मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|निर्णयसिंधु|प्रथम परिच्छेद|
बाल्यादि लक्षण

प्रथम परिच्छेद - बाल्यादि लक्षण

निर्णयसिंधु ग्रंथामध्ये कोणत्या कर्माचा कोणता काल, याचा मुख्यत्वेकरून निर्णय केलेला आहे.


बाल्यादिलक्षणमुक्तंब्रह्मसिद्धांते रविणासक्तिरन्येषांग्रहाणामस्त उच्यते ततोऽर्वाग्वार्धकंप्रोक्तमूर्ध्वंबाल्यंप्रकीर्तितमिति बाल्यादिपरिमाणंचवृत्तशते बालःशुक्रोदिवसदशकंपंचकंचैववृद्धः पश्चादह्नांत्रितयमुदितः पक्षमैंद्यांक्रमेण जीवोवृद्धःशिशुरपितथापक्षमन्यैः शिशूतौवृद्धौप्रोक्तौदिवसदशकंचापरैःसप्तरात्रम्‍ पश्चिमत उदयेदशदिनानिबालः अस्तेपंचदिनानिवृद्धः पूर्वतोदिनत्रयंबालः पक्षंचवृद्ध इत्यर्थः जीवोगुरुः अन्यत्रत्वन्यथोक्तं प्राक्पश्चादुदितःशुक्रःपंचसप्तदिनंशिशुः विपरीतंतुवृद्धत्वंतद्वदेवगुरोरपीति एषांचपक्षाणांव्यवस्थामाहमिहिरः बहवोदर्शिताःकालायेबाल्येवार्धकेपिवा ग्राह्यास्तत्राधिकाःशेषादेशभेदादुतापदीति देशभेदश्चमदनरत्नेगार्ग्यः शुक्रोगुरुः प्राक्चपराक्चबालोविंध्येदशावंतिषुसप्तरात्रम्‍ वंगेषुहूणेषुचषट्‍चपंचशेषेचदेशेत्रिदिनंवदंतीति ।

शुक्र व गुरु यांचें बाल्यादि लक्षण सांगतो.
ब्रह्मसिद्धांतांत - " रवीसहवर्तमान जी अन्य ग्रहांची आसत्ति ( जवळ राहणें ) तें अस्त म्हटलें आहे. त्या अस्ताच्या पूर्वींची जी अवस्था तें वार्धक्य, उदयानंतर जी अवस्था तें बाल्य म्हटलें आहे. " बाल्यादिक दिवसांची संख्या सांगतो - वृत्तशतांत म्हणतो. " शुक्र पश्चिमदिशेस उदय पावला असतां दहा दिवस बाल्य, अस्तंगत झाला असतां पांच दिवस वार्धक्य; पूर्व दिशेस उदय पावला असतां तीन दिवस बाल्य, आणि अस्तंगत झाला असतां पंधरा दिवस वृद्धत्व जाणावें; याचप्रमाणें गुरुचें बाल्य व वार्धक्य जाणावें. दुसरे म्हणतात - शुक्र व गुरु यांचें बाल्य आणि वार्धक्य पंधरा पंधरा दिवस आहे; अन्य म्हणतात दहा दहा दिवस; अपर म्हणतात सात सात दिवस आहे. " अन्य ग्रंथीं दुसर्‍या प्रकारें सांगतो - ‘ शुक्र पूर्व दिशेस उदय पावला असतां पांच दिवस बाल, आणि पश्चिम दिशेस उदय पावला असतां सात दिवस बाल; वार्धक्य तर याच्या उलट, म्हणजे पूर्व दिशेस अस्त असतां सात दिवस वार्धक्य, आणि पश्चिम दिशेस अस्त असतां पांच दिवस वार्धक्य होय. याप्रमाणेंच गुरुचेंही बाल्य व वार्धक्य जाणावें. " ह्या सर्व पक्षांची व्यवस्था मिहिर सांगतो - " गुरुशुक्रांच्या बाल्यवार्धक्याविषयीं बहुत काल दाखविले, त्यांमध्यें जे अधिक काल ( १५।१० इत्यादि दिवस ) असतील ते घ्यावे, इतर ( न्यूनकाल ) देशभेदानें अथवा आपत्कालीं घ्यावे. " मदनरत्नांत गार्ग्य देशभेद सांगतो - " शुक्र व गुरु हे पूर्वेस व पश्चिमेस उदित असतां विंध्यप्रदेशीं दहा दिवस बाल, अवंतिदेशांत सात दिवस, वंग देशांत सहा दिवस, हूणदेशांत पांच दिवस, इतर देशांत तीन दिवस बाल, असें विद्वान्‍ म्हणतात. "

अस्तादेरपवादःकाशीखंडे नग्रहास्तोदयकृतोदोषोविश्वेश्वरालये त्रिस्थलीसेतौवायवीये गोदावर्यांगयायांचश्रीशैलेग्रहणद्वये सुरासुरगुरुणांचमौढ्यदोषोनविद्यते ग्रहणद्वयेतन्निमित्तककुरुक्षेत्रयात्रादानादावित्यर्थः तदाह त्रिस्थलीसेतौलल्लः उपप्लवेशीतलभानुभान्वोरर्धोदयेवैकपिलाख्यषष्ठ्यां सुरासुरेज्यास्तमयेपितीर्थेयात्राविधिःसंक्रमणेचशस्तः नमूढदोषोनचरात्रिदोषोनचाधिमासोनमृतिर्नसूतिः एवमप्युत्तरार्धंपठंति इत्यलंबहुना ।

अस्तादिकाचा अपवाद - काशीखंडांत सांगतो - " विश्वेश्वराचें स्थान जें काशीक्षेत्र यांत ग्रहांचा अस्तदोष नाहीं. " त्रिस्थलीसेतूंत - वायुपुराणांत सांगतो " गोदावरी, गया, श्रीशैल, यांचे ठायीं गुरुशुक्रास्ताचा दोष नाहीं. आणि चंद्र सूर्यग्रहणनिमित्तक कुरुक्षेत्रयात्रा, दान इत्यादिकांविषयीं अस्तदोष नाहीं. " तेंच त्रिस्थलीसेतूंत सांगतो - लल्ल म्हणतो - " चंद्रसूर्याचें ग्रहण, अर्धोदयपर्व, कपिलाषष्ठी, आणि संक्रांति ह्या पर्वदिवशीं गुरुशुक्रांच्या अस्तांत देखील तीर्थयात्रा विधि प्रशस्त आहे तो करावा, त्याला दोष नाहीं. " " न मूढदोषो नच रात्रिदोषो न चाधिमासो न मृतिर्न सूतिः " असेंही वरील श्लोकांचें उत्तरार्ध कोणी पठन करितात. अर्थ - " अस्तदोष नाहीं, रात्रिदोष नाहीं, अधिकमासदोष नाहीं, मृताशौच व जननाशौच यांचाही दोष नाहीं. " इतका निर्णय पुरे करितों, फार सांगत नाहीं.

N/A

References : N/A
Last Updated : May 11, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP