वर्णाश्रमधर्मनिर्णय - मठविभाग
वर्ण ही एक अवस्था आहे. शास्त्रानुसार प्रत्येक व्यक्ति शूद्र ह्नणून जन्माला येतो, आणि प्रयत्नपूर्वक विकास करून अन्य वर्ण व्यवस्थेपर्यंत पोहोचतो. वास्तविक पाहता प्रत्येकांत चारही वर्ण स्थापित आहेत, या व्यवस्थेलाच वर्णाश्रम धर्म म्हणतात.
॥ पश्चिमे द्वारकाख्ये मठे विश्वरुपेतिस्मृत ॥
॥ पूर्वे गोवर्धन मठे पद्मपादक: संज्ञक: ॥३४॥
द्वारका मठ पश्चिम समुद्रीं । तेथे विश्वरुपाचार्यत्व करी ॥ तीर्थ आश्रम तेथिचे अधिकारी । त्यामठा माझारीं ते बसती ॥३५॥
गोवर्धन मठ पूर्वसमुद्रीं । तेथें पद्मपादाचार्य अधिकारी ॥ बन अरण्य ते तो अंगीकारी । तेथे निरंतरी ते वसती ॥३६॥
उत्तरस्थानी मठे तुत्रोटक एवच ॥ दक्षणस्यांच श्रृंगेर्यां । पॄथ्वीधर इतिस्मृत: ॥३७॥
बद्रिकाश्रमी जोशी मठ ॥ त्रोटकाचार्य तेथची वरिष्ठ ॥ गिरि पर्वतसागर श्रेष्ठ ॥ मठी उद्भटवस्ती त्यांची ॥३८॥
श्रृंगरी मठ दक्षिणेमाझारीं ॥ तेथें पृथ्वीधराचार्य आज्ञाकरी ॥ सरस्वती भारती आणि पुरी ॥ तेथें निरंतरी ते वसती ॥३९॥
हस्तामलकाचार्य परम् । त्यास सहजी सहज विश्राम ॥ न करीचि मठमठिका आश्रम । आत्माराम परिपूर्णत्वें ॥४०॥
उरला सुरेश्वराचार्य । त्यासी मठी नाही तात्पर्य ॥ ब्रम्हविद्या व्याख्या अतिवर्य । परम् चातुर्य भावार्थदीप् ॥४१॥
वेदोक्त प्राधान्य हा ग्रंथ । यालागी गुरुपरंपरा संमत ॥ ग्रंथी साधूनी अद्वैत । ग्रंथी ग्रंथार्थ संपविला ॥४२॥
जैसा तळहातीचा आंवळा । तैस ग्रंथ दिसे प्रांजळा ॥ निवे मुमिक्षाचा जिव्हाळा । परम सोहळा सिद्धांसी ॥४३॥
वेद् शास्त्रांचा मथितार्थु: म्यां बोलिला हा परमार्थु । तेणें वसवी जो हृदय पंथु श्रोते जनाचा ॥ ४४ ॥
N/A
References : N/A
Last Updated : October 22, 2018
TOP