दे मज आशीर्वाद मज, दे मज आशीर्वाद ॥धृ॥
तुझ्या मंदिरी नाद घुमतो, आतुरले मन नयनी बघतां । सुखवाटे मज त्यांत अंबे दे मज आशीर्वाद ॥१॥
सिंहासनावरी अंबा बैसली सांग प्रार्थना असली कसली, लावूनी कापूर वात अंबे दे मज आशीर्वाद ॥२॥
हळदीकुंकू पुष्यमाला, गुलाब केवडा तुज वासाला, पेढे नैवेद्यास, अंबे दे मज आशीर्वाद ॥३॥
दर्शन घेती आनंदाने, भक्त गर्जती अति प्रेमाने, ठेवूनी मस्तकी हात, अंबे दे मज आशीर्वाद ॥४॥