साहाय्य व महत्त्व
प्रस्तुत ग्रंथ १९०१ साली बडोद्याचे महाराज श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांनी प्रसिद्ध केला होता.
कन्येची अंतर्बाह्य लक्षणे पाहण्याचा वास्तविक उद्देश म्हटला म्हणजे तिजपासून तिच्या पतीस अगर पतीच्या घराण्यातेअएल इतर मनुष्यांस कितपत सुखसमाधान वाटेल व तिच्या आगमनाने पतीचा संसार सुरळीत चालून कुलाची भावी स्थिती कशी होण्याचा संभव आहे, या गोष्टीचे अगाऊ ज्ञान होऊ शकेल तेवढे करून घेण्याचा असलाच पाहिजे. ज्योति:शास्त्रावरून अगर सामुद्रिक शास्त्रावरून हे ज्ञान होऊ शकते असे त्या त्या शास्त्रावरील ग्रंथकारांचे मत आहे.
आश्वलायन गृह्यसूत्र खंड ५ येथे ‘ बुद्धिरूपश्सीललक्षणसंपन्नां ’ असे विशेषण विवाह्य कन्येस दिले आहे, त्यातील “ शीललक्षणसंपन्नां ” या भागावरील नारायणवृत्तीत कन्या सुस्वभावाची व सामुद्रिकग्रंथांत सांगितलेल्या लक्षणांनी युक्त असावी असा या भागाचा स्पष्ट अर्थ वर्णिला आहे. या वृत्तिकारकाराच्या मते ज्योतिशास्त्रावरून वधूवरांचे घटित पाहण्यापेक्षा कुलपरीक्षेचे महत्त्व अधिक आहे. कसेही असो; सांप्रतच्या लौकिक पद्धतीत कुलपरीक्षा व ज्योति:शास्त्रावरून समजून घेण्याच्या गोष्टी या दोहींचेही महत्त्व प्राय: सारखेच मानिले जाते व यासाठी कुलपरीक्षापद्धतीप्रमाणे सूत्रकाराचा आशय समजणे जितके अवश्य आहे, तितकेच कन्येच्या भावी शुभाशुभाचे ज्ञान ज्योति:शास्त्राच्या साह्याने करून घेणे हेही अवश्य समजले पाहिजे.
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP