राजधर्म विचार- राजधर्म वर्णन
वर्ण ही एक अवस्था आहे. शास्त्रानुसार प्रत्येक व्यक्ति शूद्र ह्नणून जन्माला येतो, आणि प्रयत्नपूर्वक विकास करून अन्य वर्ण व्यवस्थेपर्यंत पोहोचतो. वास्तविक पाहता प्रत्येकांत चारही वर्ण स्थापित आहेत, या व्यवस्थेलाच वर्णाश्रम धर्म म्हणतात.
असा कोण भारतवासी नसेल की ज्यावे हृदयामध्ये राजधर्म प्राचीन राजनीति याचें ऐकणें आणि जाणणें वगैरेची इच्छा नसेल म्हणजे या विषयांचे पाहणे. ऐकणें आणि जाणण्याची इच्छा सर्व साधारणाला होतही आहे याचें कारण हेंच आहे की राजा आणि प्रजेचा संबंध आदिकाळापासून चालत आला आहे. ज्याअर्थी या दोन्हीचा अनादि संबंध आहे त्याअर्थी राजाला प्रजासंबंधी व्यवहार प्रजेला राजधर्म व राजनीति ही जाणणयाची इच्छा होणें एक स्वाभाविक गोष्ट आहे. यामध्येंही म्हणजे स्वामिभक्तीचे आणि राजनीतीचे अनुयायी भरतखंडात होऊन गेले आहेत व या गोष्टी इतिहासांत प्रसिद्ध आहेत. यद्यपि वर्तमानकाळामध्यें भारतसंतान पतित दशापन्न होऊन राहिले आहेत तथापि त्यांचे शरीरामध्यें आजपर्य़ंत त्यांच्या पूर्वजांच्या रक्तांच्या संचाराचा निरवशेष झाला नाही कां की अंतसमयपर्य़ंत " न्याय्यात् पथ: प्रतिचलन्ति पदं न धीर: " ॥ या मंत्राला हृदयस्थ करुन आपले सत्कर्तव्यापासून कधीहि पराडमुख झाले नव्हते, राजनीतीचे पंथापासून एक पाऊलही हटले नाहीत. असो या विषयामध्यें आम्ही विशेष न लिहितां सर्वसाधारण लोकांस समजण्याकरितां प्राचीन राजनीतीचे थोडे वर्णन करुन राजाच्या धर्माचे संक्षेपाने वर्णन करुं. आशा आहे की, पाठक गण याचें अवलोकन करुन लाभ मिळवतील.
N/A
References : N/A
Last Updated : October 22, 2018
TOP