स्त्रीचे स्त्रीत्व
प्रस्तुत ग्रंथ १९०१ साली बडोद्याचे महाराज श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांनी प्रसिद्ध केला होता.
विवाहाच्या खर्या उद्देशाकडे दृष्टी देता स्त्रीचे स्त्रीत्व ही अत्यंत अगत्याची व महत्त्वाची आहे. तथापि विवाहापूर्वी तिची खात्री करून घेण्याचे कामही अति नाजुकपणाचे आहे. नुसत्या बाह्य दर्शनावरून एखादा मनुष्य पुरुष असल्याचा भास होतो, तरी तो तृतीय प्रकृती अगर नपुंसक असल्याची उदाहरणे केव्हा केव्हा पाहण्यात येतात; व तोच प्रकार बाह्यत: भासणार्या स्त्रीजातीसंबंधानेही केव्हा केव्हा प्रत्ययास आल्यावांचून रहात नाही. ह्यासंबंधीची खात्री आगाउ करून घेणे हे शास्त्र व व्यवहार अशा दोन्ही दृष्टींनी जितके अगत्याचे तितकेच नाजुकही आहे, व ते प्रत्येक प्रसंगी परिस्थितीच्या अनुकूल अगर प्रतिकूल विशेष स्वरूपावर अवलंबून असते, यासाठी यासंबंधाने नुसते दिग्दर्शन केले तेवढे पुरे आहे.
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP