मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|निर्णयसिंधु|प्रथम परिच्छेद|
श्राद्धाविषयीं अमावास्येचा निर्णय

प्रथम परिच्छेद - श्राद्धाविषयीं अमावास्येचा निर्णय

निर्णयसिंधु ग्रंथामध्ये कोणत्या कर्माचा कोणता काल , याचा मुख्यत्वेकरून निर्णय केलेला आहे .


श्राद्धेत्वमावास्यात्रेधाविभक्तदिनतृतीयांशेयोऽपराह्णभागस्तव्द्यापिनीसाग्निकैर्ग्राह्या पिंडान्वाहार्यकश्राद्धंक्षीणेराजनिशस्यते वासरस्यतृतीयेंशेनातिसंध्यासमीपतइतिकात्यायनोक्तेः दर्शश्राद्धंतुयत्प्रोक्तंपार्वणंतत् ‍ प्रकीर्तितम् ‍ अपराह्णेपितृणांचतत्रदानंप्रशस्यत इतिशातातपोक्तेश्च दिनद्वयेतत्रसत्त्वेसर्वापराह्णव्यापीदर्शोग्राह्यः यद्युभयेद्युरेषविहितः सर्वापराह्णस्थित इतिदीपिकोक्तेः यत्तुकार्ष्णाजिनिः भूतविद्धाममावास्यांमोहादज्ञानतोपिवा श्राद्धकर्मणियेकुर्युस्तेषामायुः प्रहीयत इति तदपराह्णेचतुर्दशीवेधपरमितिश्राद्धहेमाद्रिः अपराह्णाव्याप्तिपरमितिमाधवः दिनद्वयेऽपराह्णव्याप्त्यभावेंऽशतोव्याप्तौचतिथिक्षयेपूर्वेतिहेमाद्रिः यदाचतुर्दशीयामंतुरीयमनुपूरयेत् ‍ अमावास्याक्षीयमाणातदैवश्राद्धमिष्यत इतिकात्यायनोक्तेः चतुर्दश्याश्चतुर्थंयामंदर्शः पूरयेत् ‍ चतुर्दशीयामत्रयंस्यादित्यर्थः क्षीयमाणापरदिनेऽपराह्णव्यापिनीनेत्यर्थः ।

श्राद्धाविषयीं अमावास्येचा निर्णय सांगतो .

दिवसाचे तीन भाग करुन तिसर्‍या भागांत जो अपराह्णकाल तत्कालव्यापिनी अमावास्या दर्शश्राद्धाविषयीं साग्निकांनीं घ्यावी ; कारण , " पिंडान्वाहार्यकश्राद्ध ( दर्शश्राद्ध ) चंद्रमा क्षीण असेल त्या दिवशीं ( अमावास्येस ) दिवसाच्या तिसर्‍या भागांत करावें , संध्याकाळच्या फार जवळ करुं नये " असें कात्यायनवचन आहे . आणि " दर्शश्राद्ध जें तेंच पार्वणश्राद्ध म्हटलें आहे , त्याविषयीं जें पितरांस द्यावयाचें तें अपराह्णकालीं द्यावें हें प्रशस्त होय " असें शातातपवचनही आहे . दोन दिवशीं अमावास्येची अपराह्णव्याप्ति असेल तर सर्व अपराह्णकालव्याप्ति ज्या दिवशीं असेल ती घ्यावी . कारण , " जर दोन दिवशीं दर्श अपराह्णांत असेल तर सर्व अपराह्णांत असलेला घ्यावा " असें दीपिकावचन आहे . आतां जें कार्ष्णाजिनि - " मोहानें किंवा अज्ञानानें चतुर्दशीविद्ध अमावास्या श्राद्धकर्माविषयीं जे घेतात त्यांचें आयुष्य क्षीण होतें " असें वचन , तें अपराह्णकालीं चतुर्दशीवेध असेल तर तद्विषयक आहे असें श्राद्धहेमाद्रि सांगतो . अपराह्णकालीं दर्शाची अव्याप्ति असेल तर तद्विषयक तें वचन असें माधव सांगतो . दोन दिवशीं अपराह्णव्याप्ति नसेल , किंवा दोन दिवशीं अंशतः व्याप्ति असेल तर तिथिक्षय असतां पूर्वा घ्यावी असें हेमाद्रि सांगतो ; कारण , " जेव्हां चतुर्दशी तीन प्रहर असून नंतर

अमावास्या , व दुसर्‍या दिवशीं अपराह्णकालीं अमावास्या नसेल तेव्हां पूर्वदिवशींच श्राद्ध करावें " असें कात्यायनवचन आहे .

व्यतिरेकमाह वर्धमानाममावास्यांलक्षयेदपरेहनि यामांस्त्रीनधिकांवापिपितृयज्ञस्ततोभवेत् ‍ ततःश्राद्धंच दिनद्वयेऽपराह्णव्याप्त्यादौतिथिवृद्धौचहारीतः त्रिमुहूर्ताचकर्तव्यापूर्वाखर्वाचबह्वृचैः कुहूरध्वर्युंभिः कार्यायथेष्टंसामगीतिभिः त्रिमुहूर्ताभावेतुपूर्वानेत्यर्थः ।

याच्या विपरीत सांगतो - " दुसर्‍या दिवशीं तीन प्रहर किंवा अधिक अमावास्या असून वृद्धिगामिनी असेल तर त्या दिवशीं पिंडपितृयज्ञ करुन दर्शश्राद्ध करावें . दोन दिवशीं अंशतः अपराह्णव्याप्ति असतां व तिथिवृद्धि असतां सांगतो - हारीत - " पूर्वदिवशीं अमावास्या तीन मुहूर्त असून समा किंवा वृद्धिगामिनी आहे तरी बह्वृक् ‍ शाखीयांनीं तीच चतुर्दशीयुक्त घ्यावी , तीन मुहूर्तांपेक्षां कमी असेल तर पूर्वा घेऊं नये . यजुर्वेद्यांनीं परा घ्यावी आणि सामवेद्यांनीं पूर्वा किंवा परा यथेष्ट घ्यावी . "

पिंडपितृयज्ञस्तुकात्यायनैर्यागदिनात्पूर्वेद्युः कार्यः पूर्वोवांगत्वात् ‍ पिंडपितृयज्ञ इतितत्सूत्रात् ‍ व्याख्यातंचैतत् ‍ कर्काचार्यैः पूर्वएवदर्शात्पिंडपितृयज्ञोनपश्चात् ‍ कुतः अंगत्वात् ‍ तथाचश्रुतिः तस्मात्पूर्वेद्युः पितृभ्यः क्रियत उत्तरमहर्देवान्यजंत इति पूर्वेद्युपितृभ्योयज्ञंनिपृणीयप्रातर्देवेभ्यः प्रतनुत इतिच तेनतन्मतेअंगमेवासौ तदुक्तम् ‍ अंगंवासमभिव्याहारादिति तेनकर्कमतेचतुर्दशीयुक्तदर्शेपिंडपितृयज्ञ इति श्रीअनंतभाष्येतु परेद्युरित्युक्तम् ‍ अत्रद्वेधाप्याचारोदृश्यते ।

कात्यायनशाखी यांनीं पिंडपितृयज्ञ तर यागदिवसाच्या पूर्वदिवशीं करावा ; कारण , " पिंडपितृयज्ञ हा दर्शाचें अंग आहे यास्तव पूर्वी करावा " असें कात्यायनसूत्र आहे . कर्काचार्यांनीं त्या सूत्राची व्याख्या केली आहे , ती अशीः - " दर्शश्राद्धाच्या पूर्वीच पिंडपितृयज्ञ करावा , पश्चात् ‍ करुं नये ; कारण , तो पिंडपितृयज्ञ दर्शश्राद्धाचें अंग आहे . " तशीच श्रुति आहे , ती अशीः - " यागाच्या पूर्वदिवशीं पितरांचें यजन व उत्तरदिवशीं देवांचें यजन करितात . " " पूर्वदिवशीं पितरांस यजन करुन दुसर्‍या दिवशीं देवांचा यज्ञ करावा " असेंही श्रुतिवाक्य आहे , म्हणून त्यांच्या मतानें पिंड पितृयज्ञ हा अंगभूत आहे , तें सांगतो - " पिंडपितृयज्ञ हा पार्वणश्राद्धाच्या बरोबर सांगितला आहे , म्हणून तो त्याचें अंग आहे " तेणेंकरुन कर्काचार्यांचे मतीं चतुर्दशीयुक्त दर्शाचे ठायीं पिंडपितृयज्ञ करावा . श्रीअनंताचे भाष्यांत तर पिंडपितृयज्ञ दुसर्‍या दिवशीं करावा असें सांगितलें आहे . याविषयीं दोनही प्रकारचा ( म्हणजे चतुर्दशीयुक्त दर्शाचे दिवशीं किंवा दुसर्‍या दिवशीं करण्याचा ) आचार दृष्टीस पडतो .

आपस्तंबानांतु परदिनेमुहूर्तमपिदर्शसत्त्वेतत्रैवपितृयज्ञः तदाह आपस्तंबः अमावास्यायांयदहश्चंद्रमसंनपश्यतितदहः पिंडपितृयज्ञंकुरुत इति अस्यरुद्रदत्तीयाव्याख्या पिंडैर्युक्तः पितृयज्ञः पिंडपितृयज्ञः सचकर्मांतरं नतुदर्शशेषः यथावक्ष्यति पितृयज्ञः स्वकालविधानादनंगंस्यादिति तंचयदहश्चंद्रमसंनपश्यति पंचदश्यांप्रतिपदिवातदहःकुरुते यदहस्तयोः संधिस्तदहरित्यर्थ इति रामांडारोप्याह पिंडपितृयज्ञस्तुपर्वसंधिमदहोरात्रापराह्ण इति अतः पर्वसंधिदिनेपितृयज्ञः शतपथश्रुतिरपि यदैवैषनपुरस्तान्नपश्चादृश्यतेथपितृभ्योददातीति पर्वसंधिदिनेहिपूर्वतः पश्चाद्वाचंद्रोनदृश्यतएवेत्यर्थः सत्याषाढोपि पितृयज्ञंप्रक्रम्यदृश्यमानेतूपोष्यश्वोभूतेयजतइत्याह ।

