धर्मशास्त्रदृष्ट्या एकंदर गुणांची यादी
प्रस्तुत ग्रंथ १९०१ साली बडोद्याचे महाराज श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांनी प्रसिद्ध केला होता.
या दोन्ही ग्रंथांचा एकत्र विचार करिता विवाह्य स्त्रीसंबंधानें पुढील गोष्टी पाहाव्या असा सामान्यत: अर्थनिष्कर्ष होतो :
( अ ) ती स्त्री असावी.
( आ ) तिची कुलपरीक्षा, व तिजबरोबरच तिची बाह्यलक्षणे व अंतर्लक्षणे कोणत्या प्रकारचे शुभ अथवा अशुभ सुचवितात.
( इ ) ती अनन्यपूर्विका असावी.
( ई ) ती कान्ता म्हणजे रमणीय असावी.
( उ ) वर आणि वधू यांचा सपिंड संबंध नसावा.
( ऊ ) वधू वरापेक्षा लहान असावी.
( ॠ ) तिला काही रोग नसावा.
( ॠॠ ) तिला भाऊ असले पाहिजेत.
( लृ ) वर आणि वधू यांचे गोत्र आणि प्रवर हे एक नसावे.
या गोष्टी प्रत्येकी अत्यंत महत्त्वाच्या असल्यामुळे त्यांचे पृथक् पृथक् विवेचन पुढे करण्यात येत आहे.
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP