अग नारी भानू धनगरनी । भुलवीला जेजुरीचा वाणी । जन म्हणतील परद्वारी भुलविला राजा मल्हारी ॥धृ॥
धन्याच ग माझे एक चित्त दुसरी नव्हती मनात । कुणीकुन आली ही सवत । भुलवीला माझा निलकंठ ॥१॥
कबिना बोले उत्तर । जळो ग ईचा संसार । सोडूनी अपुले घरदार । निघाली देवाचे घर ॥२॥
कबीना बोले बा नाई । ऐक तू म्हळसाबाई पुर्वी जन्मीची ग पुण्याई । म्हणूनी आले देवाच्या पायी ॥३॥
सवती सवतीच ग भांडण । असेल पूर्वीच संधान । रामा वाघ्या अज्ञान वंदिले सद्गुरुचे चरण ॥ अग नारी भानू ॥४॥