पोपट गेला, पिंजरा रिकामा पडला ॥धृ॥
बांधीली ज्याने उंच हवेली कमी मैना आणूनी ठेविली तिच्यासंगे बुद्धी भ्रमली, मिळवी धनाला ॥१॥
चतुर कसा हा आपुल्या कामी धन दारा सुत यात आरामी कधी न रंगला श्रीहरी नामी, काळे धरीला ॥२॥
उंचवरि नर सुबक पिंजरा त्या त्रिगुणांच्या तुटती तारा विषई भुलला ॥३॥
खाली पिंजरा कोण ठेवितो याहो याहो उचला म्हणतो लावूनी अग्नी घरासी येतो, अग्नीने गिळीला, पिंजरा दिसेना झाला ॥४॥
म्हणे कृष्णा जिवा पोपटा काळाचा तुज येईल सोटा, हरीनामाचा लावी सपाटा, तारी भावाला, ॥ पिंजरा ॥५॥