वर्णाश्रमधर्मनिर्णय - मंगलाचरण
वर्ण ही एक अवस्था आहे. शास्त्रानुसार प्रत्येक व्यक्ति शूद्र ह्नणून जन्माला येतो, आणि प्रयत्नपूर्वक विकास करून अन्य वर्ण व्यवस्थेपर्यंत पोहोचतो. वास्तविक पाहता प्रत्येकांत चारही वर्ण स्थापित आहेत, या व्यवस्थेलाच वर्णाश्रम धर्म म्हणतात.
॥मंगलाचरण॥
॥हिरण्यमयेन पात्रेण सत्यस्याषिहितं मुखं॥
॥तत्वं पूषन्नपावृणु सत्यधर्माय द्दष्टये ॥१॥
--- ईशावारयोपनिषत् १५
पदान्वयार्थ : - हिरन्मयेन [ सुवर्णाच्या ] पात्रेन [ पात्रानें ] सत्यस्य (आत्मस्वरुपाचे, ब्रम्हाचे ) मुखं (तोंड) अपिहितं [झांकले आहे.] तत् (तें) पूवन् ( हे सूर्य) सत्यधर्माय [ सत्य हाच आहे धर्म ज्या माझ्या त्याला ] दृष्टवे (दिसावे म्हणून) अपावृणु [ उघड ] सूर्याच्या प्रकाशापलीकडे असणारें जें आत्मस्वरुप तें मला पाहू दे अशी सूर्याची प्रार्थना हा मुमुक्षु करीत आहे.
शांकरभाष्यार्थ :- हे सूर्या, सुवर्णसुर्याप्रमाणे प्रकाशवंत अशा आच्छादन पात्रानें त्वा सूर्य मंडलामध्ये राहाणार्या सतस्वरूपी ब्रम्हाचे द्वार (ब्रम्हस्वरुपाचे ज्ञान) झाकून टाकले आहेस. दें द्वार त्वां माझ्यासाठी उघडावे. मी सत्य धर्मी आहे. म्हणजे म्हणजे सत्वस्वरुपाची उपासना करीत असल्यामुळे मी सत्य स्वरुपी झालो आहे. म्हणून हे पूषन् [ पूर्व स्वरुपी सूर्या ] मला आपण द्वार उघडून ब्रम्हस्वरुप दिसेल असें करावें किंवा सत्यस्वरुपी जें आपण त्या आपली प्राप्ति धर्माप्रमाणे आचरण करणार्या मला व्हावी एतदर्थ आपण हें द्वार खुलें करावे (तैत्तिरीयो,२/८/१५)
N/A
References : N/A
Last Updated : October 22, 2018
TOP