मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|निर्णयसिंधु|प्रथम परिच्छेद|
वेधाचा निर्णय

प्रथम परिच्छेद - वेधाचा निर्णय

निर्णयसिंधु ग्रंथामध्ये कोणत्या कर्माचा कोणता काल , याचा मुख्यत्वेकरून निर्णय केलेला आहे .


तत्रदशमीवेधोद्वेधा अरुणोदयवेधः सूर्योदयवेधश्चेति आद्योगारुडे दशमीशेषसंयुक्तोयदिस्यादरुणोदयः नैवोपोष्यंवैष्णवेनतद्धिनैकादशीव्रतमिति अरुणोदयस्वरुपंचमाधवीयेस्कांदे उदयात्प्राक्चतस्त्रस्तुघटिकाअरुणोदय इति यदपि उदयात्प्राग्यदाविप्रमुहुर्तद्वयसंयुता संपूर्णैकादशीनामतत्रैवोपवसेद्गृहीतिगारुडसौरधर्मादिवचनं यच्च भविष्ये आदित्योदयवेलायाः प्राड्मुहूर्तद्वयान्विता एकादशीतुसंपूर्णाविद्धान्यापरिकीर्तितेति तदप्युपसंहारन्यायेनदंडचतुष्टयपरमेव हेमाद्रावप्येवं यत्तुब्रह्मवैवर्ते चतस्त्रोघटिकाः प्रातररुणोदयनिश्चयः चतुष्टयविभागोत्रवेधादीनांकिलोदितः अरुणोदयवेधः स्यात्सार्धंतुघटिकात्रयं अतिवेधोद्विघटिकः प्रभासंदर्शनाद्रवेः महावेधोपितत्रैवदृश्यतेर्कोनदृश्यते तुरीयस्तत्रविहितोयोगःसूर्योदयेबुधैरिति तदप्यवयवद्वारारुणोदयवेधविशेषपरमेवेति माधवीयेमदनरत्नेच ।

आतां वेधाचा निर्णय सांगतो .

दशमीवेध दोन प्रकारचा - अरुणोदयकालीं दशमीवेध , आणि सूर्योदयकालीं दशमीवेध . त्यांमध्यें पहिला म्हणजे अरुणोदयवेध सांगतो - गरुडपुराणांत - " सूर्योदयाचे पूर्वी अरुणोदयकालीं दशमी शेष असेल तर त्या एकादशी तिथीस वैष्णवानें उपोषण करुं नये . कारण , तें एकादशीव्रत नव्हे " अरुणोदयाचें स्वरुप सांगतो - माधवीयांत स्कांदांत - " सूर्योदयाचे पूर्वी चार घटिका अरुणोदय म्हटला आहे . " आतां जें " सूर्योदयाचे पूर्वी जेव्हां दोन मुहूर्त एकादशी असेल तेव्हां ती संपूर्ण एकादशी होय , त्याच दिवशीं गृहस्थाश्रम्यानें उपोषण करावें " असें गरुडपुराणांत सौरधर्मादिवचन आहे तें ; आणि जें भविष्यपुराणांत - " सूर्योदयाचे पूर्वी दोन मुहूर्त जी एकादशी , ती संपूर्ण एकादशी , इतर जी ती विद्धा म्हटली आहे " अशीं वचनें तीं उपसंहारन्यायेंकरुन पूर्वोक्ताशीं एकवाक्यतेनें घटिकाचतुष्टयबोधकच आहेत . हेमाद्रींतही असेंच आहे . आतां जें ब्रह्मवैवर्तांत - " प्रातःकालीं चार घटिका अरुणोदय आहे ; त्यांत वेधादिकांचे चार विभाग केले आहेत , ते असे ; - साडेतीन घटिका अरुणोदयवेध ; सूर्याची प्रभा दिसूं लागल्यापासून दोन घटिका अतिवेध ; सूर्य दिसतो न दिसतो त्या वेळीं तो महावेध ; स्पष्ट सूर्योदय झाला असतां जो योग तो चतुर्थ उदयवेध " असें ब्रह्मवैवर्तवचन ; तेंही अवयवद्वारा म्हणजे अवयवाला वेध सांगून अरुणोदयवेधालाच महत्त्वबोधक आहे , असें माधवीयांत मदनरत्नांत सांगितलें आहे .

अंत्यस्तूदयवेधः तथान्येपिवेधाः हेमाद्रौमाधवीयेचगारुडे उदयात्प्राक् ‍ त्रिघटिकाव्यापिन्येकादशीयदा संदिग्धैकादशीनामवर्ज्येयंधर्मकांक्षिभिः उदयात्प्राड्मुहूर्तेनव्यापिन्येकादशीयदा संयुक्तैकादशीनामवर्ज्येयंधर्मवृद्धये हेमाद्रौ रात्रेरंत्योष्टमोभागोप्यरुणोदय उक्तः निशःप्रांतेतुयामार्धेदेववादित्रवादने सारस्वतानध्ययनेचारुणोदय उच्यत इतिस्मृतेः अत्रैके एषांसर्वपक्षाणांमुहूर्तद्वयेनक्रोडीकारान्निशः प्रांतेइतिवचनाच्चरात्रिमानवशात्सार्धत्रिदंडादयोनेकेरुणोदयाः तदाहहेमाद्रिः सार्धघटिकात्रयोक्तिरष्टाविंशतिघटीमितरात्रिविषया महत्तरास्तुरात्रीरपेक्ष्यचतस्रोघटिकाइत्युक्तमितीत्याहुः तन्न अरुणोदयशब्दस्यानेकार्थत्वापत्तेः नचमुहूर्तद्वयमर्थः दंडद्वयैकमुहूर्तादिवेधानांतथाप्यनुपपत्तेः नहितेषांयामार्धत्वमरुणोदयत्वंचास्ति मुहूर्तद्वयस्ययामार्धस्यचचतस्रोघटिकाइत्यनेनोपसंहाराच्चनतदर्थः नचसार्धंतुघटिकात्रयमित्यनेनापितदापत्तिः शंक्या तेनचतुर्दंडवेधस्यैवोक्तेः चतुर्दंडेऽर्धघटीदशमीसत्त्वेहिवेधस्तदर्थः द्विघटिकादौतदयोगाच्च ।

दुसरा उदयवेध . तसेच आणखीहि दुसरे वेध सांगतो - हेमाद्रींत व माधवीयांत - गरुडपुराणांत - " ज्या कालीं उदयाच्यापूर्वी तीन घटिकाव्यापिनी एकादशी असेल ती संदिग्धनामक एकादशी होय , ती धर्मेच्छु पुरुषांनीं वर्ज्य करावी ; जेव्हां उदयाच्या पूर्वी एक मुहूर्तव्यापिनी एकादशी असेल ती संयुक्तानामक एकादशी होय , ती धर्मवृद्धीसाठीं वर्ज्य करावी . " हेमाद्रींत - रात्रीचा शेवटचा आठवा भाग तोही अरुणोदय सांगितला आहे ; कारण , " रात्रीच्या शेवटच्या अर्ध्या प्रहरीं देववाद्यें वाजूं लागलीं म्हणजे तोही अरुणोदयकाल म्हटला आहे . " असें स्मृतिवचन आहे . याविषयीं कोणी ग्रंथकार म्हणतात - वर सांगितलेले हे जे सर्व पक्ष त्या सर्वांचा मुहूर्तद्वयांत अंतर्भाव असल्यामुळें आणि " रात्रीच्या शेवटचा अर्धा प्रहर अरुणोदय होय , " असें वचन आहे म्हणूनही रात्रिमानवशेंकरुन साडेतीन घटिका इत्यादिक अनेक अरुणोदयकाल होत , तेंच हेमाद्रि सांगतो - साडेतीन घटिकांस अरुणोदय , असें जें वचन तें अठ्ठावीस घटिका रात्रिमान असतां तद्विषयक आहे ; चार घटिका अरुणोदयकाल जो सांगितला तो रात्रिमान मोठें असतां तद्विषयक होय , असें म्हणतात . तें त्यांचें म्हणणें बरोबर नाहीं ; कारण , ‘ अरुणोदय ’ ह्या शब्दाचे अनेक अर्थ होऊं लागतील . आतां असें म्हणतों की , अरुणोदय म्हणजे दोन मुहूर्त असा अर्थ समजावा . बत्तीस घटिकांच्या रात्री असल्या तर दोन घटिकांचा मुहूर्त होतो , अठ्ठावीस घटिकांच्या रात्री असल्या तर पावणेदोन घटिकांचा मुहूर्त , मिळून अरुणोदयशब्दाचा अर्थ दोन मुहूर्तच आहे , असें मानलें म्हणजे अरुणोदयशब्दाचे अनेक अर्थ न होतां सर्व वाक्यांची संगति होते ; असें म्हणतां येत नाहीं ; कारण , दोन घटिकांचा वेध , एक मुहूर्ताचा वेध असे जे वेध सांगितले त्यांची उपपत्ति होत नाहीं ; कारण , त्या दोन घटिकादि वेधांला यामार्धत्व , किंवा अरुणोदयत्व आहे काय ? नाहीं . म्हणून अरुणोदय शब्दाचा दोन मुहूर्त हा अर्थ नाहीं . आणि दोन मुहूर्त , यामार्ध , ह्या वाक्यांचा , चार घटिकावेध ह्या वाक्यानें उपसंहार ( तात्पर्यार्थप्रतिपादन ) केला आहे , म्हणूनही अरुणोदयशब्दाचा दोन मुहूर्त हा अर्थ होत नाहीं . तर आतां एका वचनानें अरुणोदयवेध साडेतीन घटिका सांगितला आहे , त्यामुळें अरुणोदयशब्दाचा साडेतीन घटिका अर्थ , व पूर्वी सांगितलेला चार घटिका , मिळून अनेक अर्थाची आपत्ति येईल ! अशी शंका करुं नये ; कारण , ‘ साडेतीन घटिका ’ या वाक्यानें चार घटिका वेधच सांगितला आहे , तो असा चार घटिका अरुणोदयामध्यें अर्ध घटिका दशमी असेल तर वेध होतो , असा त्या वाक्याचा अर्थ आहे . दोन घटिकांचे वगैरे जे वेध सांगितले त्या ठिकाणीं अरुणोदय शब्दाची प्रवृत्तीच नाहीं .

यत्तुमतम् ‍ कियतारुणोदयवेधइत्यपेक्षायांसार्धघटिकात्रयनियमादरुणोदयेर्धघटिकातोन्यूनदशमीसत्त्वेनदोषइति तत्तुच्छम् ‍ द्विदंडादावपितदापत्तेः दशमीशेषसंयुक्तोयदिस्यादरुणोदयः नैवोपोष्यंवैष्णवेनतद्धिनैकादशीव्रतमिति गारुडेभविष्येचयोगमात्रनिषेधात् ‍ नारदीयेपि लववेधेपिविप्रेंद्रदशम्यैकादशींत्यजेत् ‍ सुरायाबिंदुनास्पृष्टंगंगांभ इवनिर्मलं स्कांदेपि कलाकाष्ठादिगत्यैवदृश्यतेदशमीविभो एकादश्यांनकर्तव्यंव्रतंराजन्कदाचनेति माधवोप्याह सोऽयंकलादिवेधोऽरुणोदयवेधेसूर्योदयवेधेचसमानइति निगमेपि सर्वप्रकारवेधोऽयमुपवासस्यदूषकइति अतएवमाधवेन अरुणोदयाद्यदंडेऽल्पदशमीस्पर्शेसंपृक्ता कृत्स्नघटीयोगे संदिग्धा मुहूर्तव्याप्तौसंयुक्ता उदयेसंकीर्णेत्युक्त्वा अरुणोदयवेलायांदशमीयदिसंगता संपृक्तैकादशींतांतुमोहिन्यैदत्तवान्प्रभुरिति गोभिलाद्युक्तेः पूर्वोक्तगारुडादेश्च सामान्यतोविशेषतश्चारुणोदयवेधोनिषिद्धः ।

आतां जें कोणाचें मत - किती कालानें अरुणोदय वेध होतो , अशी आकांक्षा उत्पन्न असतां ‘ साडेतीन घटिकांस ’ असा नियम केल्यामुळें , अरुणोदयांत अर्ध घटिकेहून न्यून दशमी असेल तर दोष नाहीं , असें तें मत तुच्छ आहे ; कारण , दोन घटिकांचे वगैरे जे वेध त्या ठिकाणींही असाच ( अरुणोदयांत दोन घटिकांहून न्यून दशमी असेल तर दोष नाहीं असा ) अर्थ होऊं लागेल ! म्हणून तसा ( अर्धघटिकेहून न्यून दशमी असेल तर दोष नाहीं असा ) अर्थ नाहीं ; कारण , " जर अरुणोदयकालीं दशमी शेष असेल तर त्या दिवशीं वैष्णवानें उपवास करुं नये ; कारण , तें एकादशीव्रत नाहीं " असा गारुडांत व भविष्यांत सर्व योगाचा निषेध केला आहे . नारदीयांतही " जरी गंगोदक निर्मल आहे तथापि जर सुराबिंदूनें संस्पृष्ट असेल तर तें जसें त्याज्य तद्वत् ‍ दशमीनें एक लवमात्र वेध केला असतांही ती एकादशी टाकावी . " स्कंदपुराणांतही " कला , काष्ठा इत्यादिक अल्प कालानें जरी दशमी असेल तथापि अशा दशमीयुक्त एकादशीस कदापि व्रत करुं नये . " माधवही सांगतो - तो हा कला - काष्ठादिपरिमित वेध अरुणोदयवेध व सूर्योदयवेध यांचे ठायीं तुल्य आहे . निगमांतही - " सर्व प्रकारचा हा वेध उपवासाला दूषक होतो " म्हणूनच माधवानें अरुणोदयाच्या पहिल्या घटिकेस अल्प दशमीचा स्पर्श असेल तर ती संपृक्ता एकादशी , एक घटिका योग असेल तर ती संदिग्धा एकादशी , दोन घटिका व्याप्ति असेल तर ती संयुक्ता एकादशी , उदयकालीं व्याप्ति असेल तर ती संकीर्णा एकादशी , असें सांगून " अरुणोदयकालीं जर दशमी प्राप्त असेल तर ती संपृक्ता एकादशी होते , ती एकादशी प्रभूनें मोहिनीला दिली आहे " ह्या गोभिलादिकांचे वचनावरुन व पूर्वोक्त " दशमीशेषसंयुक्तो ० " ह्या गारुडादिक वचनावरुनही सामान्येंकरुन व विशेषेंकरुनही अरुणोदयवेध निषिद्ध केला आहे .

यत्त्वष्टमभागोरुणोदय इतिहेमाद्रिणोक्तं यच्चमहत्तरारात्रीरितितत्परमतंस्वयमेवदूषितं अंतेप्युक्तं वेधतारतम्यंचदोषतारतम्यादुपपद्यतइति दोषतारतम्यंचप्रायश्चित्ततारतम्यादवगम्यते तच्चोक्तंहेमाद्रौस्मृत्यंतरे अज्ञानाद्यदिवामोहात्कुर्वन्नेकादशींनर : दशमीशेषसंयुक्तांप्रायश्चित्तमिदंचरेत् ‍ कृच्छ्रपादंनरश्चेर्त्वागांचदद्यात्सवत्सकाम् ‍ सुवर्णस्यार्धकंदेयंतिलद्रोणसमन्वितम् ‍ विधानांतरंतत्रैव ब्राह्मणान्भोजयेत्रिंशत् ‍ गांचदद्यात्सवत्सकां धरणस्यार्धकंदेयंतिलद्रोणमथापिवेति अत्रवेधतारतम्याव्द्यवस्थेतिहेमाद्रिः निशः प्रांतइत्यपिदोषाधिक्यार्थमेव तस्माच्चतुर्घटिकात्मकएवारुणोदयइतिसिद्धम् ‍ तेनषट् ‍ पंचाशद्दंडानंतरंदशमीप्रवेशेरुणोदयवेधउक्तोभवति ।

आतां जें रात्रीचा शेवटचा आठवा भाग तो अरुणोदय , असें हेमाद्रीनें सांगितलें तें , आणि जें रात्रिमान मोठें असतां चार घटिका अरुणोदयकाल तें दुसर्‍यांचें मत आपणच ( हेमाद्रीनेंच ) दूषित केलें व शेवटींही त्यानें सांगितलें कीं , वेधतारतम्य दोषतारताम्येंकरुन उपपन्न होतें ; तें दोषतारतम्य प्रायश्चित्ततारतम्येंकरुन समजलें जातें , तें सांगतो - हेमाद्रींत - स्मृत्यंतरांत - " जर कोणी मनुष्य अज्ञानेंकरुन किंवा मोहानें दशमीशेषयुक्त एकादशी करील तर त्यानें हें ( पुढें सांगितलेलें ) प्रायश्चित्त करावें . " तें असें : - " पादकृच्छ्र करुन सवत्स गोप्रदान करावें . द्रोणपरिमित तिलांसहित अर्ध सुवर्ण दान करावें . " दुसरें विधान - त्या ठिकाणींच सांगतो - " तीस ब्राह्मणांस भोजन द्यावें , सवत्स गाई द्यावी , अथवा द्रोणपरिमित तिल किंवा अर्ध धरणपरिमित सुवर्ण यांचें दान करावें . " यांविषयीं वेधतारतम्येंकरुन व्यवस्था करावी असें हेमाद्रि म्हणतो ‘ निशः प्रांते ’ असें जें पूर्वोक्त स्मृतिवचन तेंही अधिक दोषप्रदर्शनार्थच आहे , तस्मात् ‍ चार घटिकापरिमितच अरुणोदय असें सिद्ध झालें . म्हणून छप्पन्न घटिकांनंतर दशमीचा प्रवेश असेल तर तो अरुणोदयवेध होतो .

अंत्योपितत्रैवकण्वेनोक्तः उदयोपरिविद्धातुदशम्यैकादशीयदि दानवेभ्यःप्रीणनार्थंदत्तवान् ‍ पाकशासन इति स्मृत्यंतरेपि दशम्याःप्रांतमादाययदोदेतिदिवाकरः तेनस्पृष्टंहरिदिनंदत्तंजंभासुरायतदिति ।

अंत्य म्हणजे सूर्योदयवेधही त्याच ठिकाणीं कण्वानें सांगितला आहे . तो असाः - " जर उदयानंतर दशमीनें विद्ध एकादशी होईल तर ती एकादशी इंद्र दानवांना संतोषार्थ देता झाला . " स्मृत्यंतरांतही - " ज्या कालीं दशमीच्या शेवटचा पलादि भागांत सूर्य उदय पावतो त्या उदयानें स्पर्श केलेली एकादशी जंभासुराला दिली आहे . "

तत्रारुणोदयवेधोवैष्णवविषयः तद्वाक्येषुवैष्णवग्रहणात् ‍ तत्स्वरुपंतुमाधवीयेस्कांदे परमापदमापन्नोहर्षेवासमुपस्थिते नैकादशींत्यजेद्यस्तुयस्यदीक्षास्तिवैष्णवी विष्ण्वर्पिताखिलाचारः सहिवैष्णवउच्यतेइति यद्यपिपित्रादेरागमदीक्षायांतन्मात्रस्यवैष्णवत्वंनतुपुत्रादेस्तथापिस्वपारंपर्यप्रसिद्धमेववैष्णवत्वंस्मार्तत्वंचमन्यंतेवृद्धाः तत्त्वसागरभविष्ये यथाशुक्लातथाकृष्णायथाकृष्णातथेतरा तुल्येतेमन्यतेयस्तुसवैवैष्णव उच्यते केचित्तुदशम्यांनवमीवेधमपित्यजंति तत्रमूलंमृग्यम् ‍ ।

त्या वेधांमध्यें अरुणोदयवेध वैष्णवांविषयीं आहे ; कारण , अरुणोदयवेधप्रतिपादकवाक्यांत ‘ वैष्णव ’ असें पद पठित आहे . वैष्णवांचें स्वरुप - माधवीयांत - स्कांदांत - " मोठी आपत्ति प्राप्त झाली , किंवा मोठा हर्ष झाला तरी जो एकादशी टाकीत नाहीं , ज्याला वैष्णवी दीक्षा ( उपदेश ) आहे , ज्यानें आपला सर्व आचार ( कर्म ) विष्णूला अर्पण केलें आहे , तो वैष्णव म्हटला आहे . " पिता , पितामह इत्यादिकांनीं आगमदीक्षा ग्रहण केली असेल तर ते मात्र वैष्णव होतात ; त्यांचे पुत्रादिक वैष्णव होत नाहींत , असें जरी आहे तथापि आपल्या परंपरेनें प्रसिद्ध जें वैष्णवत्व व स्मार्तव्य तें वृद्ध मानितात . तत्त्वसागरांत - भविष्यांत - " जशी शुक्लैकादशी तशीच कृष्णैकादशी . जशी कृष्णैकादशी , तशीच शुक्लैकादशी , याप्रमाणें उभय एकादशी जो समान मानितो तो वैष्णव होय , " केचित् ‍ ग्रंथकार तर , दशमीचे ठायीं नवमीवेधही वर्ज्य करितात , परंतु त्याविषयीं मूळ ( प्रमाण ) नाहीं .

उदयवेधस्तुपरिशेषात् ‍ स्मार्तगोचरः तदाहमाधवः अरुणोदयवेधोत्रवेधः सूर्योदयेतथा उक्तौद्वौदशमीवेधौवैष्णवस्मार्तयोःक्रमात् ‍ ।

जो उदयकालिक वेध तो स्मार्तविषयक होय , तेंच माधव सांगतो - " ह्या एकादशीव्रताविषयीं अरुणोदयवेध आणि सूर्योदयवेध असे दोन दशमीवेध , वैष्णव व स्मार्त यांना क्रमेंकरुन सांगितले आहेत . " म्हणजे अरुणोदयवेध वैष्णवांनीं व सूर्योदयवेध स्मार्तांनीं घ्यावा .

हेमाद्रिस्तुकेषांचिदर्धरात्रेपिदशमीवेधमाह अर्धरात्रेकेषांचिद्दशम्यावेध उच्यते कपालवेध इत्याहुराचार्यायेहरिप्रियाः नतन्मममतंयस्मात् त्रियामारात्रिरिष्यत इतिब्रह्मवैवर्तात् ‍ अस्यार्थः अनद्यतनेलड् ‍ इत्यत्रातीतायारात्रेः पश्चिमयामद्वयमागामिन्यारात्रेःपूर्वयामद्वयंदिवसश्चसकालएषोद्यतनःसकल इत्युक्तंमहाभाष्ये सएषवर्तमानः कालएकादश्यहोरात्र उपोप्यः तन्मध्येदशमीप्रवेशेविद्धासात्याज्या अतएवहेमाद्रौ दशम्याः संगदोषेण अर्धरात्रात्परेणतु वर्जयेच्चतुरोयामान्संकल्पार्चनयोःसदेतिदोष उक्तः चतुरोयामान् ‍ दिवसस्येत्यर्थः स्वमतेतु रात्रेस्त्रियामत्वात्प्रहरत्रयंपूर्वशेषः तेनचतुर्थप्रहरएववेधोयुक्तः सोप्यरुणोदयएव सूर्योदयंविनानैवस्नानदानादिकः क्रम इति मार्कंडेयपुराणात् ‍ प्रत्यूषोऽहर्मुखंकल्य इतिकोशादरुणोदयमारभ्य सूर्यांशुप्रवृत्तेस्तत्रैनिषेधः तेनमतभेदाव्द्यवस्थेतिकेचित् ‍ कैमुतिकन्यायेनारुणोदयवेधस्यैवेयंस्तुतिरितितुमाधवः यस्तुदिक्पंचदशभिस्तथेतिवेधः स उपवासातिरिक्तविषय इतिमाधवः सर्वप्रकारवेधोयमुपवासस्य दूषकः सार्धसप्तमुहूर्तस्तुयोगोयंबाधतेव्रतमितिनिगमादित्यलम् ‍ ।

हेमाद्रि तर कित्येकांस अर्धरात्रींही दशमीवेध सांगतो . तो असा - " कित्येकांस अर्धरात्रीं दशमीचा वेध उक्त आहे , तोच कपालवेध होय असें वैष्णव आचार्य म्हणतात . परंतु माझें मत तसें नाहीं ; कारण , तीन प्रहरांची रात्र सांगितली आहे " असें ब्रह्मवैवर्तवचन आहे . या वचनाचा अर्थ असा - " अनद्यतने लड " या सूत्राचे ठिकाणीं , अतीत ( गत ) रात्रीचे पश्चिम ( पुढचे ) दोन प्रहर , आणि येणार्‍या रात्रीचे पूर्व दोन प्रहर व मध्यवर्ती दिवस मिळून जो काल तो सर्व अद्यतनकाल होय , असें व्याकरणमहाभाष्यांत अद्यतनकालाचें विवरण केलें आहे , तो हा वर्तमानकाल , एकादशीचा अहोरात्र उपोष्य ( उपोषणास विहित ) होय ; त्या कालांत दशमीचा प्रवेश असतां ती विद्धैकादशी टाकावी , असें आहे म्हणूनच हेमाद्रींत - " अर्ध रात्रीच्या पुढें दशमीचा संगदोष असेल तर तो एकादशीचा दिवस ( दिवसाचे चार प्रहर ) संकल्प व पूजा यांविषयीं सर्वदा वर्ज्य करावा " असा दोष सांगितला आहे . आपल्या मतें तर - रात्रि ही तीन प्रहरात्मक आहे , म्हणून तीन प्रहर हे पूर्व दिवसाचा शेष आहे , यावरुन चवथ्या प्रहरींच वेध योग्य , व तोही अरुणोदयकालींच येतो , कारण , " सूर्योदयावांचून स्नानदानादिक क्रिया होत नाहींत " असें मार्कंडेयपुराणवचन आहे . प्रत्यूष , अहर्मुख हीं नांवें कोशकारानें त्यालाच सांगितलीं आहेत , म्हणून अरुणोदयापासून सूर्यकिरणांची प्रवृत्ति होते , याकरितां अरुणोदयकालींच दशमीचा निषेध आहे . यावरुन मतभेदेंकरुन वेधाची व्यवस्था जाणावी , असें केचित् ‍ ग्रंथकार म्हणतात . कैमुतिकन्यायानें ( दोन प्रहरांत दशमी असली तरी वेध आहे , मग अरुणोदयकालीं दशमी असेल तर वेध काय सांगावा ? अशा न्यायानें ) अरुणोदयवेधाचीच स्तुति आहे असें तर माधव म्हणतो . आतां जो " दशमी पंधरा घटिकांनीं एकादशीला विद्ध करिते " असा वेध सांगितला तो उपवासव्यतिरिक्तविषयक होय असें माधव म्हणतो ; कारण , " हा सर्व प्रकारचा वेध उपवासाचा दूषक होतो , पंधरा घटिकापरिमित दशमीयोग हा व्रतास बाध करितो " असें निगमवाक्य आहे . आतां हा विचार पुरे .

अत्रमाधवमतेवैष्णवैररुणोदयविद्धात्याज्या यदात्वेकादश्येवशुद्धासतीवर्धतेद्वादशीवाउभयंवातदापरोपोष्या एकादशीद्वादशीवाधिकाचेत्त्यज्यतांदिनम् ‍ पूर्वंग्राह्यंतूत्तरंस्यादितिवैष्णवनिर्णयः इतिमाधवोक्तेः ।

या विद्ध एकादशीमध्यें माधवाचे मतीं वैष्णवांनीं अरुणोदयविद्धा टाकावी . ज्या वेळीं एकादशीच शुद्धा असून वृद्धिंगत होते ( दुसर्‍या दिवशीं असते ), किंवा द्वादशी वृद्धिंगत होते , अथवा एकादशी व द्वादशी दोन्ही तिथि वृद्धिंगत असतात त्या वेळीं दुसर्‍या दिवसाची ती वैष्णवांनीं उपोषणास घ्यावी ; कारण , " एकादशी किंवा द्वादशी वृद्धिगामिनी ( दुसर्‍या दिवशीं उर्वरित ) असेल तर वैष्णवांनीं पूर्वदिवसाची टाकून उत्तरदिवसाची घ्यावी , असा वैष्णवांचा निर्णय आहे " असें माधवानें सांगितलें आहे .

स्मार्तैस्तु सूर्योदयविद्धात्याज्या यदात्वेकादशीशुद्धासतीवर्धतेद्वादशीचसमान्यूनावातदागृहस्थैः पूर्वायतिभिरुत्तराकार्या प्रथमेहनिसंपूर्णाव्याप्याहोरात्रसंयुता द्वादश्यांचतथातातदृश्यतेपुनरेवच पूर्वाकार्यागृहस्थैश्चयतिभिश्चोत्तराविभोइतिस्कांदोक्तेः वर्धमानोप्येवमेवाह ।

स्मार्तांनीं तर सूर्योदयविद्धा टाकावी . ज्या वेळीं एकादशी शुद्ध असून वाढते ( दुसर्‍या दिवशीं असते ), आणि द्वादशी तर समा किंवा न्यूना असते , त्या वेळीं गृहस्थाश्रमी यांनीं पूर्वा करावी . यति ( संन्यासी ) विधवा यांनीं उत्तरा करावी ; कारण , " पूर्वदिवशीं अहोरात्र व्याप्ति संपूर्ण असून दुसर्‍या दिवशीं द्वादशीचे ठायीं एकादशी असेल तर गृहस्थांनीं पूर्वा आणि यतींनीं उत्तरा करावी . " असें स्कंदपुराणवचन आहे . वर्धमानही असेंच सांगतो .

उभयवृद्धौतुशुद्धाविद्धावासर्वेषांपरैव संपूर्णैकादशीयत्रप्रभातेपुनरेवसा सर्वैरेवोत्तराकार्यापरतोद्वादशीयदीतिनारदोक्तेः द्वादशीमात्रवृद्धौतुशुद्धायांपूर्वैव नचेदेकादशीविष्णौद्वादशीपरतःस्थिता उपोष्यैकादशीतत्रयदीच्छेत्परमंपदमितिनारदोक्तेः द्वादशीमात्रवृद्धौतुशुद्धाविद्धेव्यवस्थिते शुद्धापूर्वोत्तराविद्धास्मार्तनिर्णय ईदृश इतिमाधवोक्तेश्च मदनरत्नेप्येवम् ‍ यत्तु विद्धाप्यविद्धाविज्ञेयापरतोद्वादशीनचेत् ‍ अविद्धापिच विद्धास्यात्परतोद्वादशीयदीति हेमाद्रौपाद्मवचनंतदेकादश्यावृद्धौज्ञेयम् ‍ तदुक्तंमाधवेन एकादशीद्वादशीचेत्युभयंवर्धतेयदा तदापूर्वंदिनंत्याज्यंस्मार्तैर्ग्राह्यंपरंदिनमिति ।

एकादशी व द्वादशी ह्या दोघांची वृद्धि असेल तर शुद्धा असो किंवा विद्धा असो , सर्वांनीं पराच करावी ; कारण , " पूर्व दिवशीं संपूर्ण एकादशी असून दुसर्‍या दिवशीं पुनः वृद्धिगामिनी एकादशी व तिसर्‍या दिवशीं द्वादशी जर असेल तर सर्वांनीं उत्तराच करावी " असें नारदवचन आहे . द्वादशीची मात्र वृद्धि असेल तर शुद्धा असतां पूर्वाच करावी ; कारण , " द्वादशीचे दिवशीं एकादशी अल्प सुद्धां नाहीं , आणि द्वादशी त्या दिवशीं असून पुढच्या दिवशीं आहे त्या वेळीं , एकादशीलाच उपोषण करावें " असें नारदवचन आहे ; आणि " द्वादशीची मात्र वृद्धि असेल तर शुद्धा आणि विद्धा व्यवस्थित जाणाव्या , म्हणजे शुद्धा असतां पूर्वा , आणि विद्धा असतां उत्तरा करावी , याप्रमाणें स्मार्तनिर्णय समजावा " अशी माधवाचीही उक्ति आहे . मदनरत्नांतही असेंच आहे . आतां जें " दुसर्‍या दिवशीं द्वादशी नसेल तर , ती विद्धा असतांही अविद्धा जाणावी . आणि जर दुसर्‍या दिवशीं द्वादशी असेल तर अविद्धा असतांही विद्धा जाणावी " असें हेमाद्रींत

पाद्मवचन , तें एकादशीची वृद्धि असतां जाणावें . तें माधवानें सांगितलें आहे . तें असें : - " ज्या कालीं एकादशी व द्वादशी ह्या दोनही तिथि वाढतात , त्या कालीं स्मार्तांनीं पूर्वदिवस टाकून दुसरा दिवस उपोषणाला घ्यावा . "

विद्धैकादश्यांद्वादशीमात्रवृद्धौचसर्वेषांपरैव तत्रैवैकादशीमात्रवृद्धौगृहिणः पूर्वायतेरुत्तरा पूर्वोक्तपाद्मोक्तेः एकादशीविवृद्धाचेच्छुक्लेकृष्णेविशेषतः उत्तरांतुयतिः कुर्यात्पूर्वामुपवसेद्गृहीतिप्रचेतसोक्तेः एतच्छुद्धाविद्धातुल्यमितिमाधवः त्रयोदश्यांनलभ्येतद्वादशीयदिकिंचन उपोष्यैकादशीतत्रदशमीमिश्रितापिचेतिस्कांदात् ‍ अविद्धानिनिषिद्धैश्चनलभ्यंतेदिनानितु मुहूर्तैः पंचभिर्विद्धाग्राह्यैवैकादशीतिथिरित्यृष्यश्रृंगोक्तेश्च मुहूर्तपंचकमरुणोदयमारभ्यज्ञेयम् ‍ अन्यथोत्तरेऽह्निएकादश्यभावासंभवात् ‍ यदपिहेमाद्रिणा शुद्धसमाशुद्धन्यूनावाअधिकद्वादशिकाचेत्सर्वेषांपरैवेत्युक्तंतदपिवैष्णवविषयं स्मार्तानांतुपूर्वैवेत्यविरोधः ।

विद्धैकादशी असून द्वादशीची मात्र वृद्धि असतां सर्वांनीं दुसर्‍या दिवसाचीच उपोषणाला घ्यावी . विद्धैकादशी असून एकादशीची मात्र वृद्धि असतां गृहस्थाश्रमी यांनीं पूर्वा करावी ; संन्यासी यांनीं उत्तरा करावी ; कारण , " जर दुसर्‍या दिवशीं द्वादशी नसेल तर , ती विद्धा असतांही अविद्धा आणि जर दुसर्‍या दिवशीं द्वादशी असेल तर अविद्धा असतांही विद्धा जाणावी " असें पूर्वोक्त पाद्मवचन आहे . " शुक्लपक्षीं आणि कृष्णपक्षीं एकादशीची वृद्धि असेल तर गृहस्थाश्रम्यांनीं पूर्वा करावी , आणि यतींनीं उत्तरा करावी " असें प्रचेतसाचें वचन आहे . हें ( प्रचेतसाचें ) वचन शुद्धा व विद्धा यांविषयीं तुल्य आहे असें माधव म्हणतो ; कारण , " त्रयोदशीस अल्पही द्वादशी नसेल तर दशमीयुक्तही एकादशी उपोषणाला घ्यावी " असें स्कांदवचन आहे . आणि " जर निषिद्ध अशा दशमीनें अविद्ध अशी एकादशी मिळत नाहीं , तर पांच मुहूर्तांनीं विद्ध अशी एकादशी ग्रहण करावी . " असें ऋष्यश्रृंगाचेंही वचन आहे . येथें पांच मुहूर्त म्हटले ते अरुणोदयापासून समजावे . अरुणोदयापासून न समजतां सूर्योदयापासून घेतले तर दुसर्‍या दिवशीं एकादशी नाहीं , असें होणार नाहीं . आतां जें हेमाद्रीनें सांगितलें कीं , शुद्धसभा किंवा शूद्धन्यूना अशी एकादशी व दुसर्‍या दिवशीं अधिक द्वादशी असेल तर सर्वांनीं पराच करावी , तेंही हेमाद्रिमत वैष्णवविषयक समजावें . स्मार्तांनीं तर पूर्वाच करावी , म्हणजे कोणताही विरोध येत नाहीं .

हेमाद्रीमतेतूच्यते तत्र शुद्धाविद्धाद्वयीनंदात्रेधान्यूनसमाधिकैः षट् ‍ प्रकाराःपुनस्त्रेधाद्वादश्यूनसमाधिकैरित्यष्टादशैकादशीभेदाः तत्रशुद्धाधिकन्यूनद्वादशिकाशुद्धाधिकसमद्वादशिकाचसकामैः पूर्वानिष्कामैरुत्तराकार्या प्रथमेहनिसंपूर्णेतिपूर्वोक्तस्कांदात् ‍ ऊनद्वादशिकायांतुविष्णुप्रीतिकामैरुपवासद्वयंकार्यम् ‍ संपूर्णैकादशीयत्रप्रभातेपुनरेवसा लुप्यतेद्वादशीतस्मिन्नुपवासः कथंभवेत् ‍ उपोष्येद्वेतिथीतत्रविष्णुप्रीणनतत्परैरितिवृद्धवसिष्ठोक्तेः शुद्धन्यूनाशुद्धाधिकाशुद्धसमाविद्धन्यूनाविद्धसमावाधिकद्वादशिकाचेत्सर्वेषांपरैवेतिहेमाद्रिः ।

आतां हेमाद्रिमतीं तर सांगतो - शुद्धा भेद - १ शुद्धन्यूनान्यूनद्वादशिका , २ शुद्धन्यूनासमद्वादशिका , ३ शुद्धन्यूनाऽधिकद्वादशिका , ४ शुद्धसमा न्यूनद्वादशिका , ५ शुद्धसमा समद्वादशिका , ६ शुद्धसमाऽधिकद्वादशिका , ७ शुद्धाधिकान्यूनद्वादशिका , ८ शुद्धाधिकांसमद्वादशिका , ९ शुद्धाधिकाधिकद्वादशिका . विद्धाभेद - १ विद्धन्यूनान्यूनद्वादशिका , २ विद्धन्यूनासमद्वादशिका , ३ विद्धन्यूनाधिकद्वादशिका , ४ विद्धसमान्यूनद्वादशिका , ५ विद्धसमासमद्वादशिका , ६ विद्धसमाधिकद्वादशिका , ७ विद्धाधिकान्यूनद्वादशिका , ८ विद्धाधिकासमद्वादशिका , ९ विद्धाधिकाऽधिकद्वादशिका . याप्रमाणें शुद्धाभेद ९ व विद्धाभेद ९ मिळून एकादशीचे अठरा भेद होतात . त्यांमध्यें शुद्धाधिकान्यूनद्वादशिका व शुद्धाधिकासमद्वादशिका ह्या दोन एकादशी सकामांनीं पूर्वा व निष्कामांनीं उत्तरा कराव्या ; कारण , " पूर्वदिवशीं अहोरात्रव्याप्तीनें संपूर्ण असून दुसर्‍या दिवशीं द्वादशीचे ठायीं व्याप्ति असेल तर गृहस्थांनीं पूर्वा आणि यतींनीं उत्तरा करावी " असें पूर्वोक्त स्कांदवचन आहे . ऊनद्वादशिका असेल तर वैष्णवांनीं दोन उपोषणें करावीं ; कारण , " जर पूर्वदिवशीं संपूर्ण एकादशी असून दुसर्‍या दिवशींही वृद्धिगामिनी एकादशी असेल आणि द्वादशीचा क्षय झाला असेल तर उपवास कसा होतो ? अशा समयीं वैष्णवांनीं एकादशी व द्वादशी ह्या दोन दिवशीं उपोषण करावें " असें वृद्धवसिष्ठाचें वचन आहे . शुद्धन्यूना , शुद्धाधिका , शुद्धसमा , विद्धन्यूना , विद्धसमा अशी अधिकद्वादशिका असेल तर सर्वांनीं ( वैष्णव व स्मार्त यांनीं ) पराच उपोषणाला घ्यावी , असें हेमाद्रि सांगतो .

मदनरत्नेतुशुद्धाधिकापरा संपूर्णैकादशीयत्रेतिपूर्वोक्तेः अन्यापूर्वा शुद्धायदासमाहीनासमाहीनाधिकोत्तरा एकादशीमुपवसेन्नशुद्धांवैष्णवीमपीतिस्कांदात् ‍ शुद्धाएकादशी उत्तराद्वादशी नचेदेकादशीविष्णौइति नारदोक्तेश्च । यत्तु अविद्धापिचविद्धास्यादितिपाद्मंतच्छुद्धाधिकापरम् ‍ यत्तु संपूर्णैकादशीत्याज्यापरतोद्वादशीयदि उपोष्याद्वादशीशुद्धाद्वादश्यामेवपारणमित्यादितद्वैष्णवपरम् ‍ स्मार्तानांतुपूर्वैवेत्युक्तं ।

मदनरत्नाच्या मतें तर शुद्धाधिका अधिकद्वादशिका असतां परा करावी . कारण , " पूर्वदिवशीं संपूर्ण एकादशी असून पुनः दुसर्‍या दिवशीं प्रभातकालीं एकादशीच आहे , व तिसर्‍या दिवशीं द्वादशी असेल तर सर्वांनीं ( स्मार्त व वैष्णवांनीं ) पराच करावी " असें पूर्वी ( नारद ) वचन सांगितलें आहे . अन्या म्हणजे शुद्धन्यूना किंवा शुद्धसमा अशी अधिकद्वादशिका असेल तर पूर्वा करावी ; कारण , " जर एकादशी शुद्धा असून समा म्हणजे दुसर्‍या सूर्योदयापर्यंत किंवा त्याहून कमी अशी असेल तर आणि द्वादशी हीना , समा किंवा अधिका अशी असेल तर एकादशीसच उपोषण करावें , द्वादशीस करुं नये " असें स्कंदपुराणवचन आहे . आणि एकादशी दुसर्‍या दिवशीं नसून द्वादशी तिसर्‍या दिवशीं अधिक असेल तर त्या ठिकाणीं एकादशीस उपोषण करावें " असें पूर्वोक्त नारदवचनही आहे . आतां जें " अविद्धा जी एकादशी ती विद्धा होते , जर दुसर्‍या दिवशीं द्वादशी असेल तर " असें पाद्मवचन तें शुद्धाधिकाविषयक जाणावें . आणि जें " पूर्वादिवशीं संपूर्ण एकादशी असून दुसर्‍या दिवशीं व तिसर्‍या दिवशीं द्वादशी असेल तर ती एकादशी टाकून केवळ द्वादशीचे ठायीं उपोषण

करुन द्वादशीलाच पारणा करावी " इत्यादिक वचन तें वैष्णवपर जाणावें . स्मार्तांनीं तर पूर्वाच करावी असें सांगितलें आहे .

विद्धन्यूनासमद्वादशिकातुमुमुक्षूणांपुत्रवतांचपरा अन्येषांपूर्वा पुत्रवतोपिपूर्वेतिमदनरत्ने विद्धन्यूनान्यूनद्वादशिकासैवसर्वैः कार्येतिहेमाद्रिः मुमुक्षूणांपरान्येषांपूर्वेतिमदनरत्ने विद्धसमासमद्वादशिकोनद्वादशिकाचमुमुक्षुभिः पराऽन्यैः पूर्वाकार्या दशमीमिश्रितापूर्वाद्वादशीयदिलुप्यते शुद्धैवद्वादशीराजन्नुपोष्यामोक्षकांक्षिभिरितिव्यासोक्तेः मोक्षकांक्षिग्रहणादन्येषांपूर्वैव सर्वत्रैकादशीकार्याद्वादशीमिश्रितानरैः प्रातर्भवतुवामावायतोनित्यमुपोषणमितिपाद्मोक्तेः ।

विद्धन्यूनासमद्वादशिका तर मोक्षेच्छु व पुत्रवंत यांनीं परा करावी , इतरांनीं पूर्वा करावी . पुत्रवंतांनींही पूर्वा करावी असें मदनरत्नांत सांगितलें आहे . विद्धन्यूनान्यूनद्वादशिका अशी असेल तर सर्वांनीं पूर्वाच करावी असें हेमाद्रि सांगतो . मोक्षेच्छूंनीं परा करावी , इतरांनीं पूर्वा करावी असें मदनरत्नांत सांगितलें आहे . विद्धसमा एकादशी समद्वादशिका किंवा ऊनद्वादशिका असेल तर मोक्षेच्छूंनीं परा करावी , अन्यांनीं पूर्वा करावी . कारण , " दशमीमिश्रित अशी पूर्वा एकादशी असून द्वादशी क्षयगामिनी असेल तर मोक्षेच्छूंनीं शुद्ध द्वादशीचे ठायींच उपोषण करावें " असें व्यासवचन आहे . व्यासवचनांत ‘ मोक्षेच्छूंनीं ’ असें म्हटलें आहे , यास्तव इतरांनीं पूर्वा करावी ; कारण , द्वादशीमिश्रित एकादशी प्रातःकालीं असो अगर नसो , तथापि तीच सर्वांनीं करावी ; कारण , एकादशीप्रयुक्त उपोषण नित्य आहे " असें पाद्मवचन आहे .

विद्धाधिकासमद्वादशिकाचसर्वेषांपूर्वैव पारणाहेनलभ्येतद्वादशीकलयापिचेत् ‍ तदानींदशमीविद्धाप्युपोष्यैकादशीतिथिरितिऋष्यश्रृंगोक्तेश्च माधवमतेतु अत्रगृहिणः पूर्वायतेरुत्तरा विद्धाधिकान्यूनद्वादशिका मोक्षपापक्षयविष्णुप्रीतिकामैः पराकार्या गृहस्थेनतुनक्तंकार्यम् ‍ एकादशीद्वादशीचरात्रिशेषेत्रयोदशी उपवासंनकुर्वीतपुत्रपौत्रसमन्वित इति कौर्मेदिनक्षयेउपवासनिषेधात् ‍ दशम्यैकादशीविद्धाद्वादशीचक्षयंगता क्षीणासाद्वादशीज्ञेयानक्तंतुगृहिणः स्मृतमितिवृद्धशातातपोक्तेश्च गृहिणः पूर्वत्रोपवासः एकादश्याः शुद्धन्यूनत्वे शुद्धसमत्वेवा द्वादश्याः न्यूनसमत्वयोरेकादश्यामुपवासः यानितु दशम्यनुगताहंतिद्वादशद्वादशीफलम् ‍ धर्मापत्यधनायूंषित्रयोदश्यांतुपारणमितिकौर्मादीनिदशमीवेधत्रयोदशीपारणयोः निषेधकानि तानिविहितभिन्नपराणि अत्रमूलवचनानितव्द्यवस्थाचाकरेज्ञेया ।

विद्धाधिकासमद्वादशिका ही सर्वांनीं पूर्वाच करावी . कारण , " जर पारणादिवशीं कलामात्रही द्वादशी नसेल तर दशमीविद्धा असली तरी पूर्वा उपोषणाला घ्यावी " असें ऋष्यश्रृंगवचनही आहे . माधवाच्या मतीं तर ही एकादशी गृहस्थाश्रम्यांनीं पूर्वा करावी . यतींनीं परा करावी . विद्धाधिकान्यूनद्वादशिका एकादशी असेल तर मोक्षेच्छु , पापक्षयेच्छु , आणि विष्णुप्रीतिकाम यांनीं परा करावी ; गृहस्थाश्रम्यानें तर नक्त करावें ; कारण , " एकादशी व द्वादशी एक दिवशीं असून रात्रिशेषकालीं त्रयोदशी असेल तर पुत्रपौत्रयुक्त पुरुषानें त्या दिवशीं उपोषण करुं नये " असें कौर्मवचन दिनक्षयाचे ठायीं उपवासाचें निषेधक आहे ; आणि " एकादशी दशमीविद्ध असून द्वादशीचा क्षय असेल तर ती क्षीणा द्वादशी होय , यास्तव तिचे ठायीं गृहस्थाश्रम्यानें नक्त करावें " असें वृद्धशातातपवचनही आहे . एकादशी शुद्धन्यूना किंवा शुद्धसमा असेल तर गृहस्थाश्रम्यानें पूर्वदिवशीं ( त्याच दिवशीं ) उपोषण करावें . आणि द्वादशी न्यून किंवा सम असेल तर एकादशीस उपोषण करावें . आतां जीं " दशमीयुक्त एकादशी , बारा द्वादशींचें फल नष्ट करिते ; त्रयोदशीचे ठायीं पारणा केली असतां धर्म , अपत्य , धन , आयुष्य यांचा नाश करिते " अशीं कौर्मादिवचनें दशमीवेध व त्रयोदशीपारणा यांचा निषेध करणारीं आहेत , तीं विहितभिन्नपर जाणावीं . याविषयींचीं मूलवचनें आणि त्या वचनांची व्यवस्था आकर ग्रंथांत पाहावी .

यत्तुकालहेमाद्रौ बहुवाक्यविरोधेनसंदेहोजायतेयदा द्वादशीतुतदाग्राह्यात्रयोदश्यांतुपारणमिति मार्कंडेयोक्तेः संदिग्धेषुचवाक्येषुद्वादशींसमुपोषयेत् ‍ तथा विवादेषुचसर्वेषुद्वादश्यांसमुपोषणम् ‍ पारणंचत्रयोदश्यामाज्ञेयंमामकीमुने इतिपाद्मोक्तेश्च वेधसंदेहेज्योतिर्विदांविप्रतिपत्तौवापराकार्येत्युक्तं तद्वैष्णवविषयमित्यलंबहुना ।

आतां जें कालहेमाद्रींत - " परस्परविरोधक अशीं बहुत वाक्यें असल्याकारणानें निर्णयाचा संदेह जेथें प्राप्त होतो तेथें द्वादशीस उपोषण करुन त्रयोदशीस पारणा करावी " ह्या मार्केंडेयवचनावरुन आणि " संदिग्ध वाक्यें असतां द्वादशीचे ठायीं उपोषण करावें . " तसेंच " हे मुने , सर्वं विवादस्थलीं द्वादशीचे ठायीं उपोषण करुन त्रयोदशीस पारणा करावी , अशी ही माझी आज्ञा आहे " ह्या पाद्मवचनावरुनही वेधसंदेह असतां किंवा ज्योतिःशास्त्रज्ञांची विप्रतिपत्ति असतां परा करावी , असें सांगितलें तें वैष्णवविषयक होय . याप्रमाणें एकादशीविषयक इतका निर्णय पुरे आहे , याहून अधिक नको .

N/A

References : N/A
Last Updated : May 15, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP