वधूची वर्ज्य कुले
प्रस्तुत ग्रंथ १९०१ साली बडोद्याचे महाराज श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांनी प्रसिद्ध केला होता.
मनुस्मृती अ. ३, श्लो. ६ -७ येथे वधूची वर्ज्य कुले पुढीलप्रमाणे लिहिली आहेत:
महान्त्यपि समृद्धानि गोजाविधधान्यत: ॥
स्त्रीसंबंधे दशैतानि कुलानि परिवर्जयेत् ॥६॥
हीनक्रीयं निष्पुरुषं निश्छंदो रोमशार्शसम् ॥
क्षय्यामयाव्यपस्मारिश्वित्रिकुष्टिकुलानि च ॥७॥
अर्थ : वधूचे कुल गाई, शेळ्या, मेंढ्या, द्रव्य आणि धान्य यांही कितीही समृद्ध असले, तरी ते पुढील १० प्रकारांपैकी कोणत्याही प्रकारचे असता कामाचे नाही:
( १ ) हीनक्रिय म्हणजे क्रियाहीन;
( २ ) ज्या कुळात पुरुषसंतती झालेली नाही अथवा होत नाही, अगर ज्या कुळात प्राय: मुलींचीच संख्या पुष्कळ उत्पन्न होते;
( ३ ) वेदरहित म्हणजे वेदाचे अध्ययन न करणारे, अर्थात वेदांत सांगितलेले आचार ( सदाचार ) न पाळणारे इत्यादी;
( ४ ) ज्या कुळातील माणसे केसाळ आहेत, म्हणजे त्यातील माणसांस अतिलांव अतिदाट व राठ केसच येतात;
( ५ ) ज्यांतील माणसांस मूळव्याधीचा विकार आहे;
( ६ ) क्षयरोगाने युक्त;
( ७ ) अग्निमांद्य ( Dyspepsia ) रोगाने युक्त;
( ८ ) अपस्मार म्हणजे फ़ेपरे इत्यादी व्याधी जडलेले;
( ९ ) कोडाने युक्त; व
( १० ) महाव्याधी जडलेले.
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP