वधूची निरोगिता
प्रस्तुत ग्रंथ १९०१ साली बडोद्याचे महाराज श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांनी प्रसिद्ध केला होता.
याज्ञवल्क्यस्मृतीत वधूला काही रोग नसावा असे सांगितले आहे, याचा अर्थ सांगताना निबंधग्रंथांतून तिला क्षय इत्यादी असाध्य झालेले रोग नसावे असा लिहिला आहे. कुलपरीक्षेसंबंधाने कुल्लूक या उभयतांनी अनुक्रमे ( १ ) “ व्याधयश्च संक्रामंति । एव हि वैद्यके पठ्यते, व ( २ ) “ व्याधय: संचारिण इति वैद्यका: पठंति ” याप्रमाणे, शेरे लिहिले असून “ सर्वे संक्रामिनो रोगा वर्जयित्वा प्रवाहिकाम् ” हे वचन लिहिले आहे. त्याचा अर्थ प्रवाहिका रोग शिवाय करून बाकीचे सर्व रोग एका माणसाच्या अंगातून दुसर्या माणसाच्या अंगात जाणारे असतात असा आहे.
मूळव्याधी, महारोग, क्षय इत्यादी रोगांची देहाची देहात अनुवृत्ती होत जाते हे हारीतस्मृतीत लिहिले असून, ‘ कुलानुरूपा: प्रजा: संभवंति ’ म्हणजे जसे कुळ तशी संतती होते या वाक्याने कुलपरीक्षेचे महत्त्व वर्णिले आहे. प्रवाहिका रोगास पराशर व हारीत यांनी अनुक्रमे ‘ अंतर्ग्रंथि ’ व ‘ निश्चारक ’ ह्या संज्ञा दिल्या असून हा रोग कफ़ातिसाराचा आहे; परंतु त्याचा दोष ज्याचा त्याजपाशीच राहतो, व इतरांस बाधू शकत नाही. इतर रोगांची स्थिती तशी नसून ते परसंक्रामी आहेत.
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP