वर्णाश्रमधर्मनिर्णय - शूद्रकर्मधर्म
वर्ण ही एक अवस्था आहे. शास्त्रानुसार प्रत्येक व्यक्ति शूद्र ह्नणून जन्माला येतो, आणि प्रयत्नपूर्वक विकास करून अन्य वर्ण व्यवस्थेपर्यंत पोहोचतो. वास्तविक पाहता प्रत्येकांत चारही वर्ण स्थापित आहेत, या व्यवस्थेलाच वर्णाश्रम धर्म म्हणतात.
शूद्राच्या कर्माबद्दल मनु महाराज म्हणतात की,
॥ एकमेव हि शूद्रस्य प्रभु: कर्म समादिशत् ॥
॥ एतेषामेव वर्णानां शुश्रुषामनसूयया ॥१॥ मनु.अ.१ श्लो.९१
अर्थ:- ब्रम्हदेवाने शूद्राकरिता एकच कर्म सांगितले. तें हें की, असूया न करितां ( गुणांची निंदा न करितां) ब्राम्हण, क्षत्रिय आणि वैश्य ह्या तीन वर्णांची सेवा करावी. ॥१॥
याचप्रमाणें श्रीकृष्णानें भगवतगीतेमध्यें असे म्हटलें आहे की,
॥ परिचर्यात्मकं कर्म शूद्रस्यापि स्वभावजम् ॥२॥ गीता अ.१८ श्लो.४४
अर्थ:- हें अर्जुना, शूद्राचें स्वभावकर्म म्हटलें म्हणजे ब्राम्हण, क्षत्रिय, वैश्य ह्या तीन वर्णांची सेवा करावी. ॥२॥
एथें संक्षेपानें चारी वर्णांचे गुण, कर्मे आणि स्वभाव सांगितले आहेत. विशेष पाहाणें असल्यास वेदमनुस्मृति आदि ग्रंथांमध्ये पाहून घ्यावें.
N/A
References : N/A
Last Updated : October 22, 2018
TOP