ओकांर नाम स्मरता । हरली अनेक चिंता । घ्या लूट ही फुकाची अंती असे सुखाची । लोटूनी दूर जाता । विषयात लीन होता ॥१॥
सर्वातरी प्रभुची । सत्ता असे कुणाची । नरदेह जन्म असता प्रभुला कसे विसरता ॥२॥
सतसंगती मनाची । बुद्धी नको जनांचा तो एक जन्मदाता । राहो अखंड चित्ता ॥३॥