आश्वलायनोक्त मृत्तिकापिंडपरीक्षा
प्रस्तुत ग्रंथ १९०१ साली बडोद्याचे महाराज श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांनी प्रसिद्ध केला होता.
आश्वलायन गृहसूत्र, खंड ५, सू. ४ येथे कन्येच्या परीक्षेची रीती सांगितलेली आहे. तीत, आठ प्रकारच्या निरनिराळ्या मृत्तिकांचे आठ पिंड करून त्यांपैती कन्येने वाटेल तो एक पिंड घ्यावा असे तिला सांगावे, व ती जो पिंड घेईल त्या पिंडावरून तिच्या भावी शुभाशुभाचे अनुमान करावे असे स्पष्ट वर्णिले आहे. स्थानभेदाने मत्तिकेच्या जाती व त्यांच्या पिंडग्रहणाची फ़ळे सदर सूत्रांत पुढीलप्रमाणे वर्णिली आहेत:-
( अ )
जाती
वर्षातून दोन वेळ धान्य पिकणार्या शेतांतील माती
फळे
ती कन्या धान्यसंपन्न होईल व तिला संतती होईल.
( आ )
जाती
गाईच्या गोठ्यांतील माती
फळे
ती कन्या जनावरे बाळगणारी होईल.
( इ )
जाती
ज्या ठिकाणी यज्ञ झाला अशा ठिकाणची माती
फ़ळे
कन्येस ब्रह्मतेज प्राप्त होईल.
( ई )
जाती
कधी न आटणार्या डोहातील माती
फळे
तिला सर्व प्रकारची संपत्ती मिळेल.
( उ )
जाती
द्यूत ( जुगार ) खेळण्याची जागची माती
फळे
ती व्यभिचारिणी निघेल.
( ऊ )
जाती
बी पेरले असता उगवत नाही अशा ठिकाणची माती
फळे
ती कपाळकरंटी होईल.
( ऋ )
जाती
चवाठ्यावरील माती
फळे
ती भिक्षा मागेल.
( ॠ ) फ
जाती
स्मशानातील माती
फळे ती पतीचा घात करणारी अर्थात विधवा होईल.
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP