विजयोन्माद

’कुसुमाग्रज’ या टोपणनावाने श्री. विष्णू वामन शिरवाडकर (१९१२-१९९९) यांनी मराठीत लेखन केले.


मी जिंकलो ! मी जिंकलो !

ओतीत या विष सर्प हो

जहरी भरा जगि दर्प हो

गिळण्या हलाहल शंकरा

परि शक्त मी अजि जाहलो

मी जिंकलो ! मी जिंकलो !

शरवृष्टि वक्षी होउ द्या

उल्का नभातुन वर्षु द्या

दावानली दडु द्या दिशा

निःशंक त्यातुन चाललो

मी जिंकलो ! मी जिंकलो !

कर वादळा, वर तांडव

शिरि घाल विद्युत-मांडव

उरि शैल वा, सायुज्यता

वज्रामधे मी पावलो

मी जिंकलो ! मी जिंकलो !

तेजार्णवी नव पोहलो

आकाश व्यापुनि राहिलो

आता तमा कसली तरी

संजीवनीमधि नाहलो

मी जिंकलो ! मी जिंकलो !

N/A

References :

कवी - कुसुमाग्रज

ठिकाण - नाशिक

सन - १९३३


Last Updated : October 11, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP