वर्णाश्रमधर्मनिर्णय - शूद्रलक्षण

वर्ण ही एक अवस्था आहे. शास्त्रानुसार प्रत्येक व्यक्ति शूद्र ह्नणून जन्माला येतो, आणि प्रयत्नपूर्वक विकास करून अन्य वर्ण व्यवस्थेपर्यंत पोहोचतो. वास्तविक पाहता प्रत्येकांत चारही वर्ण स्थापित आहेत, या व्यवस्थेलाच वर्णाश्रम धर्म म्हणतात.


॥ ध्वजाहृतो भक्तदासो, गृहज: क्रीयदत्रिमौ ॥
॥ पित्रिको दंडसाश्च सप्तैते दासयोनय: ॥१॥ म.अ.८ श्लो.४१५
अर्थ:- युद्धांत जिंकून आणिलेला, भोजनाकरितां दास्यकर्म पत करुन राहिलेला, आपल्या घ्ररांत ( आपल्या दासीचे ठायी ) झालेला मोल देऊन विकत घेतलेला , दान दिलेला, पितृपितामहादिक्रमानें मिळालेला (वडिलार्जित) आणि दंडादि धन फिट्ण्याकरितां दास्य कम्र स्वीकारुन राहिलेला, ही सात दास्यत्वाची अर्थात्‍ शूद्रांची लक्षणें होत.
॥ यात्रामात्रप्रसिद्यर्थ, स्वै: कर्मभिरगर्हितै: ॥
॥ अक्लेशेन शरीरस्य, कुर्वीत धनसंचयम्‍ ॥१॥ मनु. अ.४ श्लोक ३ रा]
अर्थ : - यात्रा म्हणजे प्राणधारण अर्थात्‍ स्वकीय कुटुंबाचे पोषण नित्य कर्मानुष्ठान एतत्पूर्वक शरीरनिर्वाहाकरितां अनिंदित [शास्त्रविहित अशी जीं] स्वकीय ( पुढें सांगावयाची ऋतादि) कर्मे त्यांहीकरुन व शरिराला क्लेश दिल्यावाचून धनसंचय करावा ॥४॥
॥ ऋतामृताभ्यां जीवेत्तु, मृतेन प्रमृतेन वा ॥
॥ सत्यामृताभ्यामपि वा, न श्ववृत्या कदाचन ॥५॥ (मनु. अ. ४ था श्लोक ४)
अर्थ:- ब्राम्हणाचें कर्तव्य आहे की, ब्राम्हणानें ऋत आणि अमृत या कार्यांनी उपजीवन करावें [ त्याचाही असंभव असतां] सत्यानृतानेंहि उपजीवन [ निर्वाह] करू नये. ॥५॥
॥ ऋतमुच्छशिलं ज्ञेयममृतं स्यादयाचितम्‍ ॥
॥ मृतं तु याचितं भैक्षं, प्रमृतं कर्षणं स्मृतम्‍ ॥६॥ ( मनु अ.४ श्लोक ५)
अर्थ:- उंछ ? आणि शिल ही ऋत होत आणि अयाचित म्हणून तें अमृत होय. याचना करुन बहुत घरी भिक्षा घेऊन जमविणें ते मृत जाणावें, कृषण ( ह्य, शेती करणें ) तें प्रमृत होय ॥६॥
॥ सत्यानृतं तु वाणिज्यं, तेन चैवापि जीव्यते ॥
॥ सेवा श्चवृत्तिराख्याता, तस्मात्तां परिवर्जयेत ॥७॥ (मनु. अ.४ श्लोक ६)
अर्थ:- वाणिज्य वृत्तीला सत्यानृत म्हणतात या करितां [ऋत आणि अमृत या वृत्तिपासून निर्वाह होत नसेल तर प्रमृत वृत्तीने निर्वाह करावा आणि प्रमृत वृत्तीने निर्वाह होत नसेल तर सत्यानृत वृत्तीनें उपजीवन करावें. परंतु, श्लोकांत च शब्द आहे त्या वरुन असे सूचित होत आहे की रसयुक्त पदार्थ दुग्ध दिक विकूं नयेत. कारण दुग्धादिक विकल्यानें ब्राम्हण तीन दिवसांत पतित होतो अशी मनुस्मृतिची आज्ञा आहे. या वरुन व्याजादिक वर्ज्य करुन [ अर्थात्‍ व्याज न घेतां ] आणि दुग्धादिक विकणे वर्ज्य करुन उपजीविका करावी असें बोधित होतें, " श्ववृत्ति राख्याता" म्हणजे सेवा चाकरी ब्राम्हणाने करुं नये. आणि ब्राम्हणाने सेवा धर्माचा अंगिकार केल्यानें ते ब्राम्हण ब्रम्हतेजा ? पासून  नष्ट होतात आणि उपर्‍युक्त पतित ब्राम्हणांच्या संसर्गानें धर्मात्मा ब्राम्हणांची अपकीर्ति होण्याचा संभव आहे. यास्तव "श्ववृत्ति" सर्वथा वर्ज्य करावी ॥७॥

॥ कुसूलधान्यको वा स्यात्‍, कुम्भीधान्यक एव ॥
॥ त्र्यहैहिको वापि भवेत्‍ अश्चस्तनिक एव वा ॥८॥ म.अ.४ श्लो.७
अर्थ:- ब्राम्हणांचे कर्तव्य की त्यानें कुसूल धान्यक असावें. कुसूल धान्यक म्हणजे तीन वर्षे पुरेल इतक्या धान्याचा संग्रह करावा. कुसूल धान्यक म्हणजे तीन वर्षे पुरेल इतक्या धान्याचा संग्रह करावा. अथवा कुम्भीधान्यक म्हणजे एक वर्षभर पुरेल इतक्या धान्याचा संग्रह करावा त्र्यहैहिक असावें म्हणजे तीन दिवसपर्यंतनिर्वाह होईल इतकाच संग्रह करावा व अश्चस्तनिक म्हणजे एक दिवसापुरतें.॥८॥
॥ चातुर्णामपि चैतेषां, द्विजानां गृहमेधिनाम्‍ ॥
॥ ज्यायान्‍ पर:परो ज्ञेयो, धर्मतो लोकजित्तम: ॥९॥ मनु. अ.४. श्लो.८
अर्थ:- हे जे चार [ सुकूल धान्यक: कुंभीधान्यक: त्र्यहैकिक आणि अश्चस्तनिक] गृहस्थाश्रमी ब्राम्हण सांगितले यांमध्यें पुढचा पुढचा श्रेष्ठ जाणावा; कारण तो पूर्वींच्यापेक्षां (वृत्तिसंकोचरुप) धर्मांने स्वर्गादि लोक जिंकणार्‍यांमध्ये श्रेष्ठ होतो.
॥ ब्राम्हणेषु च विद्वांसो, विद्वत्सु कृतबुद्धय: ॥
कृतबुद्धिषु कर्तार:, कर्तॄषु ब्रम्हवेदिन: ॥१०॥ मनु. अ.१ श्लोक.९७
अर्थ :- ब्राम्हणांमध्ये विद्वान श्रेष्ठ. विद्वानांमध्ये कृतबुद्धी [ वेदोक्त अनुष्ठान करण्याविषयी बुद्धी धरणारे] श्रेष्ठ होत. कृतबुद्धीमध्ये वेदोक्त कर्म करणारांहून ब्रम्हविद्येमध्यें जे कुशल ते ब्रम्हवेत्ते श्रेष्ठ होत ॥१०॥

N/A

References : N/A
Last Updated : October 22, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP