चिंवचिंव चिमणी छतांऽत छतांऽत.
अरसा लोंबे भिंतीला भिंतीला.
चिमणी पाहे सवतीला सवतीला.
भरभर आली रागांत रागांत.
पहिली :- 'चिउताइ चिउताइ, काय बघतां ? "
दुसरी :- "टच् टच् चिउताइ, काय करितां ? काय करितां ?"
तिसरी - 'ती तर तुमची पडछाया पडछाया
चवथी :- उगीच शिणतां कां वाया कां वाया ?
पहिली:- "फुटेल काच."
दुसरी:- "दुखेल चोच."
तिसरी:- "पडेल खोऽच चोचीला चोचीला
चवथी:- 'काऽय होइल सवतीला सवतीला"
सर्वजणी:- 'टाळ्या वाजवुं या चटचट् या चट्चट्
पावलें फिरवूं या पट्पट् या पट्पट्
भुर्रऽ चिमणी उडाऽली उडाऽली.
छतांत जाउनि दडाऽली दडाऽली."