ऐकलात कां ग हट्ट नवा हट्ट नवा । रामाला ग चंद्र हवा ॥धृ॥
कौसल्याच्या मांडीवरी राममूर्ती खेळत होती । रम्य आणखी अंवती भवती । पसरली होती ती पूनवा ॥१॥
खेळत खेळत खिडकीमधूनी । चंद्र पाहिली युवराजानी । त्यास भासला दिवाच दुरुनी । चमचमणारा तो फसवा ॥२॥
जमल्या त्याच्या तिन्ही आया । थकल्या सार्या दासी दाया । फुल कुणी ते पुन्हा फुलवावे । महाराजाना जा कळवा ॥३॥
काय तरी हे अघटित बाई । चंद्र कसा हा हाती येई । बाळ कुणाचे ऐकत नाही । युवराजाना जा कळवा ॥४॥
पहा पाह गे आरसांतला ग । चंद्र पाहुनी बाळ हासला । साखर वाटा या नगरीला । प्रजाजनांना जा कळवा ॥५॥