आपस्तंबांचा तर दुसर्‍या दिवशीं मुहूर्तमात्र जरी अमावास्या असली तथापि त्याच दिवशीं पिंडपितृयज्ञ होतो . तें आपस्तंब सांगतो - " अमावास्येस ज्या दिवशीं चंद्रमा दृष्टीस पडत नाहीं त्या दिवशीं पिंडपितृयज्ञ करावा . " याची रुद्रदत्त व्याख्या करितो ती अशीः - " पिंडांनीं युक्त जो पितृयज्ञ तो पिंडपितृयज्ञ , हा भिन्न कर्म आहे , दर्शाचें अंग नाहीं ; कारण , तोच आपस्तंब पुढें सांगतो कीं , " पिंडपितृयज्ञ हा आपल्या कालीं विहित असल्यामुळें दुसर्‍याचें अंग होत नाहीं " तो पिंडपितृयज्ञ ज्या अमावास्येस किंवा प्रतिपदेस चंद्र दिसत नाहीं म्हणजे अमावास्या व प्रतिपदा यांच्या संधिदिवशीं करावा . रामांडारही सांगतो - " पिंडपितृयज्ञ करणें तो पर्वसंधियुक्त जें अहोरात्र त्याचे अपराह्णकालीं करावा " असें आहे , म्हणून पर्वसंधिदिवशीं पिंडपितृयज्ञ करावा . शतपथश्रुतिही - " ज्या दिवशीं हा चंद्र , पूर्वेस व पश्चिमेसही दिसत नाहीं त्या दिवशीं पितरांस द्यावें . " पर्वसंधीच्या दिवशीं पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे चंद्रदर्शन होत नाहींच असा अर्थ . सत्याषाढही - पितृयज्ञाचा उपक्रम करुन " ज्या दिवशीं चंद्र दिसत असेल त्या दिवशीं अन्वाधान करुन दुसर्‍या दिवशीं याग करावा " असें सांगतो .

हेमाद्रिस्तु अमावास्याशब्दस्तिथिवचनएव पूर्वोक्तापस्तंबसूत्रेयदुक्तंनपश्यतीति तत्रक्षयोभिप्रेतः अतश्चतुर्दश्यांचंद्रमसश्चक्षीणत्वात्तद्युक्तदर्शेपितृयज्ञः पितृयज्ञंतुनिर्वर्त्यविप्रश्चंद्रक्षयेऽग्निमानितिमनूक्तेः यदुक्तंयदहस्त्वेवदर्शनंनैतिचंद्रमाः तत्क्षयापेक्षयाज्ञेयंक्षीणेराजनिचेत्यपीति यदुक्तंदृश्यमानेपितच्चतुर्दश्यपेक्षयेतिचकात्यायनोक्तेः दृश्यमानेप्येक इतिगोभिलोक्तेः यस्यांसंध्यागतः सोमोमृणालमिवदृश्यते अपराह्णेक्षयस्तस्यांपिंडानांकरणंध्रुवमितिहारीतोक्तेश्च चंद्रक्षयकालश्चोक्तः कात्यायनेन अष्टमेंशेचतुर्दश्याः क्षीणोभवतिचंद्रमाः अमावास्याष्टमेंशेतुपुनः किलभवेदणुरिति तेनपूर्वेद्युरेवपितृयज्ञ इत्यूचिवान् ‍ कर्काचार्यैरपि अपराह्णेपिंडपितृयज्ञचंद्रादर्शनेमावास्यायामितिकात्यायनसूत्रेऽदर्शनेनक्षयएवोक्तः तस्मिन् ‍ क्षीणे ददातीतिश्रुतेः अतस्तन्मतेचतुर्दशीयुक्तदर्शेपितृयज्ञेसतिपरदिनेयागोर्थात्सिद्धः तदेतत्सर्वोत्कृष्टमपिहेमाद्रिकर्कादिव्याख्यानमापस्तंबैरनभ्युपगमात्कातीयबौधायनादिविषयम् ‍ ।

हेमाद्रि तर - अमावास्याशब्द तिथिवाचीच आहे , तदंत्यक्षणवाची नाहीं . पूर्वोक्तापस्तंबसूत्रांत , जें सांगितलें कीं , अमावास्येस ज्या दिवशीं चंद्र दिसत नाहीं , त्या ठिकाणीं चंद्राचा क्षय समजावयाचा . म्हणून चतुर्दशीस चंद्र क्षीण असल्यामुळें चतुर्दशीयुक्त अमावास्येस पिंडपितृयज्ञ होतो ; कारण , " साग्निक ब्राह्मणानें चंद्रक्षययुक्त दिवशीं पिंडपितृयज्ञ करुन " असें मनूनें सांगितलें आहे . आतां जें सांगितलें आहे कीं , " ज्या दिवशीं चंद्रमा दृष्टिगोचर होत नाहीं " इत्यादि , तें सांगणें चंद्राचा क्षय असल्यामुळें समजावें . दर्शश्राद्ध , राजा म्हणजे चंद्रमा क्षीण असतां प्रशस्त , असेंही सांगितलें आहेच . " चंद्र दृष्टिगोचर असतांही होतो " असें जें सांगितलें आहे तें चतुर्दशीविषयक होय , असें कात्यायनानें सांगितलें आहे . " चंद्र दिसत असतांही होतो असें कितीएक म्हणतात " असें गोभिलवचन आहे . " आणि ज्या अमावास्येस प्रातःकालीं चंद्रमा कमलाचे बिसासारखा दिसतो , त्याचा अपराह्णीं क्षय होतो , त्या अमावास्येस निश्चयें पिंडपितृयज्ञ करावा " असें हारीत वचनही आहे . चंद्रक्षयाचा काल सांगतो - कात्यायन - " चतुर्दशीच्या आठव्या अंशीं चंद्र क्षीण होतो , आणि अमावास्येच्या आठव्या अंशीं पुनः अणुप्रमाण होतो " अशा ह्या सर्व प्रमाणांवरुन पूर्व दिवशींच पिंडपितृयज्ञ करावा असें ( हेमाद्रि ) सांगता झाला . कर्काचार्यांनीं देखील " अमावास्येस चंद्राचें अदर्शन असतां अपराह्णकालीं पिंडपितृयज्ञ होतो " ह्या कात्यायनसूत्रांत अदर्शनशब्देंकरुन क्षयच घ्यावा , असें सांगितलें आहे . " चंद्र क्षीण असतां द्यावें " अशी श्रुति आहे , यावरुन कर्काचार्याचे मतीं चतुर्दशीयुक्त अमावास्येस पिंडपितृयज्ञ झाला असतां दुसर्‍या दिवशीं याग अर्थात्सिद्ध आहे . असें हें पूर्वोक्त हेमाद्रि कर्काचार्य इत्यादिक ग्रंथकारांचें व्याख्यान जरी सर्वोत्कृष्ट आहे , तथापि तें आपस्तंबांनीं परिगृहीत नसल्यामुळें तें कात्यायन - बौधायनादि विषयक जाणावें .

आश्वलायनानामपिशेषपर्वणिपिंडपितृयज्ञः तथाचसूत्रम् ‍ अमावास्यायामपराह्णेपिंडपितृयज्ञ इति अत्रनारायणवृत्तिः अमावास्याशब्दः प्रतिपत्पंचदश्योः संधिवचनोप्यत्रापराह्णशब्दसमन्वयात्तद्वत्यहोरात्रेवर्तते तस्यापराह्णेऽह्नश्चतुर्थभागेपिंडपितृयज्ञः कार्यः औपवसथ्येयजनीयेवाहनि यदात्वहोरात्रसंधौतिथिसंधिःस्यात्तदौपवसथ्ये एवाहनिक्रियत इति अतएव मुहूर्तमप्यमावास्याप्रतिपद्यपिचेद्भवेत् ‍ तद्दत्तमक्षयंज्ञेयंपर्वशेषंतुपर्ववदितिहेमाद्रौवचनंपिंडपितृयज्ञपरमुक्तंप्रयोगपारिजाते अयंचस्मार्ताग्निमतासंपूर्णेदर्शेश्राद्धव्यतिषंगेणकार्यः व्यतिषंगोनामोभयोः सहानुष्ठानम् ‍ एतच्चस्थालीपाकेनसहपिंडार्थमुद्धृत्येतिसूत्रेवृत्तिकृतोक्तम् ‍ खंडपर्वणितुकेचिदाहुः पूर्वेह्निपिंडपितृयज्ञव्यतिषंगेणश्राद्धंकृत्वापरेह्निकेवलः पिंडपितृयज्ञः कार्यः वृत्तिकृतात्वन्वष्टक्यंचपूर्वेद्युर्मासिमास्यथपार्वणं काम्यमाभ्युदयेष्टम्यामेकोद्दिष्टमथाष्टममित्युदाह्रत्यपूर्वेषुचतुर्षुस्थालीपाकादुद्धृत्याग्नौकरणमित्युक्तेर्दर्शश्राद्धेस्थालीपाकोनियत इतिगम्यते स्थालीपाकश्चपितृयज्ञएवेतिपूर्वदिनेव्यतिषंगः सिद्धः प्रयोगपारिजातेतुवार्षिकश्राद्धादेरपिव्यतिषंगउक्तः किमुतदर्शश्राद्धस्य ।

आश्वलायनांचाही ही शेष ( उर्वरित ) पर्वाचे ठायीं पिंडपितृयज्ञ होतो . त्याविषयीं आश्वलायनसूत्र - " अमावास्येस अपराह्णकालीं पिंडपितृयज्ञ करावा . " या सूत्रावरची नारायणवृत्ति अशी - अमावास्या हा शब्द , प्रतिपदा व पंचदशी ( अमावास्या ) यांच्या संधीचा वाचक जरी आहे , तथापि ह्या स्थलीं अपराह्णशब्दाशीं त्याचा समन्वय ( संबंध ) असल्यामुळें संधियुक्त अहोरात्राचा वाचक होतो . त्या संधियुक्त दिवसाचे पांच भाग करुन चवथा भाग जो अपराह्ण , त्यांत पिंडपितृयज्ञ करावा . तो पिंडपितृयज्ञ अन्वाधानाच्या दिवशीं किंवा यागाच्या दिवशीं होतो . ज्या कालीं दिवस आणि रात्र यांच्या संधीचे ठायीं तिथिसंधि होईल , त्या कालीं अन्वाधानाच्या दिवशींच पिंडपितृयज्ञ करावा . म्हणूनच " प्रतिपदेस मुहूर्तमात्र जरी अमावास्या असेल तरी त्या दिवशीं जें दिलें तें अक्षय होतें ; कारण , पर्वशेष हें पर्वासारखेंच फलदायक होय " असें हेमाद्रींतील वचन पिंडपितृयज्ञविषयक होय , असें प्रयोगपारिजातांत सांगितलें आहे . संपूर्ण अमावास्या असतां दर्शश्राद्ध व पिंडपितृयज्ञ हे दोन्ही एका दिवशीं प्राप्त होतील तेव्हां दर्शश्राद्धाच्या व्यतिषंगानें ( बरोबर ) हा पिंडपितृयज्ञ करावा . व्यतिषंग म्हणजे दोहोंचें बरोबर अनुष्ठान करणें . हा प्रकार " स्थालीपाकेन सह पिंडार्थमुद्धृत्य " ह्या सूत्रावर वृत्तिकारानें सांगितला आहे . खंडपर्व ( अमावास्या ) असतां कोणी असें म्हणतात कीं , पूर्व दिवशीं पिंडपितृयज्ञ व्यतिषंगेंकरुन श्राद्ध करुन दुसर्‍या दिवशीं केवळ पिंडपितृयज्ञ करावा ; कारण , वृत्तिकारानें " १ अन्वष्टक्यश्राद्ध , २ पूर्वेद्युश्राद्ध , ३ मासिमासिश्राद्ध , ४ पार्वणश्राद्ध ( दर्शश्राद्ध ), ५ काम्यश्राद्ध , ६ अभ्युदयश्राद्ध , ७ अष्टमीश्राद्ध , ८ एकोद्दिष्ठ , " अशीं हीं आठ श्राद्धें सांगून पहिल्या चार श्राद्धांमध्यें स्थालीपाकांतून अन्न घेऊन अग्नौकरण करावें असें सांगितलें आहे . म्हणून दर्शश्राद्धाचे ठायीं स्थालीपाक निश्चित आहे असें सूचित होतें . तो स्थालीपाक पिंडपितृयज्ञांतच होत असल्यामुळें पूर्व दिवशीं पिंडपितृयज्ञ व दर्शश्राद्ध यांचा व्यतिषंग ( दोघांचें बरोबर अनुष्ठान ) सिद्ध झाला . प्रयोगपारिजातांत तर वार्षिक श्राद्धादिकांचाही व्यतिषंग सांगितला आहे , मग दर्शश्राद्धाचा व्यतिषंग आहे , हें काय सांगावें ?

न्यायविदस्त्वाहुः सूत्रस्यवृत्तेश्चसंपूर्णदर्शविषयत्वात् ‍ खंडपर्वणिपूर्वदिनेकेवलंश्राद्धंपरदिनेचकेवलः पितृयज्ञः कार्यः अतएवोक्तंवृत्तिकृता नात्रापूर्वःस्थालीपाकश्चोद्यतेसर्वश्राद्धेषुप्रसंगादितिप्रयोगपारिजातोक्तिरप्येतद्विषयैव पूर्वदिनेचश्राद्धेग्नौकरणमेवनपाणिहोमः चतुर्ष्वाद्येषुसाग्नीनांवह्नौहोमोविधीयते पित्र्यब्राह्मणहस्तेस्यादुत्तरेषुचतुर्ष्वपीतिपरिशिष्टेनियमात् ‍ नचलौकिकाग्नौपक्कस्यकथंगृह्याग्नौहोमः नान्याग्नौपक्कमन्याग्नौजुहुयादितिनिषेधात् ‍ मैवं श्राद्धस्यगृह्यत्वेनस्मार्ताग्नौपचनाग्नौवाकर्तव्यत्वात् ‍ तस्मात्पूर्वेद्युः केवलंश्राद्धंनव्यतिषंगः इदमेवचयुक्तं आहिताग्निनातुसर्वाधानिनार्धाधानिनावासंपूर्णेखंडेवादर्शेश्रौताग्नौपृथगेवपितृयज्ञः कार्योनतुदर्शश्राद्धव्यतिषंगेणेतिविस्तरभीतेर्विरमामः ।

न्यायवेत्ते तर असें म्हणतात कीं , " सूत्र आणि त्यावरची वृत्ति ही पूर्ण दर्शविषयक आहे , म्हणून खंडपर्वं ( दर्श ) असतां पूर्व दिवशीं केवळ श्राद्ध करुन दुसर्‍या दिवशीं पिंडपितृयज्ञ करावा . म्हणूनच वृत्तिकारानें सांगितलें कीं , " ह्या दर्शश्राद्धाविषयीं अपूर्व स्थालीपाक सांगत नाहीं ; जर सांगितला तर त्याची सर्व श्राद्धांमध्यें प्रसक्ति होईल ! " प्रयोगपारिजातांत जो व्यतिषंग सांगितला तो देखील पूर्ण दर्शविषयकच समजावा . पूर्व दिवशीं करावयाच्या दर्शश्राद्धांत अग्नौकरणच करावें , ब्राह्मणाच्या हातावर होम करुं नये ; कारण , " साग्निकांनीं पहिल्या चार श्राद्धांमध्यें अग्नींत होम करावा , आणि पुढच्या चार श्राद्धांमध्यें पित्रादिस्थानीं बसलेल्या ब्राह्मणाच्या हस्तावर होम करावा " असा परिशिष्टांत नियम आहे . शंका - " लौकिकाग्नीवर जें पक्क झालें त्याचा होम गृह्याग्नीवर कसा होईल ? कारण , एका अग्नीवर पक्क झालेल्याचा होम दुसर्‍या अग्नीवर करुं नये , असा निषेध आहे . समाधान - श्राद्ध गृह्य असल्यामुळें तें गृह्याग्नीवर किंवा पचनाग्नीवर करावें असें आहे . यास्तव पूर्वदिवशीं केवळ श्राद्ध करावें ; व्यतिषंग ( दोन बरोबर ) करुं नये , हेंच योग्य आहे . जो आहिताग्नि ( श्रौताग्निमान् ‍ ) तो अर्धाधानी असो किंवा सर्वाधानी असो , त्यानें पूर्ण किंवा खंड दर्श असला तथापि श्रौताग्नीवर निराळाच पिंडपितृयज्ञ करावा . दर्शश्राद्धाच्या व्यतिषंगानें करुं नये . आतां विस्तारभयास्तव पुरे करितों .

