मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|निर्णयसिंधु|प्रथम परिच्छेद|
एकादशीव्रत

प्रथम परिच्छेद - एकादशीव्रत

निर्णयसिंधु ग्रंथामध्ये कोणत्या कर्माचा कोणता काल , याचा मुख्यत्वेकरून निर्णय केलेला आहे .


अथात्रोपयुक्तंकिंचिदुच्यते तत्रदशम्यामेकादशीयोगेदशमीमध्ये एवभोजनंकार्यं एकादश्यांनभुंजीतेतितस्याएवनिमित्तत्वात् ‍ निषेधस्तुनिवृत्त्यात्माकालमात्रमपेक्षतेइतिदेवलोक्तेश्च केचित्तुएकादशीव्रतांगत्वेनपूर्वेद्युरेकभक्तविधानाद्विधिस्पृष्टेचनिषेधानवकाशाग्नकाम्यव्रतांगेभोजननिषेधः प्रवर्तते तेनैकादशीमध्येपिपूर्वदिनेभोजनमित्याहुः ।

आतां एकादशीव्रताविषयीं उपयुक्त असें कांहीं सांगतो .

दशमीचे दिवशीं एकादशीचा योग असेल तर दशमीमध्येंच भोजन करावें ; " एकादशीचे ठायीं भोजन करुं नये " या वाक्यांतील भोजननिषेधाला एकादशीच निमित्त आहे ; आणि " निषेध तर निवृत्तिरुप असल्यामुळें तो एकादशीकालमात्राचीच अपेक्षा करितो म्हणजे एकादशीतिथींत भोजननिषेध आहे " असें देवलवचनही आहे . कोणी ग्रंथकार तर - काम्य एकादशीव्रताच्या अंगत्वानें पूर्वदिवशीं एकभक्त करावें , असा विधि आहे , म्हणून विधिप्रयुक्ताविषयीं निषेध होत नसल्यामुळें काम्यव्रताचें अंग जें पूर्वदिवशीं भोजन त्याविषयीं निषेध प्रवृत्त होत नाहीं , याकरितां पूर्वदिवशीं एकादशीमध्येंही भोजन करावें , असे म्हणतात .

अत्राधिकारीमाधवीयेकात्यायनेनोक्तः अष्टवर्षाधिकोमर्त्योह्यशीतिन्यूनवत्सरः एकादश्यामुपवसेत्पक्षयोरुभयोरपीति भविष्ये ब्रह्मचारीचनारीचशुक्लामेवसदागृहीति यत्तु विष्णुः पत्यौजीवतियानारीउपोष्यव्रतमाचरेत् ‍ आयुष्यंहरतेभर्तुर्नरकंचैवगच्छतीति तद्भर्त्रननुज्ञाविषयमितिप्रागुक्तम् ‍ ।

एकादशीव्रताविषयीं अधिकारी सांगतो - माधवीयांत कात्यायन - " आठ वर्षांहून अधिक वयाचा आणि ऐशीं वर्षांहून कमी वयाचा अशा मनुष्यानें शुक्ल व कृष्ण एकादशीचे ठायीं उपोषण करावें . " भविष्यपुराणांत - " ब्रह्मचारी , सौभाग्यवती स्त्री आणि गृहस्थाश्रमी यांनीं शुक्लैकादशीच नित्य करावी . " आतां जें विष्णु - " पति जीवंत असतां जी स्त्री उपोषण करुन व्रताचरण करिते ती भर्त्याचें आयुष्य हरण करुन नरकाप्रत जाते " असें वचन तें भर्त्याच्या आज्ञेविरहित व्रतविषयक होय , असें पूर्वी ( व्रतपरिभाषाप्रकरणीं ) सांगितलें आहे .

उपवासासामर्थ्येतुमार्कंडेयकौर्मयोः एकभक्तेननक्तेनतथैवायाचितेनच उपवासेनदांनेनननिर्द्वादशिकोभवेत् ‍ अत्र एकभक्तेनयोमर्त्य उपवासव्रतंचरेदित्येकभक्तादिषूपवासशब्दस्तद्धर्मातिदेशार्थः तेनतत्प्रयुक्ताः सर्वेधर्माः संकल्पमंत्रेचैकभक्तादिपदेनोहः कार्य इतिमदनरत्ने तथाऽसामर्थेप्रतिनिधिनाकारयेदितिप्रागुक्तम् ‍ व्रताकरणेप्रायश्चित्तमाह माधवीये कात्यायनः अर्केपर्वद्वयेरात्रौचतुर्दश्यष्टमीदिवा एकादश्यामहोरात्रंभुक्त्वाचांद्रायणंचरेदिति ।

उपवासाविषयीं सामर्थ्य नसेल तर मार्केडेय व कूर्मपुराणांत - " एकभक्त , नक्त , अयाचित , उपवास , आणि दान , यांतून कोणतेंही एक करावें ; परंतु एकादशीव्रताचा त्याग करुं नये . " ह्या स्थलीं " जो मनुष्य एकभक्त करुन उपवासव्रत करील " अशीं जीं एकभक्तादिक अनुकल्पविषयक वाक्यें त्यांमध्यें जो ‘ उपवास ’ शब्द तो त्या उपवासाच्या धर्माचा अति देश करण्याकरितां आहे , म्हणून उपवासप्रयुक्त सर्व धर्म करावे , व संकल्पमंत्रांत एकभक्तादिपदाचा ऊह करावा , असें मदनरत्नांत सांगितलें आहे . तसेंच सामर्थ्य नसतां प्रतिनिधीकडून करवावें असें पूर्वीं सांगितलें आहे . व्रत न केलें असतां प्रायश्चित्त सांगतो - माधवीयांत कात्यायन - अर्क ( रविवार ), पौर्णिमा , अमावास्या , यांचे ठायीं रात्रीं भोजन केलें असतां ; चतुर्दशी व अष्टमी यांचे ठायीं दिवा भोजन केलें असतां आणि एकादशीचे ठायीं दिवसा व रात्रीं भोजन केलें असतां चांद्रायण करावें .

N/A

References : N/A
Last Updated : May 15, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP