’ जन्मना जायते० ’ वचनाचा सरळ अर्थ
प्रस्तुत ग्रंथ १९०१ साली बडोद्याचे महाराज श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांनी प्रसिद्ध केला होता.
ही वर्णपध्दती कबूल केली असता वचनाचा अर्थ सरळ बसतो तो असा की, जन्म झाल्यानंतर मनुष्याचा वर्तणुकीचे धोरण जोपर्यंत कळून आले नाही, तोपर्यंत त्याची गणना शूद्रात करावयाची, व धोरण कळून आल्यानंतर त्याच्या अंगी योग्यतेनुसार त्यास संस्कार करुन त्याला ’ द्विज ’ ही संज्ञा द्यावयाची. ’ द्विज ’ शब्दाचा अर्थ ’ दोन वेळ जन्मलेला ’ असा शास्त्रकारांनी मानिला असून, त्यांत ब्राह्मण, क्षत्रिय, व वैश्य या तीन वर्णाचा समावेश होतो. पहिला जन्म म्हणजे स्वाभाविक जन्म, दुसरा जन्म म्हणजे संस्करापासून प्राप्त होणारा जन्म.
पहिल्या प्रकारच्या जन्माबरोबर मनुष्यास शूद्रत्वाची प्राप्ती होते, व नंतर दुसर्या प्रकारच्या जन्म झाल्याच्या योगाने मनुष्य, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य या तीन वर्णापैकी एका वर्णात प्रविष्ट होतो. या वर्णात फेरफार करण्याचे काही विशेष कारण उत्पन्न झाले नाही, तर प्राप्त झालेला वर्ण आमरणान्त कायम राहवयाचा. मनुष्याच्या वर्तनात किंवा योग्यतेत काही विशेष फरक पडला तर त्याचा तो वर्ण जाऊन त्याची गणना निराळ्या वर्णच्या पोटी होऊ शकेल. फेरफाराच्या योगाने उच्च वर्णाचा मनुष्य अधम वर्णात, व अधम वर्णाचा मनुष्य उत्तम वर्णात गेला, तरी त्यात वास्तविक विचार करिता अस्वाभाविक ते काय आहे ?
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP