वर्णाश्रमधर्मनिर्णय - आश्रमव्यवस्थावर्णन
वर्ण ही एक अवस्था आहे. शास्त्रानुसार प्रत्येक व्यक्ति शूद्र ह्नणून जन्माला येतो, आणि प्रयत्नपूर्वक विकास करून अन्य वर्ण व्यवस्थेपर्यंत पोहोचतो. वास्तविक पाहता प्रत्येकांत चारही वर्ण स्थापित आहेत, या व्यवस्थेलाच वर्णाश्रम धर्म म्हणतात.
ज्याप्रमाणे वैदिककालीं ब्राम्हणादि चारी वर्णांची गुणकर्मस्वभावाने वर्णव्यवस्था मानण्यांत आली होत्ते. त्याचप्रमाणें ब्रम्हचर्य-आदि आश्रमाची व्यवस्था करण्यांत आली होती. या चारी आश्रमांबद्दल आपस्तंब ऋषि यांनी म्हटलें आहे की,
॥ चत्वार आश्रमा गार्हस्थ्यमाचार्यकुलं मौनं वानप्रस्थामिति ॥
अर्थात् गार्हस्थ्य म्हणजे गृहस्थाश्रम, आचार्यकुलं ह्य. ब्रम्हचर्याश्रम, मौनं ह्य. वानप्रस्थाश्रम हे चार आश्रम आहेत. याचप्रमाणें वसिष्ठ ऋषिंनी म्हटलें आहे की: -
॥ चत्वार आश्रमा ब्रम्हचारि गृहस्थ वानप्रस्थ परिव्राजका इति ॥
अर्थ:- ब्रम्हचारी, गृहस्थ, वानप्रस्थ आणि परिव्राजक अर्थात् संन्यास हे चार आश्रम आहेत. आतां पुढें उपरोक्त चारी आश्रमापैकीं ब्रम्हचर्य आश्रमाचें कर्म तथा त्यांचा अवधि वगैरेचें वर्णन यथायोग्य केलें जाईल.
N/A
References : N/A
Last Updated : October 22, 2018
TOP