संपूर्णेदर्शेचविशेषमाहलौगाक्षिः पक्षांतंकर्मनिर्वर्त्यवैश्वदेवंचसाग्निकः पिंडयज्ञंततः कुर्यात्ततोन्वाहार्यकंबुध इति पक्षांतंकर्मान्वाधानं अन्वाहार्यकंदर्शश्राद्धं अयमेवसाग्नेर्जीवत्पितृकस्यपिंडपितृयज्ञकालोज्ञेयः तस्यापिकात्यायनेनहोमांतमनारंभोवेत्याम्नानात् ‍ ।

संपूर्ण दर्श असतां विशेष सांगतो - लौगाक्षि - श्रौताग्निमान् ‍ यानें प्रथम अन्वाधान करुन नंतर वैश्वदेव करावा , त्यानंतर पिंडपितृयज्ञ करुन दर्शश्राद्ध करावें . साग्निक ( अग्निमान् ‍ ) अशा जीवत्पितृकाला पिंडपितृयज्ञाचा काल हाच आहे असें समजावें . साग्निक जीवत्पितृकानेंही होमापर्यंत पिंडपितृयज्ञ करावा , अथवा पिंडपितृयज्ञाला आरंभ करुं नये , असें कात्यायनानें सांगितलें आहे .

पिंडपितृयज्ञाकरणेप्रायश्चित्तमाहपराशरमाधवीयेकात्यायनः पितृयज्ञात्ययेचैववैश्वदेवात्ययेपिच भोजनेपतितान्नस्यचरुर्वैश्वानरोभवेदित्यलम् ‍ ।

पिंडपितृयज्ञाचा लोप होईल तर प्रायश्चित्त सांगतो - पराशरमाधवीयांत - कात्यायन - पिंडपितृयज्ञाचा लोप , वैश्वदेवलोप , पतितान्नभोजन यांतून कोणतें एक घडलें असतां वैश्वानर चरुचा होम हें प्रायश्चित्त करावें . हा इतका विचार पुरे आहे .

प्रकृतमनुसरामः निरग्निकादिभिस्त्वमावास्याऽपराह्णव्याप्त्यभावेतुकुतुपकालव्यापिनीग्राह्या भूतविद्धाप्यमावास्याप्रतिपन्मिश्रितापिवा पित्र्येकर्मणिविद्वद्भिर्ग्राह्याकुतुपकालिकीतिहारीतोक्तेः इदंचनिरग्निकादिविषयं सिनीवालीद्विजैः कार्यासाग्निकैः पितृकर्मणि स्त्रीभिः शूद्रैः कुहूः कार्यातथाचानग्निकैर्द्विजैरितिलौगाक्षिवचनात् ‍ अत्रसाग्निरौपासनाग्निरपीतिमदनपारिजातेउक्तम् ‍ कुतुपश्चापराह्नव्याप्त्यलाभेनुकल्पः अपराह्णद्वयाव्यापीयदिदर्शस्तिथिक्षयः आहिताग्नेः सिनीवालीनिरग्न्यादेः कुहूर्मतेतिजाबालिनाऽ‍भावेविधानात् ‍ तेनसाग्नीनांनिरग्नीनांवापराह्णव्यापिन्येवमुख्या तिथिसाम्यवृद्धिक्षयैः समव्याप्तौखर्वादिनानिर्णयः वैषम्येधिका दिनद्वयेपराह्णास्पर्शेकुतुपव्यापिनीतिमाधवः इदमेवयुक्तम् ‍ ।

आतां प्रकृत विषयास अनुसरतों - निरग्निकादिकांनीं , श्राद्धाविषयीं अमावास्या पराह्णव्यापिनी नसेल तर कुतुपकालव्यापिनी घ्यावी ; कारण , " विद्वानांनीं चतुर्दशीयुक्त अमावास्या , किंवा प्रतिपदायुक्त अमावास्या , पित्र्यकर्माविषयीं कुतुपकालव्यापिनी अशी घ्यावी " असें हारीतवचन आहे . हें ( प्रतिपदायुक्त सांगणें ) निरग्निकादिविषयक आहे ; कारण ; " साग्निक द्विजांनीं पित्र्यकर्माविषयीं सिनीवाली ( दृष्टचंद्रा ) अमावास्या करावी ; आणि अग्निविरहितांनीं व स्त्रीशूद्रादिकांनीं कुहू ( नष्ट चंद्रा ) अमावास्या करावी " असें लौगाक्षिवचन आहे . ह्या वचनांत ‘ साग्निक ’ ह्या शब्दानें औपासनाग्निही घ्यावा , असें मदनपारिजातांत सांगितलें आहे . कुतुपकाल हा अपराह्णव्याप्ति मिळत नसेल तर अनुकल्प आहे ; कारण , " दोन दिवशीं अपराह्णकालीं व्याप्ति नसून अमावास्येचा क्षय असेल तर श्रौताग्निमानांनीं सिनीवाली करावी , आणि निरग्निकादिकांनीं कुहू अमावास्या करावी " असें जाबालीनें अपराह्णव्याप्ति नसेल तर निरग्न्यादिकांना कुहूचें विधान केलें आहे ; यास्तव साग्निक अथवा निरग्निक यांस अपराह्णव्यापिनीच मुख्य होय . उभय दिवशीं सारखी एकदेशव्याप्ति असेल व तिथिक्षय असेल तर पूर्वींची घ्यावी , तिथीची वृद्धि असेल किंवा समा तिथि असेल तर दुसर्‍या दिवसाची घ्यावी . ( दोन दिवशीं समव्याप्ति असेल तर वृद्धि , क्षय , समतिथि यांचीं क्रमानें उदाहरणें ; - चतुर्दशी १९ घ० , अमावास्या २३ घ० , दिनमान ३० घ० या उदाहरणीं दोनही दिवशीं सारखी पांच घटिका एकदेशव्याप्ति आहे व चतुर्दशीहून चार घटिकांनीं अमावास्येची वृद्धि आहे , म्हणून परा घ्यावी . चतुर्दशी २३ अमावास्या १९ या उदाहरणांत दोन्ही दिवशीं एक घटिका सारखी व्याप्ति आहे , पण चार घटिकांनीं अमावास्या तिथीचा क्षय आहे यास्तव पूर्वीची घ्यावी . उदाहरण :- चतुर्दशी २१ घ० , अमावास्या २१ घ० या उदाहरणीं दोन दिवशीं तीन घटिका सारखी अंशतः व्याप्ति आहे व तिथीची वृद्धि किंवा क्षय कांहींच नाहीं तर तिथि सम आहे याकरितां दुसर्‍या दिवसाची घ्यावी . दोन दिवशीं पूर्ण अपराह्णव्याप्ति असेल तर तिथीची वृद्धि असल्यामुळें परा घ्यावी . दोन दिवशीं अपराह्णस्पर्श नसेल तेव्हां गृह्याग्नि व श्रौताग्नि यांनीं पहिली घ्यावी , इतरांनीं परा , असें धर्मसिंधूंत आहे . ) दोन दिवशीं विषमव्याप्ति असेल तर जी जधिक असेल ती घ्यावी . दोन दिवशीं अपराह्णीं स्पर्श नसेल तर कुतुपव्यापिनी घ्यावी असें माधव सांगतो . हेंच मत युक्त आहे .

