प्रथम परिच्छेद - मास
निर्णयसिंधु ग्रंथामध्ये कोणत्या कर्माचा कोणता काल, याचा मुख्यत्वेकरून निर्णय केलेला आहे.
मासश्चतुर्धा सावनःसौरश्चांद्रोनाक्षत्र इति त्रिंशद्दिनःसावनःअर्कसंक्रांतेःसंक्रांत्यवधिःसौरःयद्यपि हेमाद्रिमाधवकालादर्शा द्यालोचनेनमेषसंक्रांत्यांसमाप्तामावास्यकत्वंचैत्रत्वमितिलक्षणाच्चमेषसंक्रांतेश्चैत्रत्वंप्रतीयते तथापि मेषसंक्रमेदर्शद्वयेसतिवैशाखस्यैवाधिक्यात्तत्पूर्वभावित्वेनमीनस्यैवचैत्रत्वंयुक्तं एवंमेषादयो वै शाखाद्याः अतोमीनसंक्रांत्यामधिगतपौर्णमासिकत्वम् आद्यतिथिकत्वंवाचैत्रत्वमितिलक्षणात् मीनएवसौरश्चैत्रः एवंवैशाखादयोपिमेषाद्याज्ञेयाः ।
आतां मास सांगतो-मास चार प्रकारचा- सावनमास, सौरमास, चांद्रमास आणि नाक्षत्रमास. तीस दिवसांचा तो सावनमास. सूर्यसंक्रांतीला आरंभ करुन पुढच्या सूर्यसंक्रांतीच्या आरंभापर्यंत जो मास तो सौरमास. जरी हेमाद्रि, माधव, कालादर्श इत्यादि ग्रंथांचें आलोचन ( विचार ) केल्यानें, आणि मेष संक्रांतींत समाप्त आहे अमावास्या ज्याची तो चैत्र, अशा लक्षणावरुनही मेष संक्रांतीला चैत्रत्व आहे, असें समजतें, तथापि मेषसंक्रांतींत दोन अमावास्या आल्या असतां, मेषसंक्रांतींत दुसरी अमावास्या आलेला जो मास तो अधिक वैशाखच आहे, म्हणून त्याच्या पूर्वींचा मीनसंक्रांति असलेला तो चैत्र आहे, म्हणून मीनाला चैत्र म्हणणें युक्त आहे. याचप्रमाणें मेषादिक ते वैशाखादि समजावे. आतां वरील लक्षणाला दोष येतो म्हणून, असें लक्षण करावें कीं, मीनसंक्रांतींत प्राप्त आह्हे पौर्णिमा ज्याची तो चैत्र -असें केलें तरी शुक्लपक्षांत मेषसंक्रांति झाली असतां, त्या ठिकाणीं हें लक्षण येणार नाहीं म्हणून निर्दोष लक्षण सांगतो-मीनसंक्रांतींत प्राप्त आहे आद्यतिथि ज्याची तो चैत्र, असें लक्षण केलें आहे म्हणून मीनच सौर चैत्र होतो, याप्रमाणें वैशाखादिकही मेषादिक जाणावे.
N/A
References : N/A
Last Updated : May 09, 2013
TOP