अभंग--१५१
जना जन पाळिताहे वृध्दा बाळपण बाळा वृध्दपण । अंतर शोधुनि पाहें श्रेष्ठ कनिष्ठा कनिष्ठ श्रेष्ठां । उसिणें फिटत जाय जग जगाचें जीवन साचें । कर्ता तो करिताहे एका पाळितो पाळुनि घेतो । दोंहिकडे फिरताहे अंतरवासी देव विलासी । दास समजत राहे
भावार्थ--
या अभंगात संत रामदास जगरहाटी बद्दल बोलत आहेत. जीवनात वार्धक्यामुळे शक्तीचा ह्रास होतो व त्यांना बालकासारखे काहीसे परावलंबित्व येते. बालपणातून तारुण्यात कडे जाताना शक्तीची वृद्धी होते व पुढे परत वृद्धपण. अशाप्रकारे श्रेष्ठाला कनिष्ठ पणा व कनिष्ठाला श्रेष्ठपणा प्राप्त होतो.
अभंग--१५२
काय पाहों मी आतां । रुप न दिसे पाहतां खूण न ये सांगतां रे रामा दृश्य पाहतां डोळा । वाटतो सोहळा त्याहूनि तू निराळा रे रामा ज्ञान हातासी आलें । त्याचें विज्ञान जाले तेंहि नाहीं राहिलें रे रामा दासें घेतली आळी । पावावें ये काळीं सगुणरुपें सांभाळीं रे रामा
भावार्थ--
या दृश्य जगाच्या सोहळा पहाताना वाटते की, राम याहून वेगळा आहे. असे ज्ञान झाल्यानंतर विचारांती ज्ञानाचे विज्ञान झाले पण तेही पंचभौतिक विश्वांत विलीन झाले. संत रामदास म्हणतात आता श्री रामांनी कृपा करावी व आपणांस सगुण रूपात दर्शन द्यावे.
अभंग--१५३
चालत नाहीं बोलत नाहीं । हालत नाहीं तो निरंजन दिसत नाहीं भासत नाहीं । नासत नाहीं तो निरंजन करीत नाहीं धरीत नाहीं । हरीत नाहीं तो निरंजन नामचि नाहीं रुपचि नाहीं । चंचळ नाहीं तो निरंजन निर्मळ जो तो निश्चळ जो तो । दासचि होतो तो निरंजन
भावार्थ--
या अभंगात संत रामदास निरंजनाच्या स्वरुपाचे वर्णन करीत आहेत. न चालणारा, न बोलणारा, न हलणारा, डोळ्यांना न दिसणारे असे निरंजनाचे स्वरूप आहे. ज्याला नाम नाही जो निराकार आहे निर्मळ असून तो निश्चळ आहे. जो सर्व काही करीत असूनही अकर्ता आहे. सर्वसत्ताधीश असूनही केवळ साक्षीरूपाने आहे असे सर्वस्वी निरपेक्ष उदासीन वृत्तीने रामरुपाशीं एकरूप झालेले रामाचे दास हे निरंजनाचे स्वरूप आहे.
अभंग--१५४
देखिला रे देव देखिला रे । ज्ञानें भक्तिचा रस चाखिला रे विश्वामध्यें विस्तारला । भावें भक्तांसी पावला भक्तिलागीं लांचावला । भक्ता पद देतसे जगामध्यें आहे ईश । म्हणोनि बोलिजे जगदीश जयाचेनि सुंदर वेश । नाना रुपें शोभती जनीं श्रोता वक्ता होतो । तोचि देखतो चाखतो वृत्ती सकळांच्या राखतो । मनीं मन घालुनी ज्ञानी ज्ञाने विवरला । एक त्रैलोक्यीं पुरला धन्य धन्य तो एकला । नाना देह चाळवी सर्व करितो दिसेना । एके ठायी हि वसेना जवळीच निरसेना । दास म्हणे तो गे तो
भावार्थ--
संत रामदास म्हणतात आज ज्ञानाने भक्तीचा रस चाखला कारण देव भक्तांच्या भक्तीभावाला पावला व विश्वातील सर्व ठिकाणी स्वरूपानें विलसू लागला. भक्तिप्रेमामुळे वेडा होऊन त्याने स्वपद भक्तांना अर्पण केले. जगात राहणारा ईश म्हणजे जगदीश. या देवानें अनेक रूपे, अनेक वेष धारण केले. जनांमध्ये बसून ऐकणारा श्रोता तोच असतो आणि बोलणारा वक्ता ही त्याचेच रूप. तो अनेक गोष्टी बघतो आणि अनेकविध पदार्थांचा रस चाखतो. सर्वांच्या अंतरंगात प्रवेश करून त्यांच्या वृत्तींशी एकरूप होतो. स्वतःच ज्ञानेश्वर बनून ज्ञानाचे विवरण करतो. एकटा असूनही सर्व देहांना आत्मरूपाने चालवतो. सर्व काही
करीत असूनही एका स्थळी दिसत नाही रामदास म्हणतात तोच तो आज देवरुपाने आपल्याला दिसला.
अभंग--१५५
सर्वा अंतरीं आत्माराम । विश्रामधाम मध्यें आडवा आला भ्रम । देहसंभ्रम यम नियम दम । नित्य प्राणायाम आगमनिगम । संतसमागम ठायी पडेना वर्म । उभे राहिलें कर्म सदा नित्य नेम । वाची सहस्रनाम दास म्हणे राम । आहे पूर्ण काम
भावार्थ--
सर्वांच्या अंतर्यामी असणारा आत्माराम हा सर्व जीवांचे विश्रांतीचे स्थान आहे असे असूनही देहबुद्धी मुळे मनामध्ये संशय विकल्प निर्माण होऊन या विश्वासाला तडा जातो. माणूस यम, नियम प्राणायाम या साधनेच्या मागे लागतो. वेद, पुराणे, संतवचने यातून वर्म शोधण्याचा प्रयत्न करतो. काही वेळा कर्मकांडांचा आश्रय घेतो. अनेक प्रकारच्या उपासना, उपास-तापास, व्रते करतो विष्णुसहस्त्रनाम तर कोणी शिवलीलामृताची पारायणे करतो. संत रामदास म्हणतात श्रीराम हे सर्व कामना पूर्ण करणारे आहेत.
अभंग --१५६
संसारीं संतोष वाटला । देव भेटला, मोठा आनंदु जाला सुखसागर उचंबळे । जळ तुंबळे, दु:खसिंधु निमाला सेवकासी ज्ञान दीधलें । काम साधलें देवदर्शन जालें आत्मशास्त्रगुरुप्रत्ययें । शुध्द निश्चयें ऐसें प्रत्यया आलें देवचि सकळ चालवी । देह हालवी, अखंडिताची भेटी उत्तम सांचला संयोग । नाहीं वियोग, अवघ्या जन्माशेवटीं दास म्हणे दास्य फळलें । सर्व कळले, ज्ञानें सार्थक जालें सार्थकचि जन्म जाला । मानवी भला, परलोकासी नेला
भावार्थ--
या अभंगात रामदास म्हणतात भक्ताला देव दर्शनाचा लाभ झाला. त्याला ज्ञानाचा लाभ झाला. कामना पूर्ण झाली. गुरू वचनाचा प्रत्यक्ष अनुभव आला. आत्माराम अंतर्यामी राहून हा देह चालवतो असा दृढ निश्चय झाला. जीवा शिवाची अखंड भेट झाली. त्याचा वियोग कधीच संभवत नाही. संत रामदास म्हणतात देव भेटल्यामुळे मनाला संतोष वाटला. दुःख पूर्णपणे विलयास गेले. आनंद सुख सागर उचंबळून आला. आत्तापर्यंतच्या सेवेचे उत्तम फळ मिळाले. आत्मज्ञाना मुळे जन्माचे सार्थक झाल. इहलकी व परलोकी कल्याण झाले.
अभंग--१५७
होते वैकंठीचे कोनीं । शिरले अयोध्याभुवनी लागे कौसल्येचे स्तनीं । तेंचि भूत गे माय जातां कौशिकराउळीं । अवलोकिली भयंकाळीं ताटिका ते छळूनि मेली । तेंचि भूत गे माय मार्गी जातां वनांतरीं । पाय पडला दगडावरी पाषाणाची जाली नारी । तेंचि भूत गे माय जनकाचे रंगणीं गेलें । शिवाचें धनु भंगिलें वैदेही अंगीं संचरलें । तेंचि भूत गे माय जेणें सहस्त्रार्जुन वधिला । तोहि तात्काळचि भ्याला धनु देऊनि देह रक्षिला । तेंचि भूत गे माय पितयाचे भाकेसी । कैकयीचें वचनासी चौदा संवत्सर तापसी । अखंडवनवासी सांगातीं भुजंग पोसी । तेंचि भूत गे माय सुग्रीवाचें पालन । वालीचें निर्दालन तारी पाण्यावरी पाषाण । तेंचि भूत गे माय रक्षी भक्त बिभीषण । मारी रावण कुंभकर्ण तोडी अमरांचें बंधन । तेंचिभूत गे माय वामांगीं स्त्रियेसी धरिलें । धावूनि शरयूतीरा आलें तेथें भरतासी भेटलें । तेंचि भूत गे माय सर्व भूतांचें हृदय । नांव त्याचें रामराय रामदास नित्य गाय । तेंचि भूत गे माय
भावार्थ--
वैकुंठवासी विष्णूंनी त्रेतायुगात श्री रामाचा अवतार घेतला. कौसल्या राणीच्या पोटी राम जन्म झाला. विश्वामित्र ऋषींच्या आज्ञेवरून ताटकेचा त्याने वध केला. वनामध्ये मार्गक्रमण करताना गौतम ऋषींची पत्नी अहिल्या, तिचा उद्धार केला. जनक राजाच्या नगरीत शिवधनुष्याचा भंग करून जानकीला स्वयंवरात वरले. पराक्रमी परशुरामाने सहस्त्रार्जुनाचा वध केला पण श्रीरामाला घाबरून धनुष्य देऊन आपल्या प्राणांचे रक्षण केले. आपला पिता, राजा दशरथाला कैकयीच्या वचनातून मुक्त करण्यासाठी वनवास पत्करला. १४ वर्षे शेषावतार लक्ष्मणाबरोबर वनवास भोगला. सुग्रीवाला न्याय देण्यासाठी वालीचा वध केला. सागरावर पाषाण टाकून सेतू बांधून लंकेत प्रवेश करून, रावण, कुंभकर्णाला मारून देवांना बंधनातून मुक्त केले बिभिषणाचे रक्षण करून लंकेचे राज्य त्याला परत दिले. अयोध्येस परत येऊन भरताला भेटले. रामायणातील या सर्व घटनांचा उल्लेख करून संत रामदास म्हणतात सर्व प्राण्यांचे हृदय त्याचे नाव रामराव. म्हणजेच रामदासांचा स्वामी आत्माराम.
अभंग--१५८
आम्ही काय कुणाचें खातो तो राम आम्हांला देतो बांधिले घुमट किल्ल्याचे तट । तयाला फुटती पिंपळवट नाहीं विहीर आणि मोट । बुडाला पाणी कोण पाजीतो खडक फोडितां सजिव रोडकी । पाहिली सर्वांनीं बेडकी सिंधु नसतां तियेचें मुखीं । पाणी कोण पाजीतो नसतां पाण्याचे बुडबुडे । सदासर्वदा गगन कोरडें दास म्हणे जीवन चहुकडे । घालुनी सडे पीक उगवीती
भावार्थ--
देवळाचे घुमट, किल्ल्याचे तट येथे पिंपळाचे रोपटे उगवतात. तेथे पाण्याची विहीर मोट नसताना त्यांना पाणी मिळते. खडक फोडताना आत मध्ये जिवंत बेडकी दिसते. तिच्या मुखात पाणी कोण घालतो. आकाशात पाण्याचे बुडबुडे कधी दिसत नाही ते कोरडे असूनही चहूंकडे पाण्याचे सडे घालून पिक उगवतं. संत रामदास म्हणतात ही सगळी रामाची किमया आहे. श्रीराम सर्वांना अन्नपाणी पुरवतो.
अभंग--१५९
आम्हा तुम्हा मुळीं जाली नाही तुटी तुटीविण भेटी इच्छितसां सर्वकाळ तुम्ही आम्ही एके स्थळीं वाया म़गजळीं बुडों नये जवळीच आहे नका धरुं दुरी बाह्य अभ्यंतरीं असोनियां लावू नये भेद मायिकसंबंधीं रामदासीं बोधीं भेटी जाली
भावार्थ--
संत रामदास म्हणतात देव भक्तांची कधी ताटातूट होत नाही तेव्हां भेट होण्याचा प्रश्नच नाही. सर्वकाळ देव आणि भक्त एकाच ठिकाणी असताना भेटीसाठी तळमळणे म्हणजे मृगजळाच्या पाण्यात बुडण्याची कल्पना करण्यासारखे आहे. भक्ताच्या मनात आणि जनात देवच भरून राहिलेला आहे देवाने आपल्याला दूर करू नये अशी विनंती संत रामदास आपल्या स्वामीला करतात.
अभंग--१६०
माझी काया गेली खरें । मी तों आहे सर्वांतरें ऐका स्वहित उत्तरें । सांग़इन राहा देहाच्या विसरें । वर्तो नका वाईट बरें तेणें भक्तिमुक्तिची द्वारें । चोजवती बुध्दि करावी स्वाधीन । मग हें मजूर आहे मन हेंचि करावें साधन । दास म्हणे
भावार्थ--
आपण देहाने जरी हे जग सोडून गेलो तरी सर्वांच्या अंतरात राहून हिताचे बोल सांगत राहीन असा दिलासा संत रामदास आपल्या शिष्यांना देत आहेत. देहबुद्धी सोडून देऊन आत्म बुद्धीने वागावे त्यामुळे भक्ती मुक्तीची दारे उघडतात. बुद्धी जेव्हा स्वाधीन होते तेव्हा मन बुद्धीची चाकरी करू लागते. हे साधन करावे असे संत रामदास म्हणतात.