मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|निर्णयसिंधु|प्रथम परिच्छेद|
मलमासनिर्णय

प्रथम परिच्छेद - मलमासनिर्णय

निर्णयसिंधु ग्रंथामध्ये कोणत्या कर्माचा कोणता काल, याचा मुख्यत्वेकरून निर्णय केलेला आहे.


अथमलमासः तत्रैकमात्रसंक्रांतिरहितःसितादिश्चांद्रोमासोमलमासः एकमात्रसंक्रांतिराहित्यमसंक्रांतत्वेनसंक्रांतिद्वयवत्त्वेनचभवतीतिमलमासोद्वेधा अधिमासःक्षयमासश्चेति तदुक्तं काठकगृहे यस्मिन् मासेनसंक्रांतिःसंक्रांतिद्वयमेववा मलमासःसविज्ञेयोमासःस्यात्तुत्रयोदश इति सत्यव्रतोपि राशिद्वयंयत्रमासेसंक्रमेतदिवाकरः नाधिमासोभवेदेषमलमासस्तुकेवलमिति अधिकमासस्यकालनियममाह वसिष्ठः द्वात्रिंशद्भिर्मितैर्मासौर्दिनैः षोडशभिस्तथा घटिकानांचतुष्केणपतत्यधिकमासक इति एतच्चसावनादिमानेनसंभवार्थंनतुनियमार्थम् अन्यथाषोडशदिनाधिकद्वात्रिंशन्मासानंतरंकृष्णपक्षनियमेनशुक्लादित्वभंगापत्तेः तेनन्यूनाधिककालेमलमासपातेपिनदोषः अतएवोक्तंमाधवीये मासेत्रिंशत्तमेभवेदिति क्षयस्यापिज्योतिः शास्त्रेअसंक्रांतिमासोऽधिमासः स्फुटंस्याद्दिसंक्रांतिमासः क्षयाख्यः कदाचित्‍ क्षयःकार्तिकादित्रयेनान्यतः स्यात्तदावर्षमध्येधिमासद्वयंच एकःक्षयात्पूर्वंपरतश्चैक इत्यधिमासद्वयंभवतीत्यर्थः ।
आतां मलमासनिर्णय सांगतो.
एकाच संक्रांतींनें रहित जो शुक्लपक्षादिक मास तो चांद्रमास, मलमास होय. एकाच संक्रांतीनें रहित असें म्हटल्यानें ज्यांत संक्रांति नाहीं, तो होतो, आणि दोन संक्रांति ज्यांत आहेत तोही होतो; म्हणून तो मलमास दोन प्रकारचा - एक अधिकमास आणि दुसरा क्षयमास. तेंच काठकगृह्यसूत्रांत सांगतो - " ज्या मासांत संक्रांत नाहीं तो अथवा ज्या मासांत दोन संक्रांति तो मलमास होय आणि तो तेरावा मास जाणावा. " सत्यव्रतही - " ज्या मासांत दोन संक्रांतींचें उल्लंघन सूर्य करितो तो अधिकमास नव्हे, तर तो केवल मलमास ( क्षयमास ) जाणावा. अधिकमास किती कालानें होतो; या विषयीं कालनियम सांगतो-वसिष्ठ - " ३२ मास, १६ दिवस, ४ घटिका इतक्या कालानें अधिकमास होतो. हें वचन सावनादि मानेंकरुन संभवार्थ आहे, नियमार्थ नव्हे. संभवार्थ न मानितां नियमार्थ मानिलें तर ३२ मास, १६ दिवसांनंतर नियमानें कृष्णपक्ष असल्यामुळें ‘ शुक्लादिक होतो ’ असें जें सांगितलें त्याचा भंग होईल, म्हणून तें वचन संभवार्थ मानिल्यानें पूर्वोक्त कालामध्यें न्यूनाधिकत्व होऊनही जरी मलमास झाला तथापि दोष नाहीं. म्हणूनच माधवीयांत सांगतो - " तिसाव्या मासांत मलमास होतो. " क्षयमासाविषयींही ज्योतिःशास्त्रांत सांगतो - " संक्रांतिविरहित जो मास तो अधिक मास आणि दोन संक्रांतींनीं युक्त जो मास तो क्षयमास; हा क्वचित्‍ होतो. क्षयमास होणें तो कार्तिक, मार्गशीर्ष, पौष या महिन्यांतून कोणता तरी होतो, इतरांपैकीं होत नाहीं. ज्या वर्षी क्षयमास होतो त्या वर्षी क्षयमासाच्या पूर्वी एक, आणि क्षयमासानंतर एक असे दोन अधिक मास होतात.

अत्रविशेषमाहजाबालिः मासद्वयेब्दमध्येतुसंक्रांतिर्नयदाभवेत् प्राकृतस्तत्रपूर्वःस्यादधिमासस्तथोत्तर इति उत्तरएवकालाधिक्यंनपूर्वस्मिन्नित्यर्थः यत्तुब्रह्मसिद्धांते चैत्रादर्वाड्नाधिमासः परतस्त्वधिकोभवेदिति तत्रचैत्रात्पूर्वंअसंक्रांतद्वयेपूर्वोनाधिकः किंतुपर इत्यर्थः यच्च ज्योतिःसिद्धांते घटकन्यागतेसूर्येवृश्चिकेवाथधन्विनि मकरेवाथकुंभेवानाधिमासोविधीयते इति तत् वृश्चिकादिचतुष्टयेमलमासेसति पूर्वं तुलाकन्यागतेसूर्येक्षयपूर्वभाव्यधिमासस्यकालाधिक्यनिषेधार्थंनत्वधिकमात्रस्य दशानांफाल्गुनादीनांप्रायोमाघस्यचक्कचित् नपुंसकत्वंभवतीत्येषशास्त्रविनिश्चय इति हेमाद्रौविष्णुधर्म विरोधात् मलमासेऽष्टकादिनिषेधानुपपत्तेश्च ।

याविषयीं विशेष निर्णय सांगतो.
जाबालि - जेव्हां एका वर्षांत दोन मासांत संक्रांत होत नाहीं तेव्हां संक्रांतरहित अशा त्या दोन मासांमध्यें - जो दोन संक्रांतींनीं युक्त मास तो क्षयमास होतो, म्हणून - क्षयमासाच्या पूर्वीचा जो मास यो प्राकृत ( इतर मासांसारखा ) आणि क्षयमासाच्या पुढचा जो मास तो अधिकमास होय, म्हणजे पुढचा तोच अधिकमास, पहिला तो अधिक नाहीं, सर्व कर्मांला योग्य आहे असा अभिप्राय. आतां जें ब्रह्मसिद्धांतवचन - " चैत्राच्या पूर्वीं अधिकमास नाहीं, पुढें अधिक मास होतो. " त्याचा अर्थ - चैत्राच्या पूर्वी संक्रांतिरहित दोन मास असतां त्यांत पहिला अधिक नव्हे, तर पुढचा अधिक होय. आणि जें ज्योतिःसिद्धांतांत - " तूळ, कन्या यांस सूर्य असतां, तसाच वृश्चिक किंवा धन अथवा मकर किंवा कुंभ ह्या संक्रांतीस सूर्य असतां अधिकमास होत नाहीं. " हें वचन, वृश्चिकादि चार संक्रांतींत मलमास आला असतां त्याच्या पूर्वी तुला व कन्या ह्या संक्रांतींस सूर्य असतां क्षयाच्या पूर्वी होणारा जो अधिकमास त्यानें कालाधिक्य नाहीं. ( अधिकमासनिमित्तक कर्मनिषेध नाहीं. ) इतकेंच सांगण्यासाठीं आहे, अधिकमासाचा निषेध करण्यासाठीं वचन नाहीं. कारण, फाल्गुनादिक दहा मासांला फारकरुन नपुंसकत्व ( संक्रांतिरहितत्व ) होतें, आणि क्वचित्‍ माघमासालाही नपुंसकत्व होतें, हा शास्त्रनिश्चय आहे. अशा हेमाद्रींतील विष्णुधर्मवचनाचा विरोध येतो. आणि मलमासांत अष्टकाश्राद्धाचा निषेध आहे, त्याचीही उपपत्ति होणार नाहीं.

क्षयस्यागमनकालउक्तः सिद्धांतशिरोमणौ गतोब्ध्यद्रिनंदैर्गतेशाककालेतिथीशैर्भविष्यत्यथांगाक्षसूर्यैः गजाद्यग्निभूमिस्तथाप्रायशोयंकुवेदेंदुवर्षैः क्वचिद्गोकुभिश्चेति अब्धयश्चत्वारः अद्रयः सप्त नंदा नव एषां प्रातिलोम्येनपाते ९७४ तैर्मितेवर्षेकश्चित्क्षयमासः पूर्वंजात इत्यर्थः तिथयःपंचदश १५ ईशाएकादश १११५ एवंमितेयातेकश्चिद्भविष्यतीत्यर्थः अंगा ६ क्ष ५ सूर्याः १२ एकत्र १२५६ गजाः ८ अद्रयः ७ अग्नयः ३ भूः १ एकत्र १३७८ कुः १ वेदाः ४ इंदुः १ एकत्र १४१ गावः ९ कुः १ एकत्र १९ एतैर्मितेवर्षेयातेकश्चिद्भविष्यतीत्यर्थः ।

क्षयमास किती वर्षांनीं येतो त्याचा निर्णय सांगतो.
सिद्धांतशिरोमणींत -  " ९७४ गत शककालीं एक क्षयमास झाला. १११५ एतत्परिमित शककालीं एक होईल. १२५६ शककालीं होईल. १३७८ शककालीं होईल. हा क्षयमास बहुतकरुन १४१ वर्षानंतर होतो. क्वचित्‍ १९ वर्षांनींही क्षयमास होतो. "

N/A

References : N/A
Last Updated : May 09, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP