वर्णाश्रमधर्मनिर्णय - प्रजापालन

वर्ण ही एक अवस्था आहे. शास्त्रानुसार प्रत्येक व्यक्ति शूद्र ह्नणून जन्माला येतो, आणि प्रयत्नपूर्वक विकास करून अन्य वर्ण व्यवस्थेपर्यंत पोहोचतो. वास्तविक पाहता प्रत्येकांत चारही वर्ण स्थापित आहेत, या व्यवस्थेलाच वर्णाश्रम धर्म म्हणतात.


राजाचें अवश्य कर्तव्य प्रजापालन.
सर्व तंत्र सिद्धांत आणि लोक व्यवहार यावरुन सिद्ध होते कीं, राजाचें प्रधान कर्तव्य रक्षण करणें हे आहे. या करितां आतां संक्षिप्त रीतीनें धर्मशास्त्र प्रमाणसहित या विषयावर लिहूं.
॥ राजधर्मान्‍ प्रवक्ष्यामि यथावृत्तो भवेन्नृप: ॥
॥ संभवश्व यथा तस्य सिद्धिश्च परमा यथा ॥१॥ मनु. अ. ७ श्लो. १
॥ ब्राह्मं प्राप्तेन संस्कारं क्षत्रियेण यथाविधि ॥
॥ सर्वस्यास्य यथान्यायं कर्तव्यं परिरक्षणम्‍ ॥२॥ मनु. अ. ७ श्लो. २
अर्थ:- " राजधर्माचें कथन करतों" राज्याचें वर्तन कसें असावें, त्यांची उत्पत्ति कशी होते, व त्याला प्रभुत्वाची परमसिद्धि कशी प्राप्त होते, हें सर्व सांगतों. यथाविधि वेदोक्त संस्कार प्राप्त झालेल्या क्षत्रियानें आपल्या सर्व राज्याचें रक्षण न्यायानें केल्याने तो खरा राजा होतो. राजानें प्रजेचें रक्षण कसें करावें तें पुढील वेदमंत्रांत सांगितले आहे :-
॥ त्रीणि राजाना विदथे पुरुणि परि विश्वानि भूपथ: सदांसि ॥३॥
                                    ॥ ऋ. म. ३।३।८।६ ॥
परमेश्वर उपदेश करतो की, [ राजाना ] राजा व प्रजेंतील पुरुष मिळून ( विदर्थ ) सुख प्राप्तिकारक व ज्ञानवृद्धिकारक, राजा व प्रजा यांच्या संबंधानें उत्पन्न होणार्‍या व्यवहारामध्यें [त्रीणि] तीन ( सदांसि] - सभा विद्यार्यसभा, धर्मार्यसभा व राजार्यसभा - नियत करुन ( पुरुणि) पुष्कळ ( विश्वानि) समग्र प्रजासंबंधी मनुष्यादि प्राण्यांला [ परिभूषथ:] सर्व प्रकारें विद्या, स्वातंत्र्य, धर्म, सुशिक्षा व धन इत्यादि पदार्थांनी अलंकृत करावें.
॥ तं सभा च समितिश्व सेना च ॥४॥ अथर्व ॥ १५।२।९।२॥
सभ्य: सभा मे पाहि येच सभ्या: सभासद: ॥५॥ अथर्व. १९।७।५५।५॥
(तम‍) त्या राजधर्माचें [ सभा च ] त्या तीनही सभांनी व [ समितिश्व] संग्राम व्यवस्था, युद्धकला यांच्या योगांनी व [ सेना च ] सैन्याच्या योगानें रक्षण करावें.
राजानें सर्व सभासदांने अशी आज्ञा करावी कीं, हे ( सभ्य) सभास्थानी विराजमा‍न्‍, होण्यास योग्य अशा मुख्य सभासदा ! तूं [मे] माझ्या [ सभाम्‍] सभेच्या धर्मयुक्त व्यवस्थेचें ( पाहि ) पालन कर व [ ये च ] जे [ सभ्या: ] सभेमध्ये प्रवेश करण्यास योग्य लोकनियुक्त असे ( सभासद ) सभासद असतील त्यांनी ही प्रूवोक्त सभांची व्यवस्था नीट ठेवावी. याचा अभिप्राय असा आहे कीं, कोणा एका विशिष्ट  व्यक्तीला राज्याचा सर्व अधिकार देउं नये. राजाच्या आधीन सभा, सभेच्या आधीन राजा, प्रजेच्या आधीन राजा व राजसभा अशी व्यवस्था असावी. व प्रजेच्या उन्नतीकरितां राजानें सर्व विद्यांत निष्णात महान्‍ विद्वानांना विद्या सभेचा अधिकार द्यावा, मध्यमा परीक्षा, आचार्या परीक्षा, काव्यतीर्थ परीक्षा, साहित्य परीक्षा, महामहोपाध्याय परीक्षा, इत्यादि परीक्षा दिलेल्या धार्मिक विद्वानांना धर्मसभेचा अधिकार द्यावा आणि शास्त्र, अस्त्रविद्यामध्यें जे निष्णात तथा प्रशंसनीय धार्मिक पुरुषांना राजसभेचे सभासद बनवावें व त्यांमध्ये सर्वोत्तम गुणांनी जे उत्तम महान्‍ विद्वान महापुरुष असेल त्याला सभापति किंवा लोकनियुक्त राजा करावा व याप्रमाणें सर्वांनी आपली उन्नती करावी. तीनही सभांच्या संमतीने नियमे करावे व त्या नियमांच्या आधीन सर्व लोकांनी वागावें. सर्वांच्या संमतीने सार्वजनिक हिताची कामें करावीं, सार्वजनिक हित करण्याच्या कामामध्यें मनुष्यानें परतंत्र असावें व स्वकीय हिताचें काम करण्यांत मनुष्यानें स्वतंत्र असावें.
॥ तस्याहु: संप्रणेतारं राजानं सत्यवादिनम्‍ ॥
॥ समीक्ष्यकारिणं प्राज्ञं धर्मकामार्थकोविदम्‍ ॥६॥ म. अ. ७ श्लो. २६
॥ स्वे स्वे धर्मे निविष्टानां सर्वेषामनुपूर्वश:
॥ वर्णानामाश्रमाणां च राजा सृष्टोऽभिरक्षिता ॥७॥ म. अ. ७ श्लो. ३५
॥ सर्वतो धर्मषडभागो राज्ञो भवति रक्षत: ॥
॥ अधर्मादपि षडभागो भवत्यस्य ह्यरक्षत: ॥८॥ म. अ. ८ श्लो. ३०४
॥ रक्षन्धर्मेण भूतानि राजा वध्यांश्च घातयन्‍ ॥
॥ यजतेऽहरहर्यज्ञै: सहस्त्रशतदक्षिणै: ॥९॥ मनु. अ. ८ श्लो. ३०६
अर्थ:- जो राजा सत्यवादी, सत्य भाषण करणारा, विचारशील, बुद्धिमान, धर्म अर्थ व काम सिद्ध करण्यांत तत्पर असतो तोच द्ण्ड देण्यास योग्य असें विद्वान्‍ समजतात ॥६॥
क्रमेकरुन आपल्या धर्मानें चालणारे जे ब्राम्हणादिक सर्व वर्ण ब्रम्हचर्यादिक त्यांचे आश्रम यांचे रक्षण करणारा असा राजा ब्रम्हदेवानें उत्पन्न केला आहे. तस्मात्‍ जो राजा त्यांचे रक्षण करीत नाही तो मोठा दोषी होतो; अर्थात्‍ स्वधर्मापासून जे भ्रष्ट त्यांचे जर न रक्षण करील तर तो दोषी होत नाही. हें तात्पर्य जाणावें ॥७॥
प्रजांचे संरक्षण करणार्‍या राजाला सर्व प्रजांपासून धर्माचा सहावा भाग प्राप्त होतो आणि प्रजांचे रक्षण न करणार्‍या राजाला प्रजांचे अधर्माचा सहावा अंश प्राप्त होतो ॥८॥
सर्व प्राण्यांचें धर्माने रक्षण करणारा आणि वधाला योघ अशा चोरादिकांला शिक्षा करणारा राजा लक्ष दक्षिणायुक्त यज्ञ प्रति दिवशीं करितो, ह्मणजे त्या यज्ञाचें पुण्य पावतो ॥९॥
॥ निग्रहेण हि पापानां साधूनाम संग्रहेण च ॥
॥ द्विजातय इवेज्याभि: पूयंते सततं नृपा: ॥१०॥ म. अ. ८ श्लो. ३११
॥ संग्रामेष्वनिवर्तित्वं प्रजानां चैव पालनम्‍ ॥
॥ शुश्रुषा ब्राम्हणानां च राज्ञां श्रेयस्करं परम्‍ ॥११॥ म. अ. ७ श्लो. ८८
॥ अनपेक्षितमर्यादं नास्तिकं विप्रलुंपकम्‍ ॥
॥ अरक्षितारमत्तारं नृपं विद्यादधोगतिम्‍ ॥१२॥ म. अ. ८ श्लो. ३०९
अर्थ:- द्विजाति जसे यज्ञ करुन पवित्र होतात तसा पाप्याचा निग्रह केल्यानें व साधूंना सभांमध्ये ठेविल्यानें संग्रह केल्यानें राजे सतत निष्पाप होतात. ॥१०॥
संग्रामांचे ठायी अनिवर्तित्व ( मागें न फिरणें) प्रजांचे पालन करणें, आणि ब्राम्हणांची सेवा करणें, हे तीन कर्मे राजांला परम कल्याणकारक आहेत ॥११॥
शास्त्रमर्यादा उल्लंघन करणारा, नास्तिक ( परलोक न मानणारा) विप्रलुंपक ( अयोग्य दंड व नानाप्रकारचे कर यांही करुन प्रजेला लुटणारा), वर्ण आणि आश्रमाचें रक्षण न करणारा आणि धान्यादिकांचा भाग घेणारा असा राजा नरकास जातो असें जाणावें ॥१२॥
॥ यद्राष्टं शूद्रभूयिष्ठं नास्तिकाक्रांतमद्विजम्‍ ॥
॥ विनश्यत्याशु तत्कृस्त्रं दुर्भिक्षव्याधिपीडितम्‍ ॥१३॥ मनु. अ. ८ श्लो. २२
॥ यत्र त्वेते परिध्वंसा जायंते वर्णदूषक: ॥
॥ राष्ट्रिकै: सह तद्राष्ट्रं क्षिप्रमेव विनश्यति ॥१४॥ मनु. अ. १० श्लो. ६१
अर्थ:- ज्या राज्यांत [ व्यबहार निर्णय करणारे ] बहुत शूद्र आहेत, आणि नास्तिक बहुत आहेत, द्विज ( ब्राम्हण क्षत्रिय वैश्य) नाहीत तें सर्व राज्य दुष्काळ, व्याधि यांनी पीडित होऊन त्वरित नाश पावतें ॥१३॥
ज्या राज्यांत वर्णाला दूषण करणारे ह्मणजे वर्णाश्रम धर्माची निंदा करणारे वर्णसंकर उत्पन्न होतात ते राज्य राष्ट्रवासि जनांसहवर्तमान शीघ्र नष्ट होतें. ॥१४॥
पूर्वोक्त लिहिलेल्या प्रमाणानें स्पष्ट सिद्ध होत आहे की, न्यायानुसार प्रजेचें रक्षण करणें दुष्टांला दंड देणें, श्रेष्ठांचा आदर करणें, वर्णाश्रमाचें रक्षण करणें, नास्तिकादिकांना राज्यांत न राहूं देणें, तथा दुर्व्यसनापासून अलिप्त राहणें इत्यादि कर्तव्यें राजांची [ परमधर्म ] आहेत. याकरितां राजाला उचित आहे कीं, सर्वदा स्वयंनीतीचे अनुसार वर्तणूक ठेवून उक्त कर्तव्यांचें पालन करावें. अक्षय सुखाला प्राप्त होऊन सर्वदां तोच उपाय करावा की, ज्याचेपासून संपूर्ण प्रजांहि स्वधर्माचा परित्याग न करील.
A

N/A

References : N/A
Last Updated : October 22, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP