मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत नामदेवांचे अभंग|उपदेश|
मनास उपदेश १६ ते २०

उपदेश - मनास उपदेश १६ ते २०

संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली.


१६.
पृथ्वी ध्यासी तरी पृथ्वीचि होसी । केशव न होसि अरे मना ॥१॥
आप ध्यासी तरी आपचि होसी । केशव न होसि अरे मना ॥२॥
वायु ध्यासि तरी वायुचि होसी । परी के शव न होसि अरे मना ॥३॥
आकाश ध्यासी तरी आकाशचि होसी । परी केशव न होसि अरे मना ॥४॥
नामा ह्मणे जरी केशवासी ध्यासी । तरी केशवचि होसी अरे मना ॥५॥

१७.
संसारीं असतां जीवन्मुक्त आह्मी । विठ्ठल हे नामीं वि-नटलें ॥१॥
काया क्लेश करणें शरीर दंडणें । न लगे हिंडणें दाही दिशा ॥२॥
कोव वाहे मंत्र वाउगी खटपट । गाऊं निष्कपट रामनाम ॥३॥
नामा ह्मणे मज आहे हा भरंवसा । मना तूम विश्वासा दृढ धरी ॥४॥

१८.
देवा तुझें मी चाटारु । सहस्त्रा एका हाकीं करूम । लाभ होतसे अपारु । धडी धडीये माझारी ॥१॥
काया क्लेश करणें शरीर दंडणें । न लगे हिंडनें दही दिशा ॥२॥
कोण वाहे मंत्र वाउगी खटपट । गाऊं निष्कपत रामनाम ॥३॥
नामा ह्मणे मज आहे हा भरंवसा । मना तूम विश्वासा दृढ धरीं ॥४॥

१९.
देवा तुझें मी चाटारु । सहस्त्रा एका हाकीं करूं । लाभ होतसे अपारु । धडी धडीये माझारी ॥१॥
तुझ्या पायांची जोडी । त्यासि होतसे परवडी । आवारु न लाहे एक घडी । नंदप्रिय होतसे ॥२॥
मुदल पुसतसे वेळोवेळां । हा मनारे पापी चांडाळा । सांग चोविसां आगळा । कवणेपरी न धाय ॥३॥
वासना मागतसे तुज । हे द्यावी जी मज । दाटणी होतसे सहज । ह्मणवोनि मज अंकी-तसे ॥४॥
नामा म्हणे जी दातारा । तुझिये भेटी सारंगधरा । लाभ होतसे अपारा । घडी घडीये विठ्ठला ॥५॥

२०.
शोधोनियां चारी वेद । सार काढोनियां भेद ॥१॥
मना जाण जाण जाण । विठोबाची प्रेमखुण ॥२॥
साहि शास्त्रांचें संमत । मंथूनि काढिलें यथार्थ ॥३॥
याज्ञिकांची जीवनकळा । जन्मनीचा जो जिव्हाळा ॥४॥
नामा म्हणे माझे बापें । साधि-यलें संतकृपें ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : December 22, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP