अथसूतकादौनिर्णयः तत्रशावसूत्याशौचयोःसर्वस्मार्तकर्मनिवृत्तिर्निबंधेषुस्पष्टैव गौडास्तुक्षताशौचादावपितामाहुः जानूर्ध्वंक्षतजेजातेनित्यकर्मनचाचरेत् नैमित्तिकंचतदधः स्रवद्रक्तोनवाचरेत् लोतकेचसमुत्पन्नेज्वरकर्मणिमैथुने धूमोद्गारेतथावांतौनित्यकर्माणिसंत्यजेत् द्रव्येभुक्तेत्वजीर्णेचनैवभुक्त्वापिकिंचन कर्मकुर्यान्नरोनित्यंसूतकेमृतकेतथेतिकालिकापुराणात् ।
आतां सूतकादिक प्राप्त झालें असतां निर्णय सांगतो.
मृताशौच व जननाशौच ह्यांत सर्व स्मार्तकर्माचा प्रतिबंध निबंधग्रंथांत स्पष्टच सांगितला आहे. गौड ग्रंथकार तरक्षताशौच ( क्षतानें आलेलें अशुचित्व ) इत्यादि प्राप्त असतांही सर्व स्मार्तकर्मांचा निषेध सांगतात; कारण, " गुडघ्यांचे वर क्षत झालें असतां नित्यकर्मेंही करुं नयेत. गुडघ्यांचे खालीं रक्तस्त्राव झाला असतां नैमित्तिक कर्म करुं नये. लोतक ( लूतासंपर्कजन्यस्फोट ), ज्वर, मैथुन, धुरकट, ढेंकर, वांति हीं झालीं असतां नित्यकर्मै वर्ज्य करावींत. पदार्थ भक्षण केल्यावर अजीर्ण झालें असतां; कांहीं भक्षण करुन; तसेंच जननाशौच व मृताशौच यांत कोणतेंही कर्म करुं नये. ” असें कालिकापुराण आहे.
वस्तुतस्तुपूर्वंदेवीपूजोपक्रमात्तन्मात्रविषयत्वमस्येतियुक्तंप्रतीमः तथाहेमाद्रौपाद्मे गर्भिणीसूतिकादिश्चकुमारीवाथरोगिणी यदाऽशुद्धातदान्येनकारयेत्प्रयतास्वयमिति पुंसोप्येषविधिः लिंगस्याविवक्षितत्वात् तेन यस्मिन्व्रतेयत्पूजाद्युक्तंतदन्येनकारयेत् शारीरनियमान्स्वयंकुर्यादितिहेमाद्रिर्व्याचख्यौ नव्रतिनांव्रत इति विष्णूक्तेश्च आरंभस्तुनभवत्येव ।
वास्तिविक म्हटलें तर - कालिकापुराणांत एथें पूर्वी देवीपूजेचा उपक्रम केलेला आहे, यास्तव हीं वरील निषेधक वचनें देवीपूजाविषयक होत, असें योग्य दिसतें. तसेंच हेमाद्रींत - पद्मपुराणांत - “ गर्भिणी, बाळंतीण, रजस्वला, कुमारी, रोगिणी ह्या स्त्रिया अशुद्धावस्थेंत असतील तर त्यांनीं दुसर्याकडून व्रतादिक करवावें, आणि शुद्ध असतील तर स्वतः करावें. ” पुरुषाविषयींही हाच निर्णय समजावा; कारण, एथें ‘ पुरुषच ’ किंवा ‘ स्त्रियाच ’ अशी लिंगविवक्षा नाहीं, असें असल्यामुळें ज्या व्रतांचेठाय़ीं जें पूजादिक उक्त आहे तें दुसर्याकडून करवावें; शारीरनियम ( उपोषणादिक ) स्वयमेव करावे असें हेमाद्रि सांगतो. आणि “ व्रती जे त्यांला व्रताविषयीं आशौचदोष नाहीं ” असें विष्णुवचनही आहे. प्रथमारंभ तर ( आशौचांत ) होतच नाहीं.
शुद्धितत्त्वेविष्णुः बहुकालिकसंकल्पोगृहीतश्चपुरायदि सूतकेमृतकेचैवव्रतंतन्नैवदुष्यति एतत्काम्यपरं नित्यंत्वनारब्धमपिकार्यमितिगौडाः मदनरत्ने पूर्वसंकल्पितंयच्चव्रतंसुनियतव्रतैः तत्कर्तव्यंनरैः शुद्धंदानार्चनविवर्जितं माधवीयेकौर्मे काम्योपवासेप्रक्रांतेत्वंतरामृतसूतके तत्रकाम्यव्रतंकुर्याद्दानार्चनविवर्जितमिति एतेनसांगेधिकाराद्व्रतांगदेवपूजादिकार्यमितिवर्धमानोक्तिः परास्ता प्रारब्धंपूजादिकार्यमेव नवरात्रेतुतत्रैवविशेषवक्ष्यामः एवंरजस्वलापि ।
शुद्धितत्वांत - विष्णु - जर बहुतकालपर्यंत व्रत करावयाचा पूर्वी संकल्प केला आणि पश्चात् जननाशौच किंवा मृताशौच प्राप्त झालें तर तें संकल्पोक्तव्रत करावें, त्याविषयीं दोष नाहीं. ” हें वचन काम्यव्रतपर आहे. नित्यव्रत तर अनारब्ध ( आरंभ न केलेलें ) जरी असेल तथापि तें करावें असें गौड म्हणतात. मदनरत्नांत - “ नियमानें व्रतें करणारे जे मनुष्य त्यांनीं पूर्वसंकल्पित व्रत करावें; परंतु दान, पूजा हीं मात्र करुं नयेत. ” माधवीयांत - कूर्मपुराणांत - “ काम्यव्रतसंबंधी उपवासाचा आरंभ केला आणि मध्यें मृताशौच प्राप्त झालें तर दान, पूजा विरहित तें काम्यव्रत करावें. ” यावरुन सांगव्रताविषयीं अधिकार आहे, यास्तव व्रताचें अंग जें देवपूजादिक तें करावें, असें जें वर्धमानानें उक्त तें खंडित झालें. आरंभिलेलें पूजादिक कर्म करावेंच. नवरात्राविषयीं तर विशेष निर्णय सांगणें आहे तो त्याच ठिकाणीं सांगूं. रजस्वलेविषयींही याप्रमाणेंच निर्णय समजावा.
यत्तुसत्यव्रतः प्रारब्धदीर्घतपसांनारीणांयद्रजोभवेत् नतत्रापिव्रतस्यस्यादुपरोधः कथंचनेति तत्प्रतिनिधिनाकारयेदित्येतत्परं तदुक्तंमदनरत्नेमात्स्ये अंतरातुरजोयोगेपूजामन्येनकारयेदिति ।
आतां जें सत्यव्रत - “ ज्यांनीं बहुत दिवस व्रत धारण केलें आहे अशा स्त्रिया रजस्वला झाल्या असतां रजस्वलांवस्थेंतही व्रताचा प्रतिबंध होत नाहीं. ” असें वचन तें ‘ प्रतिनिधिद्वारा करावें ’ अशा अर्थाचें आहे; तें सांगतो - मदनरत्नांत - मत्स्यपुराणांत - “ व्रतामध्यें रजस्वला झाली असतां पूजादिक अन्यद्वारा ( प्रतिनिधिद्वारा ) करवावें. ”
प्रतिनिधयश्चनिर्णयामृतेपैठीनसिः भार्यापत्युर्व्रतंकुर्याद्भार्यायाश्चपतिर्व्रतं असामर्थेपरस्ताभ्यां व्रतभंगोनजायते स्कांदेपि पुत्रंवाविनयोपेतंभगिनींभ्रातरंतथा एषामभावएवान्यंब्राह्मणंवानियोजयेत् कात्यायनः पितृमातृभ्रातृपतिगुर्वर्थेचविशेषतः उपवासंप्रकुर्वाणः पुण्यंशतगुणंलभेत् मातामहादीनुद्दिश्यएकादश्यामुपोषणे कृतेतेतुफलंविप्राः समग्रंसमवाप्नुयुः ।
प्रतिनिधि सांगतो - निर्णयामृतांत - पैठीनसि - “ भार्येनें पतीचें व्रत करावें, व पतीनें भार्यचें व्रत करावें, उभयतां असमर्थ असतां तिसर्यानें करावें, असें केल्यानें व्रतभंग होत नाहीं. ” स्कंदपुराणांतही - “ विनययुक्त पुत्र, भ्राता, भगिनी यांतून कोणाकडूनही करवावें, यांच्या अभावींच दुसरा कोणी, अथवा ब्राह्मण यांजकडून करवावें. ” कात्यायन - “ पिता, माता, भ्राता, पति, गुरु यांच्यासाठीं उपोषण करणारा त्याला शतगुण फल मिळतें. मातामह इत्यादिकांच्या उद्देशानें एकादशीचें उपोषण करील तर त्याला व मातामहादिकांस समग्र फल मिळेल. ”
मदनरत्नेप्रभासखंडे भर्तापुत्रःपुरोधाश्चभ्रातापत्नीसखापिच यात्रायांधर्मकार्येषुजायंतेप्रतिहस्तकाः एभिः कृतंमहादेविस्वयमेवकृतंभवेत् तत्रैववायवीये स्वयंकर्तुमशक्तश्चेत्कारयीतपुरोधसा इदंचसर्ववर्णसाधारणं अविशेषात् ।
मदनरत्नांत - प्रभासखंडांत - भर्ता, पुत्र, पुरोहित ( उपाध्याय ), भ्राता, पत्नी, मित्र हे यात्रा, धर्मकार्य, यांविषयीं प्रतिनिधि होतात, यास्तव यांच्याकडून केलेलें कर्म स्वयमेव केलेंसें होतें. ” त्याच ठिकाणीं वायुपुराणांत - “ आपण करण्यास असमर्थ असेल तर उपाध्यायाकडून कर्म करवावें. ” हें वचन ब्राह्मणादि सर्व वर्णांला लागू आहे. कारण, अमुक वर्णानें उपाध्यायाकडून करवावें, असें विशेष सांगितलें नाहीं.
यत्तुकश्चिदाह शूद्रस्यब्राह्मणादिरेवप्रतिनिधिर्युक्तोनशूद्रः जपस्तपस्तीर्थसेवाप्रव्रज्यामंत्रसाधनम् विप्रैःसंपादितंयस्यसंपन्नंतस्यतत्फलमिति मरीचिवचनादिति तत्तुच्छम् प्रव्रज्यादीनांशूद्रेऽसंभवाद्विशये प्रायदर्शनादितिन्यायेनास्यब्राह्मणादिगोचरत्वात् यदापि उपवासोव्रतंहोमस्तीर्थस्नानजपादिकमितिपूर्वार्धे पाठस्तदापिसएवदोषः स्त्रीशूद्रपतनानिषडितिमानवीयेजपनिषेधात् वस्तुतस्तु संपूर्णतावाचनमात्रमत्रोच्यत इतिप्रतिनिधेःकावार्तेत्यलम् ।
आतां जें कोणी म्हणतो कीं शूद्राला ब्राह्मणादिकच प्रतिनिधि योग्य, शूद्र प्रतिनिधि योग्य नाहीं; कारण, “ जप, तप, तीर्थसेवा, संन्यास, मंत्रसाधन हीं ब्राह्मणांनीं ज्याचीं संपादित केलीं त्याला त्यांचें संपूर्ण फल मिळतें. ” असें मरीचिवचन आहे असें तें त्याचें म्हणणें तुच्छ आहे; कारण, संन्यास इत्यादिकांचा, शूद्राचे ठायीं असंभव असल्यामुळें विशये ( संशये ) प्रायदर्शनात् ’ ह्या न्यायानें हें मरीचिवचन ब्राह्मणादिविषयक आहे. ‘ जपस्तपस्तीर्थसेवा प्रव्रज्या मंत्रसाधनम् ’ या स्थानीं ‘ उपवासो व्रतं होमस्तीर्थस्नानजपादिकम् ’ असा पाठ जेव्हां आहे, तेव्हांही वर सांगितलेलाच दोष येतो. कारण, “ स्त्रिया व शूद्र यांस जप, तप, तीर्थयात्रा, संन्यास, मंत्रसिद्धि, आणि देवताराधन हीं सहा कर्मैं दोषावह आहेत. ” ह्या मनुस्मृतींत जपाचा निषेध आहे. वास्तविक म्हटलें तर ‘ केलेलें कर्म संपूर्ण होवो ’ इतकेंच ब्राह्मणाकडून म्हणवावयाचें, असें वरील मरीचिवचनांत सांगितलें आहे. तेथें प्रतिनिधीची वार्ता देखील नाहीं. आतां इतका विचार पुरे आहे.
अत्रविशेषमाहत्रिकांडमंडनः काम्येप्रतिनिधिर्नास्तिनित्येनैमित्तिकेचसः काम्येप्युपक्रमादूर्ध्वं केचित्प्रतिनिधिंविदुः नस्यात्प्रतिनिधिर्मंत्रस्वामिदेवाग्निकर्मसु सदेशकालयोर्नास्तिनारणेरग्निरेवसा नापिप्रतिनिधातव्यंनिषिद्धंवस्तुकुत्रचित् हिरण्यकेशिसूत्रेपि नस्वामित्वस्यभार्यायाः पुत्रस्यदेशस्यकालस्याग्नेर्देवतायाः कर्मणः शब्दस्यचप्रतिनिधिर्विद्यतेइति ।
ह्या प्रतिनिधीविषयीं विशेष सांगतो त्रिकांडमंडन - “ काम्य कर्माचे ठायीं प्रतिनिधि नाहीं, नित्य व नैमित्तिक कर्माचे ठायीं तो प्रतिनिधि आहे. काम्यकर्माचे ठायीं देखील उपक्रम ( आरंभ ) केल्यावर प्रतिनिधि आहे, असें कोणी सांगतात. मंत्र, यजमान, देवता, अग्नि, कर्म, देश, काल, अरणि ( अग्निमंथनकाष्ठ ) यांविषयीं प्रतिनिधि होत नाहीं. निषिद्ध पदार्थ प्रतिनिधिस्थानीं कधींही योजूं नये. ” हिरण्यकेशिसूत्रांतही “ यजमान, भार्या, पुत्र, देश, काल, अग्नि, देवता, कर्म, शब्द यांविषयीं प्रतिनिधि नाहीं. ” असें सांगितलें आहे.