श्रीनिवृत्ती नाथाच्या मुला ओवाळीती आरती तुला ॥धृ॥
प्रवृत्तीचा निवृत्तीनाथ ज्ञान ज्ञान नुरले जगतात स्वयंमज्योती ज्ञानाची कला ॥१॥
नृत्य भावे निवृतीनाथ ज्ञान ज्ञान बांधीला घाट भवसागर सोपा केला ॥२॥
अनुभव अमृताचा प्याला जगताला पिण्याला दिला एकदा उघडून पुन्हा झाकीला ॥३॥
निवृत्ती नाथ ज्ञानेश्वर पांडूरंग दत्तगुरु गुरुशिष्यांचा संगम झाला ॥ ओवाळीती आरती तुला श्रीनिवृत्ती नाथाच्या मुला ज्ञानेश्वरा आरती तुला ओवाळीते आरती तुला ॥४॥