मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|कुसुमाग्रज|विशाखा संग्रह २| आव्हान विशाखा संग्रह २ सहानुभूति सात माळाचे मनोगत ऋण उमर खैयाम विजयोन्माद शेवटचे पान उषःकाल तू उंच गडी राहसि प्रीतीविण नदीकिनारी पाचोळा बंदी आव्हान बायरन प्रतीक्षा आश्वासन प्रकाश-प्रभु मेघास आव्हान ’कुसुमाग्रज’ या टोपणनावाने श्री. विष्णू वामन शिरवाडकर (१९१२-१९९९) यांनी मराठीत लेखन केले. Tags : kavikavitakusumagrajpoemshirwadkarकविताकवीकुसुमाग्रजशिरवाडकरसाहित्य आव्हान Translation - भाषांतर बलवन्ता, आव्हान बळीचे बलवन्ता, आव्हान असेच चालू दे चहुकडुनी अखण्ड शरसंधान् ! रक्ताने न्हाली तनू ही रक्ताने न्हाली आणि चाळणी जरी छातिची पिंजुनिया झाली काळजात उठती कळा जरि काळजात उठती बळी गिळाया घारगिधाडे घोटाळत वरती ! लवहि न आशंका परन्तू लवहि न आशंका समर पुकारित राहिल नित हा रणशाली डंका ! बुरुजावरति निशाण् उभे हे बुरुजावरति निशाण किरीट उज्जवल चढो शिरावर वा होवो शिरकाण ! N/A References : कवी - कुसुमाग्रज ठिकाण - पुणे सन - १९३८ Last Updated : October 11, 2012 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP