मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत नामदेवांचे अभंग|उपदेश| मुमुक्षूंस उपदेश ५१ ते ५५ उपदेश संसारिकांस उपदेश १ ते २ संसारिकांस उपदेश ३ ते ५ संसारिकांस उपदेश ६ ते ८ संसारिकांस उपदेश ९ ते ११ संसारिकांस उपदेश १२ ते १४ संसारिकांस उपदेश १५ ते १८ संसारिकांस उपदेश १९ ते २१ संसारिकांस उपदेश २२ ते २५ संसारिकांस उपदेश २६ ते ३० संसारिकांस उपदेश ३१ ते ३६ खलदुर्जनांस उपदेश १ ते ७ खलदुर्जनांस उपदेश ८ ते १३ वेषधार्यांस उपदेश १ ते ५ वेषधार्यांस उपदेश ६ ते ८ वेषधार्यांस उपदेश ९ वेषधार्यांस उपदेश १० ते १२ वेषधार्यांस उपदेश १३ ते १६ वेषधार्यांस उपदेश १७ ते २० वेषधार्यांस उपदेश २१ ते २५ वेषधार्यांस उपदेश २६ ते ३१ वेषधार्यांस उपदेश ३२ वेषधार्यांस उपदेश ३३ ते ३५ वेषधार्यांस उपदेश ३६ ते ४० वेषधार्यांस उपदेश ४१ ते ४५ वेषधार्यांस उपदेश ४६ ते ५० वेषधार्यांस उपदेश ५१ ते ५६ उपासकांस उपदेश जनांस उपदेश १ ते ५ जनांस उपदेश ६ ते १० जनांस उपदेश ११ ते १३ जनांस उपदेश १४ ते १७ जनांस उपदेश १८ ते २० जनांस उपदेश २१ ते २५ जनांस उपदेश २६ ते २८ जनांस उपदेश २९ जनांस उपदेश ३० ते ३५ जनांस उपदेश ३६ ते ४० जनांस उपदेश ४१ ते ४५ जनांस उपदेश ४६ जनांस उपदेश ४७ ते ४८ जनांस उपदेश ४९ ते ५० जनांस उपदेश ५१ ते ५५ जनांस उपदेश ५६ ते ६० मुमुक्षूंस उपदेश १ ते ५ मुमुक्षूंस उपदेश ६ ते १० मुमुक्षूंस उपदेश ११ ते १५ मुमुक्षूंस उपदेश १६ ते २० मुमुक्षूंस उपदेश २१ ते २५ मुमुक्षूंस उपदेश २६ ते ३० मुमुक्षूंस उपदेश ३१ ते ३५ मुमुक्षूंस उपदेश ३६ ते ४० मुमुक्षूंस उपदेश ४१ ते ४५ मुमुक्षूंस उपदेश ४६ ते ५० मुमुक्षूंस उपदेश ५१ ते ५५ मुमुक्षूंस उपदेश ५६ ते ६० मुमुक्षूंस उपदेश ६१ ते ६४ मनास उपदेश १ ते ५ मनास उपदेश ६ मनास उपदेश ७ ते १० मनास उपदेश ११ ते १५ मनास उपदेश १६ ते २० मनास उपदेश २१ ते २६ उपदेश - मुमुक्षूंस उपदेश ५१ ते ५५ संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली. Tags : abhangnamdevpandurangvitthalअभंगनामदेवपांडुरंगविठ्ठल मुमुक्षूंस उपदेश ५१ ते ५५ Translation - भाषांतर ५१.गुरूच्या वचनें होईल पैं ज्ञान । न कळे प्रेम खूण विठोबाची ॥१॥वेदीं हें विचारा पुराणातें पुसा । विठोबाचा कैस प्रेम भाव ॥२॥साधकासी सिद्धि होईल पैं प्राप्ति । न कळे निरूति प्रेम खूण ॥३॥नामा म्हणे सोडा जाणीवेचा सीण । संतांची हे खून जाणे संत ॥४॥५२.कृपेचा कोंवळा रघुनाथ दास । धरीन त्याची कास सर्वभावें ॥१॥सांडूनि सर्व संगु होईन शरणागत । करिती मनो-रथ पूर्ण माझे ॥२॥भवसिंधूचा पार उतरोनि निर्धारी । त्या-परती सोयरीं नाहीं सृष्टीं ॥३॥अंतरींचें गुज सांगती श्रवणीं । अमृत संजीवनीं रामनाम ॥४॥तेणें त्रिविधताप हरती मनींचे । जाणती जीवींचे झाले कष्टे ॥५॥तो जीवलग जननी परिस लोभा-परु । सर्वस्व उदारु प्राणसखा ॥६॥नामा त्याचे बळें झेलतु यमासी । रिघोनि पाठींसी केशवाच्या ॥७॥५३.प्रीति नाहीं रायें वर्जियेली कांता । परि तिची सत्ता जगावरी ॥१॥तैसे दंभधारी आम्ही तुझे भक्त । घालूं यमदूत पा-यांतळीं ॥२॥रायाचा तो पुत्र अपराधी देखा । तो काय आणिका दंडवेल ॥३॥बहात्तर खोडी देवगण कंठीं । आम्हां जगजेठी नामा म्हणे ॥४॥५४.बोलवरी बोलती । श्रुति वाखाणिती । हरि पाविजे ती गति । वेगळी असे ॥१॥तुज न पवे गा तें स्वप्न । हरिशब्द एकचि ब्रह्म । पाविजे तें वर्म । वेगळें असे ॥२॥एक जाणीव खटपट । करिसी ते सैराट । हरि पाविजे ती वाट । वेगळी असे ॥३॥एक आहेत तार्किक । चार्वाकादी बादक । हरि पाविजे तें सुख । वेगळें असे ॥४॥एक चातुर्यवक्ते । व्युत्पन्न कवित्वें । संत रंजविते । लोका-चारी ॥५॥जिहीं तुज जाणितलें । तिहीं मौन धरिलें । नामा म्हणे ते पावले । भक्तियोगें ॥६॥५५.आझां संगती नावडे कांहीं । म्हणोनि झालों बा विदेही । दु:खमूळ संगतीचें । आम्ही नव्हों त्या गांवीचे ॥१॥आम्हा नाहीं रूप नांव । वस्तीची नाहीं एक ठाब । मग ध्या इच्छेसि धांव । आम्ही नव्हों त्या गांबींचे ॥२॥स्नान केलें गंगा-तीरीं । गंध लविलें पंढरपुरीं । संध्या केली कृष्णातिरीं । आम्ही त्या नव्हों त्या गांबींचे ॥३॥भिक्षा केली कोल्हापुरीं । भोजन केलें महाद्वारीं । निद्रा केली माहुरीं । आम्ही त्या नव्हों त्या गांबींचे ॥४॥ऐसियाची संगत करीं । त्याचे चरण ह्लदयीं धरीं । नामा ह्मणे या संसारीं । आम्ही त्या नव्हों त्या गांबींचे ॥५॥ N/A References : N/A Last Updated : December 22, 2014 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP