ग्रंथान्तरोक्त बाह्यलक्षणे
प्रस्तुत ग्रंथ १९०१ साली बडोद्याचे महाराज श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांनी प्रसिद्ध केला होता.
मुहूर्तचिंतामणिनामक ज्योतिषग्रंथावरील ‘ पीयूषधारा ’ नावाच्या टीकेत वर्ज्य स्त्रीसंबंधाने विष्णुपुराणातील व ग्राह्य स्त्रीसंबंधाने शातातपाचे, याप्रमाणे आणखी निराळी वचने पुढीलप्रमाणे दिली आहेत:
( अ ) विष्णुपुराणापैकी
न श्मश्रुव्यंजनवतीम न चैव पुरुषाकृतिम् ॥
नातिबद्धेक्षणां तद्वत्कृशाङ्गी नोद्वहेत्स्त्रियम् ॥
यस्याश्च रोमशे जंघे गुल्फ़ौ यस्यास्तथोन्नतौ ॥
गंडयो: कूपको यस्या हसंत्याश्चैव जायते ॥
नोद्वहेत्तादृशीं कन्यां प्राज्ञ: कार्यविचक्षण: ॥
अर्थ : जिच्या ओठांवर मिशांसारखे केश असतील; अथवा जिचा आकार पुरुषासारखा भासत असेल; जिचे डोळे जड व मिटल्यासारखे दिसत असतील; जी शरीराने कृश असेल; जिच्या मांड्यांवर दाट केस असतील; जिच्या पायांचे घोटे उंच असतील; व जी हसू लागली असता तिच्या गालांवर दोन्ही बाजूंनी खळगे पडत असतील, अशा कन्येशी शाहाण्याने कधी विवाह करू नये.
( ब ) शातातप ऋषीचे
र्हस्वस्वरां मेघवर्णां मधुपिंगललोचनाम् ॥
तादृशीं वरयेत्कन्यां गृहस्थ: सुख मेधते ॥
अर्थ : हळू आवाजाची, श्यामवर्ण व मधुर आनि पिंगलवर्ण नेत्रांची अशा कन्येशी विवाह केला असता आता गृहस्थास सुखप्राप्ती होते.
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP