अजाण आम्ही तुझी लेकरे, तू सर्वाचा पिता । नेमाने तुज नमितो गातो तुझ्या गुणांच्या कथा । चंद्र सूर्य ही तुझीच देवा तुझी गुरे वासरे, तुझीच शेते सागर डोंगर फुले पाखरे । अनेक नावे तुला, तुझेरे दाही दिशांना घर । करिशी देवा सारखीच तू माया सगळ्यांवर । खूप शिकावे काम करावे प्रेम धरावे मनी । हौस एवढी पुरवी देवा हीच एक मागणी ।