हेमाद्यादिमतेकुतुपव्यापिन्येवनिरग्न्यादेर्मुख्या सिनीवालीदृष्टचंद्रा तथाचव्यासः दृष्टचंद्रासिनीवालीनष्टचंद्राकुहूःस्मृतेति पूर्वदिनेपरदिनएववातव्द्यापित्वेसैवग्राह्या अंशव्यापित्वेवैषम्येधिककालव्यापिनी ग्राह्या दिनद्वयेंशतः समव्याप्तौतिथिक्षयेपूर्वा वृद्धौसाम्येचपरा तिथिक्षयेसिनीवालीतिथिवृद्धौकुहूः स्मृता साम्येपिचकुहूर्ज्ञेयावेदवेदांगवेदिभिरितिप्रचेतोवचनात् ‍ दिनद्वयेसंपूर्णकुतुपव्याप्तिस्तुतिथिवृद्धावेवभवतीत्यनंतरवचनात्परैवेति कुतुपस्त्वह्नोमुहूर्ताविज्ञेयादशपंचचसर्वदा तत्राष्टमोमुहूर्तोयः सकालः कुतुपः स्मृत इतिमात्स्योक्तः तुलादानपितृदेवप्रीत्यर्थोपवासादौतुपराग्राह्येत्यन्यत्रविस्तरः ।

हेमाद्यादिकांच्या मतीं निरग्नादिकांना कुतुपव्यापिनीच मुख्य आहे . ज्या अमावास्येस चंद्रदर्शन होतें ती सिनीवाली . तेंच व्यास सांगतो - " ज्या अमावास्येस चंद्रदर्शन होतें ती सिनीवाली , आणि जी नष्टचंद्रा ती कुहू म्हटली आहे . " पूर्व दिवशीं किंवा दुसर्‍या दिवशींच कुतुपकालव्यापिनी असतां तीच घ्यावी . दोन दिवशींही कमीजास्ती मानानें एकदेशव्याप्ति असेल तर जी अधिकव्याप्ति असेल ती घ्यावी . दोन दिवशीं सारखी एकदेशव्याप्ति असतां तिथिक्षय असेल तर पूर्वीची घ्यावी , आणि तिथिवृद्धि किंवा तिथिसाम्य असेल तर दुसर्‍या दिवसाची घ्यावी . कारण , " तिथिक्षय असतां सिनीवाली ( चतुर्दशीमिश्रित ), तिथिवृद्धि असतां कुहू ( प्रतिपदामिश्रित ), तिथिसाम्य असतां कुहू घ्यावी " असें प्रचेतसाचें वचन आहे . दोन दिवशीं संपूर्ण कुतुपकालव्यापिनी तर तिथिवृद्धि असेल तेव्हांच असते म्हणून ह्या वचनावरुन पराच घ्यावी . कुतुपकाल म्हणजे " दिवसाचे पंधरा मुहूर्त आहेत त्यांपैकीं जो आठवा मुहूर्त तो कुतुपकाल म्हटला आहे . " असा मात्स्योक समजावा . तुलादान , पितृदेवप्रीत्यर्थ उपवासादिक यांविषयीं अमावास्या घेणें ती परा घ्यावी , याचा अन्य ग्रंथीं विस्तार आहे .

दर्शेचमासिकवार्षिकादिश्राद्धप्राप्तौकालादर्शेविशेष उक्तः दर्शस्यचोदकुंभस्यदर्शमासिकयोरपि नित्यस्य चाव्दिकस्यापिदार्शिकाब्दिकयोरपीत्युक्त्वा संपातेदेवताभेदाच्छ्राद्धयुग्मंसमाचरेत् ‍ निमित्तानियतिश्चात्रपूर्वानुष्ठानकारणमिति अत्रक्रमोनिर्णयदीपेउक्तः नष्टचंद्रेयदाकालेक्षयाहदिवसोभवेत् ‍ वैश्वदेवंक्षयश्राद्धंकुर्यात्प्राग्दर्शकर्मणः ।

अमावास्येचे दिवशीं मासिक , वार्षिक इत्यादि श्राद्धें प्राप्त झालीं असतां कालादर्शांत विशेष सांगतो - " दर्शश्राद्ध व उदकुंभश्राद्ध ; किंवा दर्शश्राद्ध व मासिकश्राद्ध ; अथवा नित्यश्राद्ध व वार्षिकश्राद्ध ; किंवा दर्शश्राद्ध व वार्षिकश्राद्ध अशीं एक दिवशीं दोन दोन प्राप्त असतां असें सांगून देवताभेद असल्यामुळें दोन्हीं श्राद्धें करावीं , त्यांमध्यें ज्याचें निमित्त नियत ( ठरलेलें ) नाहीं तें पूर्वीं करावें . " याविषयीं क्रम निर्णयदीपांत सांगितला आहे तो असा : - " अमावास्येस जर क्षयदिवस ( वार्षिक ) प्राप्त होईल तर दर्शश्राद्धाचे पूर्वी वैश्वदेव व वार्षिकश्राद्ध करुन नंतर दर्शश्राद्ध करावें . "

अमाश्राद्धंचानुपनीतोपिकुर्यात् ‍ श्राद्धशूलपाणौ अमावास्याष्टकाकृष्णपक्षपंचदशीषुचेत्युपक्रम्य एतच्चानुपनीतोपिकुर्यात्सर्वेषुपर्वसु श्राद्धंसाधारणंनामसर्वकर्मफलप्रदम् ‍ भार्याविरहितोप्येतत्प्रवासस्थोपिनित्यशः शूद्रोप्यमंत्रवत्कुर्यादनेनविधिनाबुध इतिमात्स्योक्तेः अमाश्राद्धातिक्रमेप्रायश्चित्तमुक्तमृग्विधाने न्यूशुवाचंजपेन्मंत्रंशतवारंदिनेदिने अमाश्राद्धंयदानास्तितदासंपूर्णमेतितत् ‍ ।

दर्शश्राद्ध हें अनुपनीतानें ( मौजीं न झालेल्यानें ) ही करावें . कारण , श्राद्धशूलपाणिग्रंथांत - अमावास्या , अष्टका , कृष्णपक्षांतील पंधरा तिथि ( महालयांतील ) यांचा उपक्रम करुन सांगतो - " सर्व पर्वांचे ठिकाणीं होणारें हें साधारण श्राद्ध सर्व कर्माचें फल देणारें असल्यामुळें अनुपनीतानेंही करावें . तसेंच विधुरानेंही प्रवासांत देखील नित्य करावें . शूद्रानें देखील उक्तविधीनें अमंत्रक करावें " अशी मात्स्योक्ति आहे . दर्शश्रद्धाचा लोप झाला असतां प्राश्चित्त सांगतो - ऋग्विधानांत - " जेव्हां दर्शश्राद्ध घडलें नसेल तेव्हां ‘ न्यू३षुवाचं० ’ या ऋचेचा शंभर वेळां जप करावा , तेणेंकरुन दर्शश्राद्धाचें संपूर्ण फल मिळतें . "

अत्रपूर्वोक्तसाग्निकपदेनाहिताग्निः स्मार्ताग्निमांश्चगृह्यते विच्छिन्नाग्निकादिश्चनिरग्निकः तथाचहेमाद्रिरग्नौकरणप्रकरणे साग्निरग्नावनग्निस्तुद्विजपाणावथाप्सुवा कुर्यादग्नौक्रियांनित्यंलौकिकेनेतिनिश्चितमितिस्मृतिवाक्यमुदाह्रत्य यस्त्वस्वीकृतौपासनतयासमुच्छिन्नग्नितयाभार्याविधुरतयावाग्निरहितस्तस्यद्विजपाणौजलादौवाहोम इतिव्याचचक्षे मदनपारिजातेप्येवम् ‍ इदमेवसाग्निकानग्निकस्वरुपंसर्वत्रज्ञेयम् ‍ ।

ह्या प्रकरणांत पूर्वोक्त साग्निकशब्देंकरुन श्रौताग्निमान् ‍ व स्मार्ताग्निमान् ‍ ही घ्यावा , ज्याचा अग्नि विच्छिन्न वगैरे असेल तो निरग्निक समजावा . तेंच हेमाद्रि अग्नौकरणप्रकरणीं सांगतो - " साग्निकानें सर्वदा अग्नौकरण अग्नींत करावें ; अनग्निकानें ब्राह्मणाच्या हस्तावर किंवा उदकांत करावें ; परंतु लौकिकाग्नीवर कदापि करुं नये " हें स्मृतिवाक्य घेऊन , गृह्याग्निस्वीकार केला नसल्यामुळें अथवा स्वीकार करुन नष्ट झाल्यामुळें किंवा स्त्री नसल्यामुळें जो अग्निरहित त्यानें ब्राह्मणाच्या हस्तावर किंवा उदकादिकांत अग्नौकरण करावें , असा त्या वाक्याचा अर्थ सांगता झाला . मदनपारिजात ग्रंथांतही असेंच आहे . हेंच साग्निक व अनग्निक यांचें स्वरुप सर्वत्र ठिकाणीं समजावें .

N/A

References : N/A
Last Updated : May 23, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP