प्रथम परिच्छेद - एकभक्तव्रताचा निर्णय
निर्णयसिंधु ग्रंथामध्ये कोणत्या कर्माचा कोणता काल, याचा मुख्यत्वेकरून निर्णय केलेला आहे.
अथैकभक्तं तत्कालःपाद्मे मध्याह्नव्यापिनीग्राह्याएकभक्तेसदातिथिरिति मध्याह्नश्चपंचधाविभक्तदिनतृतीयांशः तेनयद्यपिद्वादशदंडानंतरंप्राप्यते तथापि दिनार्धसमयेतीतेभुज्यतेनियमेनयत्
भक्तमिति ततःसूर्यास्तपर्यंतंगौणः दिवैवहीत्यस्यवैयर्थ्यापत्त्यैतत्परत्वात् ।
आतां एकभक्तव्रताचा निर्णय सांगतो.
एकभक्तव्रताचा काल पाद्मांत सांगतो - " एकभक्तव्रताविषयीं तिथि मध्याह्नव्यापिनी सर्वदा घ्यावी. " दिवसाचे पांच भाग करुन तिसरा जो भाग तो मध्यान्ह, यावरुन तो जरी बारा घटिकांनंतर प्राप्त होतो तथापि " दिवसाचें अर्ध गेलें असतां नियमेंकरुन जें भोजन करणें तें एकभक्त म्हटलें आहे, यास्तव तें दिवसासच करावें " असें स्कंदपुराणवचन आहे, म्हणून सोळावी, सतरावी इत्यादिक जी घटिका तो मुख्यकाळ. दीपिकेंत तर - " दिवसाचे तीन भाग करुन मध्यान्हाचे शेवटचे भागीं एकभक्तव्रत करावें " असें आहे. मध्यान्हानंतर सूर्यास्तापर्यंत गौण काल. कारण, ‘ दिवसासच करावें ’ असें जें वरील वचनांत सांगितलें तें व्यर्थ होऊन गौणकालबोधक आहे.
अत्रपूर्वेद्युरेवव्याप्तिः परेद्युरेवोभयेद्युर्व्याप्तिस्तदभावोंशव्याप्तिस्तत्रापिसाम्यंवैषम्यंचे तिषट् पक्षाः तत्राद्ययोरसंदेहएव तृतीयेतुपूर्वेह्निगौणमुख्यव्याप्तेः सत्त्वात्पूर्वेतिमाधवः युग्मवाक्यान्निर्णय इतिहेमाद्रिः चतुर्थपक्षेपूर्वैवगौणकालव्याप्तेः सत्त्वात् वैषम्येणांशव्याप्तौयाधिकासाग्राह्या साम्येपूर्वा अयंचस्वतंत्रैकभक्तनिर्णयः अन्यांगेउपवासप्रतिनिधौतदनुसारेणनिर्णयः ।
ह्या एकभक्त तिथीच्या व्याप्तीविषयीं सहा पक्ष आहेत, ते असे: - १ पूर्व दिवशींच ( मुख्यकालीं ) व्याप्ति, २ दुसर्या दिवशींच व्याप्ति, ३ दोनही दिवशी व्याप्ति, ४ दोनही दिवशीं व्याप्ति नसणें, ५ दोनही दिवशीं सारखी एकदेशव्याप्ति, ६ दोन दिवशीं विषम एकदेशव्याप्ति, याप्रमाणें सहा पक्ष आहेत. त्यांमध्यें पहिल्या दोन पक्षांविषयीं संशयच नाहीं. तिसर्या पक्षीं पहिल्या दिवशीं गौणकालीं व मुखकालीं व्याप्ति असल्यामुळें पूर्व करावी, असें माधव सांगतो. युग्मवाक्यानें निर्णय करावा, असें हेमाद्रि सांगतो. दोनही दिवशीं व्याप्ति नसणें, या चवथ्या पक्षीं गौणकालीं सायंकाळीं व्याप्ति आहे म्हणून पूर्वींचीच घ्यावी. वैषम्येंकरुन एकदेशव्याप्ति असेल तर ज्या दिवशीं अधिक व्याप्ति असेल ती घ्यावी. सारखी एकदेशव्याप्ति असेल तर पूर्वींची घ्यावी. हा निर्णय, स्वतंत्र जें एकभक्तव्रत त्याविषयीं आहे उपवासाचा प्रतिनिधि, अन्य व्रताचें अंगभूत अशा एकभक्तव्रताविषयीं निर्णय त्या त्या व्रताच्या अनुसारेंकरुन जाणावा.
N/A
References : N/A
Last Updated : May 11, 2013
TOP