निषिध संबंध
प्रस्तुत ग्रंथ १९०१ साली बडोद्याचे महाराज श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांनी प्रसिद्ध केला होता.
याहून निराळे निषिध संबंध : सापिंड्याच्या कारणाने विवाहास निषेध सांगितला, त्याशिवाय आणखीही कित्येक निराळे विवाहसंबंध शास्त्रकारांनी वर्ज्य म्हणून सांगितले आहेत. या संबंधांस ‘ विरुद्धसंबंध ’ अशी पारिभाषिक संज्ञा असून ते पुढीलप्रमाणे सांगितले आहेत :
( अ ) आपल्या पत्नीच्या बहिणीची म्हणजे आपल्या मेहुणीची मुलगी हिच्याशी विवाह वर्ज्य समजावा.
( आ ) चुलत्याच्या पत्नीची बहीण हिच्याशी विवाह करू नये.
( इ ) प्रत्युद्वाह अथवा उलटून परत लग्न होऊ नये. जसे ‘ क्ष ’ ने ‘ य ’ ची मुलगी आपल्या मुलास केली, तर ‘ य ’ ने ‘ क्ष ’ ची मुलगी आपल्या मुलास करू नये.
( ई ) आपल्या दोन कन्या एकाच पुरुषात कोणी देऊ नयेत.
( उ ) दोन सख्ख्या भावांचे दोन सख्ख्या बहिणींशी लग्न होऊ नये.
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP