपुनःपूर्वाःषोडशचोत्तराः पुनरथोपुण्यास्तुमेषादितः अस्यार्थः मेषेप्रागूर्ध्वंचदशघटिकाःपुण्यकालःवृषेपूर्वाःषोडश मिथुने पराःषोडश कर्केपूर्वास्त्रिंशत् सिंहेपूर्वाःषोडश कन्यायांपराः षोडश तुलायांप्रागूर्ध्वादश वृश्चिकेपूर्वाःषोडश धनिषिपराःषोडश मकरेचत्वारिंशत्पराः इदंचहेमाद्रिमतेनोक्तम् माधवमतेत्वत्रपराविंशतिःपुण्याः कुंभेपूर्वाःषोडश मीनेपराःषोडशेति याप्युत्तरापुण्यतमामयोक्तासायंभवेत्सायदिसापिपूर्वा पूर्वातुयोक्तायदिसाविभातेसाप्युत्तरारात्रिनिषेधतःस्यात् अर्वाड् निशीथाद्यदिसंक्रमःस्यात्पूर्वेह्निपुण्यंपरतःपरेह्नि आसन्नयामद्वयमेवपुण्यंनिशीथमध्येतुदिनद्वयंस्यात् कर्केझषेप्येवमितिह्युवाचहेमाद्रिसूरिश्चतथापरार्कः झषःप्रदोषेयदिवार्धरात्रेपरेह्निपुण्यंत्वथकर्कटश्चेत् प्रभातकालेयदिवानिशीथेपूर्वेह्निपुण्यंत्वितिमाधवार्यः अत्रमूलवचनानिमाधवापरार्कहेमाद्यादिषुद्रष्टव्यानि ।
सौर मासाच्या प्रसंगानें संक्रांतिनिर्णय सांगतो.
‘ संक्रांतिप्रवेशापासून पूर्वी व पश्चात् सोळा सोळा घटिका पुण्यकाळ ’ याप्रमाणें सर्व ग्रंथकरांनीं सामान्येंकरुन पुण्यकाळ सांगितला आहे. विशेष सांगतों - एथें माझे संग्रह श्लोक - " मेषसंक्रांतीच्या पूर्व दहा व पर दहा घटिका पुण्यकाळ. ‘ वृषभसंक्रांतीच्या पूर्व सोळा घटिका पुण्यकाळ. मिथुनसंक्रांतीच्या पुढच्या सोळा घटिका पुण्यकाळ. कर्कसंक्रांतीच्या पूर्वीच्या तीस घटिका पुण्यकाळ. सिंहसंक्रांतीच्या पूर्वीच्या सोळा घटिका पुण्यकाळ. कन्यासंक्रांतीच्या पुढच्या सोळा घटिका पुण्यकाळ. तुलासंक्रांतीच्या पूर्वीच्या १० व पुढच्या १० घटिका पुण्यकाळ. वृश्चिकसंक्रांतीच्या पूर्वीच्या १६ घटिका. धनुःसंक्रांतीच्या पुढच्या १६ घटिका पुण्यकाळ. मकरसंक्रांतीच्या पुढच्या ४० घटिका. ह्या मकरसंक्रांतीच्या पुण्यकाळ घटिका हेमाद्रिमर्ती सांगितल्या. माधवमतीं तर पुढच्या वीस घटिका पुण्यकाळ. कुंभसंक्रांतीच्या पूर्वीच्या सोळा. मीनसंक्रांतीच्या पुढच्या सोळा घटिका पुण्यकाळ. ज्या संक्रांतीचा पुण्यकाळ, संक्रांति झाल्यावर पुढें सांगितला, ती संक्रांति सायंकाळीं होईल तर तिचाही पुण्यकाळ पूर्वी समजावा. आणि जिचा पर्वकाळ संक्रांति होण्याच्या पूर्वी सांगितला, ती प्रातःकाळीं होईल तर तिचा पर्वकाळ पुढें समजावा. कारण, पर्वकाळाचा रात्रौ निषेध आहे. मध्यरात्रीच्या पूर्वी संक्रांत होईल तर पूर्वदिवसाचें उत्तरार्ध पुण्यकाळ. मध्यरात्रीच्या पुढें संक्रांत होईल तर दुसर्या दिवसाचें पूर्वार्ध पुण्यकाळ. मध्यरात्रींच संक्रांत होईल तर पूर्व दिवसाचें उत्तरार्ध आणि दुसर्या दिवसाचें पूर्वार्ध असा दोनही दिवशीं पुण्यकाळ. कर्क व मकर ह्या संक्रांतींचाही असाच निर्णय होतो, असें हेमाद्रि व अपरार्क सांगतात. मकरसंक्रांत प्रदोषकाळीं किंवा मध्यरात्रीं होईल तर दुसर्या दिवशीं पुण्यकाळ. कर्कसंक्रांत प्रातःकाळीं किंवा मध्यरात्रीं होईल तर पूर्वदिवशीं पुण्यकाळ, असें माधवाचार्य सांगतो. " ह्यांचीं मूलवचनें माधव, अपरार्क, हेमाद्रि इत्यादिक ग्रंथांत पहावीं.
N/A
References : N/A
Last Updated : May 09, 2013
TOP