रामा हृदयी राम नाही पतिव्रते चारुते सीते का रडसी घाई ॥धृ॥
राहलीस तू रावण सदनी शंकीत होती ती जनवानी । त्यजीता तिजला त्याच कारणी सर्वसाक्षी सर्वज्ञानी, राम तुझा तो उरला नाही ॥१॥
पावित्र्याला कलंक लावूनी, पतितची झाली पतिन पावन । पवित्र करण्याचा श्रीरघुनंदन पतिव्रतेला लावी पणाला शतजन्मांची तव पुण्याई ॥२॥
लोकाग्रणी त्या राम हृदयी जगतारूपी तूच सीता तुला कलंकित तू म्हणता, व्याकुळ झाला तव हृदयीचा करूणाकार तो प्रभु रामचंद्रही ॥३॥