चला जाऊ पाहु तया चला जाऊ पाहु तया । पंढरीचा देव राया ॥धृ॥
विप्र पुंडलिका घरी । घेई धाव वेगे हरी । युगे अठ्ठावीस तरी तिष्टे विटे राहुनिया ॥१॥
दोन्ही पाणि टेकुनी कटी । उभा चंद्रभागा तटी । पाहे वाट भक्तासाठी । साधु संताची माया ॥२॥
चरण सुंदर किती । प्रेमे चुरित राधा सती । गळा माळ वैजयंती । भाळी बुक्का लावुनिया ॥३॥
शोभे तुळशी हार गळा । भारी कस्तुरिचा टिळा । दावि करूनी सगुण लीला । भक्ता सह्य होऊनिया ॥४॥
सोसवेना भय व्यथा । ऐक रुक्मीणीच्या नाथा । नेई माहेरासी आता । कृश झाली बहुत काया ॥५॥
भक्त कितिक उद्धरिले । नाही गणित कोणी केले । ऐसे पांडुरंग भले । कृष्ण लीन झाली पाया ॥६॥
N/A