अलंकापुरीत आदि शिव पिठ गंगा ही प्रगट झाली तेथे ॥धृ॥
इंद्रायणी वाहे तिर्थ ते पवित्र । आळंदीचे क्षेत्र धन्य जगी धन्य जगी ॥१॥
गुह्य ते प्रगट केले ज्ञानेशानी गुरु निवृतीने आज्ञापिता आज्ञापिता ॥२॥
कार्यभाग होता संपली उपाधी, घेतली समाधी ज्ञानेशाने ज्ञानेशाने ॥३॥
चौघा भावंडानी उभारली गुडी गुडी उभारीली । भक्ती शिकविली विठ्ठलाची विठ्ठलाची ॥४॥