मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|निर्णयसिंधु|प्रथम परिच्छेद|
इष्टिकालाचा निर्णय

प्रथम परिच्छेद - इष्टिकालाचा निर्णय

निर्णयसिंधु ग्रंथामध्ये कोणत्या कर्माचा कोणता काल , याचा मुख्यत्वेकरून निर्णय केलेला आहे .


अथेष्टिकालः गोभिलः पक्षांताउपवस्तव्याः पक्षादयोऽभियष्टव्याइति उपवासोन्वाधानम् तत्र मध्याह्नेतत्पूर्वंवापर्वप्रतिपत्संधौतद्दिनेयागः पूर्वाह्णेवाऽथमध्याह्नेयदिपर्वसमाप्यते उपोष्यतत्रपूर्वेद्युस्तदहर्यागइष्यतइतिलौगाक्षिवचनात् अत्रचद्वेधाविभागः आवर्तनात्तुपूर्वाह्णोह्यपराह्णस्ततःपरः मध्याह्णस्तुतयोः संधिर्यदावर्तनमुच्य इति मदनरत्नेवचनात्‍ मध्याह्नादूर्ध्वसंधौ माधवमतेपरेऽह्नियागः अपराह्णेऽथवा रात्रौयदिपर्वसमाप्यते उपोष्यतस्मिन्नहनिश्वोभूतेयागइष्यतइति लौगाक्षिणोक्तेः हेमाद्रिस्त्वपराह्णसंधावपिपरदिनेप्रतिपच्चतुर्थांशेचंद्रोदयेचसतिद्वितीयादिष्वत्यंतक्षयेसतिपूर्वेद्युर्यागः पर्वणोंशेद्वितीयेतुयष्टव्यं तुद्विजातिभिः द्वितीयासहितंयस्माद्दूषयंत्याश्वलायनाइति द्वितीयेत्वितिकैमुतिकन्यायेनतुर्यांशपरम् तुरीयेत्वितिशूलपाणौपाठः स्पष्टार्थएव तथा भूतापंचदशीपूर्णाद्वितीयाक्षयगामिनी चरुरिष्टिरमायांस्याद्भूतेकव्यादिकीक्रियेतिबौधायनवचनाच्चेत्यूचिवान् मदनरत्नेपि चतुर्दशीचतुर्यामाअमावास्यानदृश्यते श्वोभूतेप्रतिपच्चेत्स्यात्पूर्वांतत्रैवकारयेदिति ।

यानंतर इष्टिकालाचा निर्णय सांगतो.
गोभिल - “ पक्षाच्या शेवटच्या तिथि ( अमावास्या व पौर्णिमा ) हे उपवासाचे ( अन्वाधानाचे ) काल आणि पक्षाच्या आद्य तिथि ( प्रतिपदा ) यागाचे काल होत. ” अन्वाधानाचें नांव उपवास. मध्याह्नकालीं किंवा त्याच्या पूर्वी पर्वाचा ( अमावास्यापौर्णिमांचा ) व प्रतिपदेचा संधि असेल तर त्या दिवशीं याग करावा. कारण, “ पूर्वह्णकालीं किंवा मध्याह्नकालीं जर पर्व समाप्त होत असेल, तर पूर्वदिवशीं अन्वाधान करुन त्या दिवशीं याग करावा ” असें लौगाक्षिवचन आहे. येथें दिवसाचे दोन भाग करावे, कारण “ सूर्योदयापासून दोन प्रहर ( पहिला अर्धाभाग ) तो पूर्वाह्णकाल, आणि दिवसाचा पुढचा अर्धा भाग तो अपराह्णकाल. पूर्वाह्णाची शेवटची एक घटिका व अपराह्णाची प्रथमची एक घटिका मिळून संधिभूत ज्या दोन घटिका ( एक मुहूर्त ) तो मध्याह्न. त्यालाच आर्वतन असें म्हणतात ” असें मदनरत्नांत वचन आहे. मध्याह्नोत्तर संधि असेल तर माधवाच्या मतीं परदिवशीं याग करावा. कारण “ अपराह्णकालीं किंवा रात्रीं जर पर्व समाप्त होईल तर त्या दिवशीं अन्वाधान करुन दुसर्‍या दिवशीं याग करावा ” असें लौगाक्षीचें वचन आहे. हेमाद्रि तर - अपराह्णकालीं संधि असला तरी जर दुसर्‍या दिवशीं प्रतिपदेच्या चवथ्या अंशीं चंद्रोदय असेल आणि द्वितीयादि तिथि अत्यंत क्षीण झालेल्या असतील तर पूर्वदिवशीं याग करावा. कारण, “ द्विजातींनीं पर्वाचे द्वितीय भागीं याग करावा. कारण, आश्वलायनशाखी द्वितीयासहित याग दूषित आहे, असें म्हणतात. ” ‘ द्वितीय भागीं ’ असें सांगितलें तें कैमुतिकन्यायानें चतुर्थभागीं जाणावें. शूलपाणिग्रंथांत ‘ पर्वणोंशे तुरीये तु ’ असा पाठ आहे, त्याचा अर्थ - “ पर्वाचे चतुर्थभागीं ” असाच होतो. तसेंच “ चतुर्दशी पूर्णा असून अमावास्या किंवा पौर्णिमा पूर्णा आहे, आणि द्वितीया क्षयगामिनी आहे तर स्वल्प अमावास्यायुक्त चतुर्दशीस अन्वाधान व श्राद्ध करुन अमावास्येस याग करावा ” बौधायनवचन आहे, असें ( हेमाद्रि ) सांगता झाला. मदनरत्नांतही “ पूर्वदिवशीं चवथ्या प्रहरपर्यंत चतुर्दशी आहे, अमावास्या अपराह्णांत नाहीं, आणि दुसर्‍या दिवशीं प्रतिपदा आहे तर ( अन्वाधानादिकांविषयीं ) पूर्वीची चतुर्दशीयुक्त अमावास्या घ्यावी. ”

यत्तुमाधवः यस्तुवाजसनेयीस्यात्तस्यसंधिदिनात्पुरा नक्काप्यन्वाहितिः किंतुसदासंधिदिनेहिसेत्याह यच्चकालदर्शेप्युक्तं आवर्तनादधः संधिर्यद्यन्वाधायतद्दिने परेद्युरिष्टिरित्याहुर्विप्रावाजसनेयिन इति यच्चमदनरत्ने मध्यंदिनात्स्यादहनीहयस्मिन्‍ प्राक्‍ पर्वणः संधिरियंतृतीया साखर्विकावाजसनेयिमत्यातस्यामुपोष्याथपरेद्युरिष्टिरिति एतत् पौर्णमासीपरमितितत्रैव आवर्तनोर्ध्वमर्वागस्ताद्गात्रौवासमाप्तौद्वे मध्याह्नादर्वाक्‍ समाप्तौतृतीयेत्यर्थः तत्कर्कभाष्यदेवजानीश्रीअनंतभाष्यादिसकलतच्छाखीयग्रंथविरोधात् वृद्धानादराच्चोपेक्ष्यम्

आतां जें माधव - “ जो वाजसनेयी शाखेचा आहे त्याला संधिदिवसांचा पूर्वदिवशीं कोठेंही अन्वाधान सांगितलें नाहीं, तर त्याला संधिदिवशींच अन्वाधान आहे ” असें सांगता झाला. आणि जें कालादर्शांतही सांगितलें आहे कीं, “ जर आवर्तनकालाचे पूर्वी संधि असेल तर त्या दिवशीं अन्वाधान करुन दुसर्‍या दिवशीं याग करावा, असें वाजसनेयी ब्राह्मण सांगतात. ” आणि जें मदनरत्नांत - “ ज्या दिवशीं मध्यंदिनाच्या पूर्वी पर्वसंधि असेल तर ही संधि तिसरी होय. वाजसनेयी यांच्या मतीं ती तिथि खर्विका आहे. त्या संधिदिवशीं अन्वाधान करुन दुसर्‍या दिवशीं याग करावा. ” हें वचन पौर्णमासीविषयक होय असें त्याच ठिकाणीं सांगितलें आहे. आवर्तनानंतर आणि अस्ताच्या पूर्वी तिथि समाप्त होते ती एक, रात्रीं समाप्त होणारी ती दुसरी आणि आवर्तनाच्या ( मध्यंदिनाच्या ) पूर्वी समाप्त होते ती तिसरी संधि जाणावी. तें माधवादिकांनीं सांगितलेलें; कर्कभाष्य, देवजानी, श्रीअनंतभाष्य इत्यादिक तच्छाखीयग्रंथांशीं विरुद्ध असल्यामुळें आणि वृद्धांना तें अमान्य असल्यामुळें अग्राह्य होय.

N/A

References : N/A
Last Updated : May 15, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP