सापिंड्यनिषेधाची देशभेदाने भिन्न व्यवस्था
प्रस्तुत ग्रंथ १९०१ साली बडोद्याचे महाराज श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांनी प्रसिद्ध केला होता.
पित्याच्या बाजूने सात पिढ्या व मातेच्या बाजूने पाच पिढ्या सापिंड्यगणनेसंबंधाने मानावयाच्या हा सामान्यत: सर्वमान्य सिद्धान्त आहे. तथापि पैठीनसि, वसिष्ठ इत्यादी कित्येक शास्त्रकारांनी या संख्या अनुक्रमे ४ व ३ इतक्याच असाव्या असे म्हटले आहे. त्यासंबंधाने दक्षिणेकडील लोक उत्तरेकडील लोक यांजमध्ये आचारभेद उत्पन्न झाले आहेत, व त्यांच्या बळावरच वस्तुत; वर्ज्य म्हणून मानिलेला मातुलगृहींचा विवाहसंबंध हा दक्षिण देशात रूढ होऊन बसला आहे; व रूढ आचारामुळे हलक्या कुळाशी संबंध करण्याची पाळी कमी येते हा त्यात विशेष गुण आहे असे त्या रूढ आचाराच्या भक्तांकडोन “ वेदाच्चैतत्प्रतीयते ” इत्यादी स्मृतिवाक्याच्या साह्याने मंडनही करण्यात येते. उत्तरेकडील देशात हा विवाहसंबंध कोणी मान्य करीत नाही. प्रस्तुतच्या निबंधग्रंथांतून आचारबलास्तव दोन्ही ठिकाणी होणारे विवाहप्रकार सशास्त्रच मानिले आहेत.
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP