माता आणि सापत्नमातेपासून होणारे सापिंड्य
प्रस्तुत ग्रंथ १९०१ साली बडोद्याचे महाराज श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांनी प्रसिद्ध केला होता.
आता मातेच्या बाजूने पाच पिढ्यांपर्यंतची सापिंड्याची मर्यादा सांगितली. तीत ‘ माता ’ या संज्ञेत सापत्न मातेचाही समावेश होतो. यासंबंधाने सुमंतूने पुढीलप्रमाणे लिहिले आहे :
“ पितृपत्न्य: सर्व मातरस्तभ्रातरो मातुलास्तद्भगिन्यो मातृष्वसारस्तद्दुहितरश्च मगिन्यस्तदपत्यानि भागिनेयान्यन्यथा संकरकारिण: स्य: ”
अर्थ : ‘ पित्याने जेवढ्या स्त्रिया केल्या असतील तेवढ्या सर्व माता होत. त्या मातांचे भाऊ तेवढे मातुल ( मामा ), बहिणी तेवढ्या मावशा, त्या मावशांच्या मुली तेवढ्या बहिणी, व त्या बहिणींची मुले ही सर्व भाचेभाच्या या नात्यांची होत. यांच्याशी विवाह वर्ज्य आहे, व तो केला असता संकरदोष येतो. ’
या वचनाचा अर्थ लिहिताना कित्येक निबंधकारांनी अगर टीकाकारांनी ‘ यावद्वचनं वाचनिकं ’ म्हणजे जे काही स्पष्ट शब्दांनी सांगितले आहे तेवढे मात्र कबूल करावे, परंतु याहून अधिक अर्थ मानण्याचे कारण नाही, या न्यायाचा आश्रय केला आहे; व त्यांच्या मते आतांच्या वचनात ज्यांची नाती स्पष्ट शब्दांनी लिहिली आहेत, तेवढ्यांहून अधिक कोणाचे सापिंड्य मानण्याचे कारण नाही; अर्थात माता व पिता यांच्या बाजूंच्या पाचव्या व सातव्या पिढ्यांचा परमावधीची अट या अधिक लोकांस लागू समजण्याचे कारण नाही. ही अट ध्यानात ठेविली असता सापत्न मातांमुळे उत्पन्न होणारी जेवढी नाती आता सांगितली, तेवढी वर्ज्य करून इतर ठिकाणी विवाह करणे इष्ट असल्यास तो खुशाल करिता येईल.
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP