मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|निर्णयसिंधु|प्रथम परिच्छेद|
पौर्णिमा व अमावास्या

प्रथम परिच्छेद - पौर्णिमा व अमावास्या

निर्णयसिंधु ग्रंथामध्ये कोणत्या कर्माचा कोणता काल , याचा मुख्यत्वेकरून निर्णय केलेला आहे .


पौर्णमास्यमावास्येतुसावित्रीव्रतंविनापरेग्राह्ये भूतविद्धेनकर्तव्येदर्शपूर्णेकदाचन वर्जयित्वामुनिश्रेष्ठसावित्रीव्रतमुत्तममिति ब्रह्मवैवर्तात् ‍ अमायांयोगविशेषमाहाऽपरार्केशातातपः अमावास्यांभवेद्वारोयदाभूमिसुतस्यवै जाह्नवीस्नानमात्रेणगोसहस्त्रफलंलभेत् ‍ अमावैसोमवारेणरविवारेणसप्तमी चतुर्थीभौमवारेणविषुवत्सदृशंफलं तत्रैवव्यासः सिनीवालीकुहूर्वापियदिसोमदिनेभवेत् ‍ गोसहस्त्रफलंदद्यात्स्नानंवैमौनिनाकृतम् ‍ हेमाद्रौबृहन्मनुः श्रवणाश्विधनिष्ठार्द्रानागदैवतमस्तके यद्यमारविवारेणव्यतीपातः सउच्यते नागदैवतंआश्लेषा मस्तकोमृगशिरः प्रथमपाद इत्यन्ये सचसर्वेषाम् ‍ ।

पौर्णिमा व अमावास्या यांचा निर्णय - पौर्णिमा व अमावास्या ह्या दोन तिथि सावित्रीव्रत खेरीज करुन परा घ्याव्या ; कारण , " हे मुनिश्रेष्ठ , सावित्रीव्रताखेरीज अमावास्या , पौर्णिमा , ह्या तिथि चतुर्दशीविद्ध कधींही करुं नयेत " असें ब्रह्मवैवर्तवचन आहे . अमावास्येचे ठायीं विशेष योग सांगतो - अपरार्कांत - शातातप - " अमावास्येस भौमवार असेल तर भागीरथींत स्नान केल्यानें गोसहस्त्रदानाचें फल प्राप्त होतें , सोमवारयुक्त अमावास्या , रविवारयुक्त सप्तमी , आणि भौमवारयुक्त चतुर्थी यांचे ठायीं स्नान दान केलें असतां विषुवसंक्रांतीसारखें फल होतें . " अपरार्कांत - व्यास - " जर सोमवारीं सिनीवाली किंवा कुहू अशी अमावास्या येईल आणि त्या दिवशीं मौनी होत्साता स्नान करील तर गोसहस्त्रदानफल प्राप्त होईल . " हेमाद्रींत - बृहन्मनु - " रविवारयुक्त अमावास्येचे ठायीं श्रवण , अश्विनी , धनिष्ठा , आर्द्रा , आश्लेषा , मृग यांतून कोणतेंही नक्षत्र असेल तर तो व्यतीपात म्हटला आहे . " अन्य म्हणतात - मृगावांचून बाकीच्या वरील नक्षत्रांचा प्रथमपाद असेल तर व्यतीपात योग होतो .

N/A

References : N/A
Last Updated : May 15, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP