देवकी तुझे पुण्य कोट्यानुकोटी हरीसारखे जन्मले रत्नपोटी भूमी भार हारावया जन्म घेती ॥ नमस्कार माझा तुम्हा कृष्णमुर्ती ॥धृ॥१॥
अहो यशोदा पुण्य जन्मांतरीचे कृपा सागरा जाणूनी अंतरीचेजगी धन्य तो आनंद चित्ती ॥२॥
मातापिता कंसाचे बंदिखानी यशोदे घरी वाढतो चक्रपाणी जसे ज्याचे पुण्य तसे सौख्य घेती ॥३॥
पदी यशोदा न्हाणीती बाळकासी भरी तेल कानी श्रीलोचनासी करी निररी उष्णताची होती ॥४॥
धरी आडवा कर्ण फुंकीती ज्याचे करी पाळणा हालवी मोर नाचे असे विश्व पोटी स्तुतीगीत गाती ॥५॥
तरंगे जसे धार वाहे जळासी तसी ही वाकड्या जावळाची परी वरती शोभताती मोती ॥६॥
बहूरे हरी जावळाची दाटी जसी नागवेली तसी एक ताटीनाही लक्षीता नेत्र झाकी उघडी ॥७॥
हरी उजवा पाय लावी भुमीसी तुझा दुमणा लागु दे माझ्या मांडीसी नाही लक्षीता भुवरी भक्षीले लोणी हाती ॥८॥